02/01/2026
माजी आमदार श्री. संजयभाऊ दौंड यांनी आज 'फड हॉस्पिटल'ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सोयी-सुविधांची पाहणी केली आणि हॉस्पिटलमार्फत दिल्या जाणाऱ्या उच्च दर्जाच्या रुग्णसेवेबद्दल समाधान व्यक्त करत कौतुक केले.
याप्रसंगी त्यांनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पांडुरंग फड, डॉ. सौ. शुभांगी फड आणि डॉ. सिद्धेश्वर फड यांच्याशी संवाद साधला. भविष्यातील आरोग्य प्रकल्पांची व्याप्ती कशी असावी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक प्रगत सेवा कशा मिळतील, याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
"भाऊ, आपल्या या भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे आम्हाला जनसेवेची नवी ऊर्जा मिळाली आहे. आपल्या कौतुकाच्या थापेने आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे!"