29/12/2023
*सुवर्णप्राशन*
*या स्पर्धेच्या युगात सुवर्ण प्राशन संस्कार झालेला बालक अव्वल ठरतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास सुवर्ण प्राशन हे बलवर्धक, बुद्धिवर्धक व रोगप्रतिकारक आहे.*
- तुमचे मूल अतिशय चंचल किवा अतिशय शांत आहे का?
- जेवणाकडे अजिबात लक्ष नाही किवा जेवण मागे घेऊन पळावे लागते का?
- एखादे अक्षर बोबडे बोलणे किवा पूर्णत: बोबडे बोलते का?
- अभ्यासाकडे अतिशय दुर्लक्ष किवा लक्षात राहत नाही असे आहे का?
- सतत आजारी असते का? म्हणजे सर्दी,खोकला, ताप वगेरे..
ऊंची आणि वजन योग्य प्रमाणात वाढत नाही?
वरीलपैकी कोणतेही उत्तर हो असेल तर आयुर्वेदातील सुवर्णप्राशन तुम्ही नक्की करा.
*काय आहे सुवर्णप्राशन*
भावी पिढी हुशार, कर्तुत्ववान व सर्वगुणसंपन्न होण्यासाठी आयुर्वेदामध्ये मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळी वाढीसाठी विविध संस्कार वर्णन केले आहेत. या १६ संस्कारापैकी सुवर्णप्राशन हा लहान मुलांकरिता केला जाणारा महत्वाचा संस्कार होय.
लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या संस्करावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असते. बालकांच्या मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी बाजारात आजकाल अनेक औषधी उपलब्ध आहेत. परंतु प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण सुवर्ण प्राशनमुळे बालकांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढ उत्तम प्रकारे होते व स्मरणशक्तीमध्ये वाढ होते.
*हा संस्कार शुन्य ते १३ वर्षे वयोगटातील बालकांना करण्यात येतो.*
सुवर्ण प्राशन म्हणजे सुवर्ण भस्म, मध, वाचा, गाईचे तूप इत्यादीपासून पुष्य नक्षत्रास बनविलेले गुणकारी आयुर्वेदिक औषध असून, सुवर्ण प्राशन बालकांना देण्याच्या प्रक्रियेला सुवर्ण प्राशन संस्कार असे म्हणतात.
*फायदे 😗
- मेधवृद्धीकार- बुध्दी वाढविणारे,
- अग्निवृद्धीकर-भूक वाढविणारे,
- बलवृद्धीकर- शक्तीदायक,
- आयुवृद्धीकर-दीर्घ आयुष्य देणारे,
- कल्याणकारी- सर्वांगीण विकास करणारे,
- पुण्यकारक- रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे,
- वृषयकर- शरीरातील सप्तधातूंची वृद्धी करणारे,
- वरण्यकर- सौंदर्यवृद्धी करणारे,
- गृहबाधानाशक- बाह्यसंक्रमनापासून रक्षण करणारे
*तसेच सहा महिन्यापर्यंत सुवर्ण प्राशन केल्यास बालक श्रुतधर अर्थात एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारा होतो. अशाप्रकारे सुवर्ण प्राशन केल्यामुळे बालकाची मानसिक, शारीरिक व बौद्धिक वाढ होते.*
पोषण करणारे नक्षत्र सुवर्ण प्राशन संस्कार हे पुष्य नक्षत्रास करणे हितकारक असते. व सुवर्ण प्राशन औषधी पुष्य नक्षत्राच्या दिवशीच बनविली जाते. कारण या दिवशी या औषधीवर पुष्य नक्षत्राचा विशेष प्रभाव असतो. तसेच पुष्य अर्थात पोषण करणारे नक्षत्र असल्यामुळे सुवर्ण प्राशन पुष्य नक्षत्रास करणे अधिक हितकारक आहे. गुरुपुष्यमृत असलेल्या दिवशी सुवर्ण प्राशन करणे अमृततुल्य असल्याचे वर्णन आयुर्वेदिक शास्त्रामध्ये करण्यात आले आहे. प्राशन संस्कार शुन्य ते १३ वयोगटातील बालकांना आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य आहे.
*डॉ.सचिन दिनकरराव वायाळ*
*श्री वरद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वाटुर ता. परतुर जि. जालना*