11/01/2022
फक्त कॉपी पेस्ट .सोर्स व्हॉट्स ऍप.
काल डॉक्टर Dileep Deodhar ह्यांनी लिहिलेल्या पोस्टची संक्षिप्त कॉपी...
= = = = = = = = =
कोणत्याही हवेतून पसरणाऱ्या विषाणूंचा आजार जगातील यच्चयावत कोणत्याही उपायाने, अगदी लॉकडाऊन, जमावबंदी, संचारबंदी या उपायाने थोपवाता येत नाही, हे उघड सत्य आहे.
आजपर्यंत फ्लूसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी कधीही टेस्टिंग केले जात नव्हते. सिझनल फ्लू हा दरवर्षी येत राहणारच आहे. कोणतीही बंधनं घातली तरी फ्लूची साथ दोन ते तीन आठवडे राहतेच. ज्यांची इम्युनिटी चांगली असते, त्यांना फ्लू होऊन गेलेला कळतही नाही. सर्वांचे टेस्टिंग करण्याची आवश्यकता नसते. कोणत्याही फ्लूच्या साथीत रूग्णांचा संपर्क येणार्या व न येणार्या लोकांना फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एका घरात एक रूग्ण सापडला तसाच तो प्रत्येक घरात सापडण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्या संपर्कात येणार्यांना विलगीकरणात ठेवले तर संपूर्ण जगरहाटी बंद होईल. रस्त्यातून जाता येता मास्क लावल्याने कोविड होत नाही किंवा साथ पसरणार नाही हा भ्रम आहे.
आतापर्यंत मास्क लावून काळजी घेतलेल्या अनेकांना कोविड होऊन गेला आहे, हे उघड सत्य आहे. ज्यांना कोविड झाला आहे आणि त्याच्या अगदी जवळून संपर्कात येणार्यांनी मास्क लावणे जरुरीचे असते.
आपल्यामुळे इतरांना कोविड होतो ही कल्पना चुकीची आहे. तसे असते, तर डॉक्टर मंडळींना रोजच कोविड झाला पाहिजे. आणि त्या भीतीने त्यांनी पेशंटही बघणं बंद केले तर काय होईल?
कोविड कोणालाही होऊ शकतो, कारण प्रत्येक जण श्वास घेतल्याशिवाय जगू शकत नाही. आपल्याला निसर्गाने आणि जन्मदत्यांकडून मिळालेली इम्युनिटी, हा एक चमत्कार आहे. नाहीतर माणसं रोजच आजारी पडली असती.
साथीमध्ये रूग्ण संख्या ही वाढणारच असते, म्हणून त्याला साथ म्हणतात. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची रोजची गणती करणं आणि ती प्रसिध्द करणं यामुळे जनतेमध्ये फक्त भिती पसरते, कारण ९९% लोकं बरे होतात. पण त्याला प्रसिध्दी दिली जात नाही, हे देशाचे दुर्दैव आहे.
फ्लू प्रतिबंधक व्हॅक्सिन हे सत्तर - ऐंशी टक्के इम्युनिटी देते, आणि परत ते प्रत्येकाच्या नैसर्गिक इम्युनिटी वर अवलंबून असते.
फ्लूचा कायमचा नायनाट करण्यासाठी कधीही व्हॅक्सिन निघू शकणार नाही, हेही उघड सत्य आहे, कारण प्रत्येक वर्षी व्हायरसचा व्हेरिएंट बदलतो, हे जनतेला आता कळले आहे. हे वैद्यकीय जगतास माहिती होतेच.
फ्लूचे व्हॅक्सिन ह्या वर्षी वर्षातून तीनदा घ्यायला लागणार आहे, ह्यावरुन लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे आणि हे दरवर्षी हे तुम्ही करणार आहात का?... फ्लूचे व्हॅक्सिन फक्त ज्यांना फुफ्फुसाचा चिवट आजार आहे किंवा इतर शारीरिक आजारांमुळे ज्यांची इम्युनिटी कमी असेल त्यांना वर्षातून फक्त एकदाच द्यायला पाहिजे.
वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आमच्या Preventive and Social Medicine या पुस्तकात दिल्या आहेत, आणि गेली ४७ वर्ष फॅमिली डॉक्टर म्हणून काम करताना यांचा मी अनुभव घेतला आहे.
२०१० साली जेव्हा स्वाईन फ्लूने भितीचे वातावरण पसरले होते तेव्हा असं सत्य लिहिणारे माझे लेख कोणीही छापत नव्हते आणि आता तर मिडिया हाऊसेस आमच्यासारख्या डॉक्टरांचे सत्य कथन करणारे लेख छापत नाहीत ही सामाजिक शोकांतिका आहे... आणि म्हणून गेली दोन वर्षे सातत्याने फेसबुकवर लिहून समाज प्रबोधन करून समाजातील भीती घालविण्याचे अखंड काम करत आहे...
माझ्यासारखा एक सामान्य फॅमिली डॉक्टर हे एका हाती प्रयत्न करतो आहे, त्यालाच आज मूर्ख ठरविले जात आहे पण मी परत परत सांगतो
I am proud to be fool... कारण संपूर्ण दोन वर्ष मी, माझी सून सुलक्षणा आणि माझी सहकारी डॉक्टर दिपाली शहा अखंडपणे सर्व पेशंटना अगदी कोविडच्या सुध्दा - त्यांच्याजवळ बसून, हात लावून तपासत आहोत... या शब्द व स्पर्शाने ते लवकर बरे होतात, ही वस्तुस्थिती आहे... अशा घबराट पसरविली जाणार्या काळात पेशंटला भावनिक व मानसिक आधार देऊन आजाराला सामोरं जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, ही काळाची गरज आहे.
- डॉ दिलीप देवधर
०९ जानेवारी २०२२