
13/05/2024
९ महिन्यांचा प्रवास सुखद आणि सुंदर
करणाऱ्या आरोग्यछत्राचा ११ वा वर्धापनदिन !
-
"हजारो मातांचे आशीर्वाद आणि
नवबालकांचं निरागस हास्य हीच आमची प्रेरणा आहे !"
-
आपला विश्वास आणि निरागस आशिर्वाद
हेच आमच्या यशस्वी वाटचालीचे रहस्य आहे !
-
एक -एक होता होता तब्बल ११ वर्षे सरली..
-
१३ मे २०१३ साली दीपक हॉस्पिटल व प्रसूतिगृह नावाचे छोटे रोपटे लावले आणि रुग्णसेवेचा हा " खडतर "..पण मनाला सुखावणारा प्रवास सुरू झाला..या प्रवासात मला आणि डॉ आरती ला मिळालेली "आई वडिलांची" भक्कम साथखूप मोलाची आहे. आज त्या रोपट्याचे एका वटवृक्षात रूपांतर होताना पाहताना एक प्रकारचे समाधान वाटते आहे..
-
साधारण तीन वर्षां पूर्वी आम्ही स्वतःच्या हक्काच्या जागेत स्थलांतरीत झालो आहोत. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह सोनोग्राफी सेंटर आणि २४ तास मेडिकल स्टोअरसह अत्यावश्यक सेवा व सुविधा देण्यासाठी उपलब्ध आहोत.
-
“ गेल्या तीन वर्षात आमच्याकडे पाथर्डीमध्ये प्रथमच दुर्बिणीद्वारे विविध प्रकारच्या ( गर्भाशय व अंडाशयाच्या आणि अपेंडिक्स ) शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या गेल्या. तसेच अत्याधुनिक 3D/4D सोनोग्राफी सुविधा तसेच 2 D ECHO म्हणजेच हृदयाची सोनोग्राफी व हृदयरोग तज्ञांकडून तपासणी सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे.."
हा पल्ला गाठणं नक्कीच सोपं नव्हतं...आणि हे सर्व शक्य झाले ते आमचे स्थानिक डॉक्टर मित्र, हॉस्पिटल चा कर्मचारी वर्ग, अडीअडचणीला रात्रीबेरात्री सुद्धा एका हाकेवर तडक धावून येणारे आमचे भूलतज्ज्ञ डॉक्टर मित्र यांचे आभार कितीही मानले तरी ते कमीच आहे.
.सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आमच्यावर विश्वास टाकणारा आमचा रुग्णपरिवार..
आपल्या आयुष्याचा असल्या नाजूक प्रसंगी आपल्या उपचाराचे निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या वर टाकून आमच्यावर दाखवलेल्या अदम्य विश्वासबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत.
सर्वसाधारण अश्या रुग्णांना पण परवडेल अश्या खर्चात अधिकाधिक अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस अगदी पहिल्या दिवशीपासून होता तो आजही तसाच आहे आणि तो शेवटपर्यंत राहील अशी खात्री आहे.
थोडेफार वाईट आणि "खूप सारे चांगले अनुभव".. हाच विश्वास आणि आपल्या शुभेच्छा सोबत घेऊन आम्ही रुग्णसेवेच्या १२ व्या वर्षात जबाबदारीचे पाऊल टाकत आहोत. आमच्या रुग्णांचा आमच्यावर असलेला हा विश्वासाच आमच्यासाठी टॉनिक च काम करतो आणि त्याच्या जीवावरच अशीच प्रामाणिक रुग्णसेवा पुढील आयुष्यभर करण्याची प्रेरणा आणि ताकद मिळत जाते..
आज या प्रसंगी त्या सगळ्याचे आभार मानण्याची मिळालेली संधी साधत मी त्या सगळ्यांचे आभार मानतो.
आपल्या प्रेमाचे आणि सदिच्छांचे पाठबळ सदैव आमच्यासोबत राहो आणि आपल्या आशीर्वादाने पुढील प्रवासात गगनभरारी घेण्याचे बळ आमच्या पंखात येवो ही अपेक्षा..
-
मनःपूर्वक कृतज्ञता.. सर्वांचे आभार..!!
-
- डॉ. आश्रुबा जायभाये (MBBS)
- डॉ. दीपक आश्रुबा जायभाये ( MBBS, DGO)
- डॉ. आरती दीपक जायभाये (MBBS,MS,DNB)
- श्री. प्रवीण विठ्ठल फुंदे (D.Pharm)
- श्री. प्रदीप विठ्ठल फुंदे ( B.Pharm)
-
निरोगी मातृसुख
देणारं आरोग्यछत्र..!
-
दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह,
सोनोग्राफी सेंटर व 2 D ECHO सेंटर
-
नाथनगर, शेवगांव रोड, पाथर्डी. जि. अहमदनगर.
फोन - 7738567021 , 9356709232
-