ShivGanga Hospital and Research Center

ShivGanga Hospital and Research Center Our aim is to provide best healthcare service at affordable price for everyone in the society.

12/06/2024

आवश्यक:
ड्यूटी डॉक्टर(निवासी डॉक्टर): एम्.बी.बी.एस्./बी.ए.एम्.एस् ./बी.एच्.एम्.एस्.,
फार्मासिस्ट: बी.फार्मा/डी.फार्मा
कृपया संपर्क करा: +91-9545842617

28/09/2023

गेल्या काही महिन्यांपासून मी आजूबाजूच्या गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करत आहे जिथे मी पाहत आहे की बरेच लोक उच्च रक्तदाब(बि.पी.), मधुमेह(डायबिटीस), संधिवात(आर्थ्रायटीस- मान,कंबर,गुडघे) जिथे त्यांना बेडवरून उठताही येत नाही, दमा, मासिक पाळी वेळेवर न येणे(पि.सि.ओ.डी.), हायपो- थायरॉडिस्म आणि अती-लठ्ठपणा अशा गंभीर आजारांनी त्रस्त आहेत आणि या आजारांच्या संभाव्य गंभीर परिणामांबद्दल कोणतेही गांभीर्य न बाळगता सामान्य जीवन जगत आहेत. महत्त्वाचे म्हणजे यापैकी काही रुग्ण उपचार घेत आहेत आणि तरीही त्यांचा बी.पी.(उच्च रक्तदाब) किंवा साखर (डायबिटिस) नियंत्रनात नाही!. हे कसे काय? आपण जी ट्रिटमेंट घेत आहोत ती योग्य प्रकारे लागू होते आहे की नाही हे वेळोवेळी चेक करणे, औषधांचा डोस ॲडजस्ट करावा लागला किंवा औषध बदलण्याची गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तसे करणे या सर्व गोष्टींची काळजी आपण स्वतःच घ्यायला नको का?
या अशा आजारांसाठी अनेक गोष्टी जबाबदार असतात म्हणून मला येथे खोलवर जायचे नाही, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आरोग्य अभ्यासक म्हणून रुग्णांना जागरूक करणं हे माझं कर्तव्य आहे तसेच अशा जीवघेण्या आजारांपासून होणारे संभावित धोके जसे की हार्ट अटॅक, स्ट्रोक, पँरेलेसिस(अर्धांगवायू) टाळण्यासाठी हा सल्ला ऐकणे आणि दैनंदिन जीवनात त्याला लागू करणे हे रुग्णांचे जबाबदारी आहे.
एक डॉक्टर म्हणून त्यांच्यावर उपचार करणे हे माझे कर्तव्य आहे पण जर त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत थोडेसे बदल घडवून आणून जर मी यातल्या काही आजारांवर वेळीच प्रतिबंध करू शकलो आणि या आजारांमुळे होणारे संभाव्य जीवघेणे परिणाम टाळू शकलो तर मला अधिक आनंद होईल. 🙂🙏

27/09/2023

For the past few months I have been conducting free health check-up camps in the surrounding villages where I see many people suffering from high blood pressure (BP), diabetes, arthritis (neck, back, knees) where they can't even get out of bed, asthma, irregular periods (PCOD), hypo-thyroidism and obesity. They are living a normally without having any seriousness about the possible serious consequences of these diseases. Importantly, some of these patients are on treatment and still have elevated BP (high blood pressure) or sugar level (diabetes). How is this possible? Periodically checking whether the treatment you are taking is being applied/working properly, adjusting the dosage of the medication or changing the medication as per the doctor's advice is equally important.
I don't want to go in to depth here as many things are responsible for these diseases. As a health care practitioner it is my duty to make patients aware of such life threatening diseases and treat them accordingly. But it is also the responsibility of the patients to listen to our advices and implement it in their daily life to avoid the possible risks of life-threatening consequences like heart attack, stroke, paralysis etc.
As a doctor i will definitely treat their present medical conditions but i would be more than happy if i can prevent some of these illness/disease & will be able to prevent some of these life threatening consequences by making a small changes in their daily life. 🙂🙏

मी, लठ्ठपणाने त्रस्त अनेक लोकांविषयी ऐकले आणि पाहिले आहे, आणि ते कोणत्याही किंमतीत वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ...
22/09/2023

मी, लठ्ठपणाने त्रस्त अनेक लोकांविषयी ऐकले आणि पाहिले आहे, आणि ते कोणत्याही किंमतीत वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मला वाटतं जोपर्यंत आपण मनाचा निर्धार करत नाही, ठरवलेल्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करत नाही आणि आमले कुटुंब यामध्ये आपल्याला मदत करत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणे अवघड आहे.
शिवाय मला वाटतं, जो सल्ला किँवा योजना तुम्ही फॉलो करणार आहात त्याचा अनुभव तुमच्या अगोदर सल्लागाराला आलेला असावा. बहुधा सल्लागार स्वतः अगोदरच सडपातळ असतात आणि त्यांच्याकडील फोटोज् मधील एकही व्यक्ती आपल्या ओळखीचा नसतो 😀, काही लोक सप्लिमेंट्स प्रमोट करत असतात, काही तुम्हाला लिक्वीड डाएट वर ठेवतात आणि काही तुम्हाला तासनतास जिम मध्ये कार्डियो करायला लावतात ज्यामुळे तुमचे शरीर प्रचंड तणावाखाली राहते. जर तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहायचं असेल तर डाएट, झोप आणि व्यायामाचे योग्य संतुलन असायला हवे.
आपल्यापैकी अनेकांना किंवा आपल्या ओळखीच्या बऱ्याच व्यक्तीन्ना हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, पीसीओडी, संधिवात इत्यादी विविध आजारांनी ग्रासले आहे त्यासाठी आपल्याला ते उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात.
आपण नेहमी ऐकतो.."उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे"..ते खरे असेल तर ते व्यवहारात लागू करायला नको का?

शिवगंगा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या मुख्यपृष्ठावर आपले स्वागत आहे.🙂🙏मी डॉ. श्रीगणेश शिरसाट, एमबीबीएस, एमडी मायक्रोबायो...
24/06/2023

शिवगंगा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या मुख्यपृष्ठावर आपले स्वागत आहे.🙂🙏
मी डॉ. श्रीगणेश शिरसाट, एमबीबीएस, एमडी मायक्रोबायोलॉजिस्ट.
शिवगंगा हॉस्पिटल हे केवळ माझे स्वप्न नाही तर समाजसेवा करण्याचा माझा मार्ग आहे. प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमच्या लँडलाइन (02428) 222533 वर कॉल करा किंवा +91-9545842617 वर कॉल अथवा व्हॉट्सॲप करा. तुम्ही मला shivgangahospital22@.com वर मेल सुद्धा पाठवू शकता.

Address

Pathardi

Telephone

+912428222533

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShivGanga Hospital and Research Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ShivGanga Hospital and Research Center:

Share