
25/03/2025
*पाथर्डी निमा संघटना व श्री विश्वेश्वर ग्रुपच्या रक्तदान शिबिराला जोरदार प्रतिसाद*
संवेदना २ देशव्यापी रक्तदान मोहीम
दिनांक २५ पाथर्डी: प्रतिनिधी
वीर भगतसिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहीद दिन व श्री.विश्वेश्वर मंदिराच्या ६ व्या वर्धापनदिना निमित्त देशव्यापी रक्तदान शिबिर आयोजनामध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, शाखा पाथर्डी व श्री.विश्वेश्वर ग्रुप पाथर्डी यांचे मार्फत येथील,लकार गल्लीतील श्री.बाहेती परिवाराच्या प्रांगणात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात आले. या जगात सर्व काही फॅक्टरीमध्ये बनवले जाते.परंतु मनुष्याचे रक्त बनविता येत नाही. आपल्या देशात सध्या रक्ताचा तुटवडा आहे.त्यामुळे या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी व जनमानसात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी,लोकांना रक्तदानासाठी प्रेरित करता यावे या उद्देशाने
मंगळवार २५ मार्च २०२५ रोजी संपूर्ण देशभरात या शिबिराचे आयोजन केले.शहीद दिनानिमित्त एकच दिवसात एक लाख रक्ताच्या पिशव्या संकलन करण्याचा संकल्प संपूर्ण निमा संघटना यांनी केला होता.
आणि याच मानवतावादी कार्याचे नाव आहे ‘संवेदना २’ या शिबिरामध्ये नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन पाथर्डीचे अध्यक्ष डॉ.श्रीधर देशमुख,सचिव डॉ.सचिन गांधी,ज्येष्ठ सदस्य डॉ.अभय भंडारी,राज्य प्रतिनिधी डॉ.सुहास उरणकर तसेच इतर सभासद पदाधिकारी,श्री विश्वेश्वर ग्रुपचे पदाधिकारी,जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर, डॉ.प्रसाद ईटकर व सहकारी तसेच पाथर्डी मधील सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला.पाथर्डी निमाचे संघटक डॉ.जगदीश मुने व पाथर्डी निमाच्या सदस्या डॉ.सौ.पूर्वा उरणकर यांनीही यात रक्तदान केले.
एकूण ५० जणांनी रक्तदान केले.
या शिबिरासाठी अ.नगर येथील जनकल्याण रक्तपेढीने सहकार्य केले.