23/05/2020
मरणाला रोखणारी
आमची डॉक्टर पोरं,,,,,,!
मस्तं जीन्स,शर्ट,टॉप, पांढरे अप्रोन,गळयात टेथोस्कोप,घालून आपल्या दुनियेत रममाण असणारे भावी आयुर्वेद डॉक्टर मुला मुलींना मी रोज बघत होतो.पातूरच्या आमच्या आयुर्वेद महाविद्यालयात.मीही तेथेच कार्यरत आहे.एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाषण ऐकणारे,कविता ऐकणारे, डी जे वर थिरकायला लावणारी ही उमदी डॉक्टर पोरं भावी आयुष्याचं स्वप्नं येथेच बघत असतात आणि आपल्या जीवनाला रंग भरत असतात. पण ज्या नाजूक हाताने हे रंग भरायचे आहेत ते हातचं आता बेरंग व्ह्यायला लागले आहेत,,,लोक मरणाच्या भीतीने येतात आणि बरेचजण जीवनदान घेऊन परत जातात.हेच बघायला मिळते अकोला जिल्हा रुग्णालयात.कोरोनाच्या महामारीत आमचे शिकाऊ डॉक्टर विध्यार्थी आणि विध्यार्थीनी येथे सेवा देत आहेत.कोरोना मुळे पूर्ण शहर भयग्रस्त आहे.रोज दहा बारा अंक प्लस करून रुग्ण संख्या वाढत आहे.सकाळ झाली की पीपीई किट घालायची,हातात हॅन्डग्लोज,पायात बूट,,पूर्ण शरीर झाकलेल्या अवस्थेत एखाद्या रोबोट सारखे कार्यरत,,,वरून 45 डिग्री च्यावर उन्हाचा तडाखा,,प्रत्यक्ष कोरोना रुग्णावर उपचार,,मनात भीती,धाकधूक,,,एक दिवसा आड जीव सोडणारे एक दोन रुग्ण,,,हे असं कधीच बघितलं नव्हतं,,,आता अचानक जणू आमच्या सगळ्यांचीच परीक्षा ती ही अशी,,माय बापा पासून ,,मित्रपरिवारा पासून दूर,,एक वेगळंच आयुष्य,,,भेदरलेलं असह्य,,,,वेदनादायी!सायंकाळी रुग्णालय परिसरात असलेल्या वसतिगृहात परतल्यावर जेंव्हा शरीर बघतो तर काय ओलेचिंब,घामाच्या धाराच धारा,, डोळेही उद्याचे आशादायी स्वप्नं घेऊन ओलसर,,,अश्या संकट समयी तुम्ही काम करीत आहात,तुमचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. आमचे हे कोरोना वारीयर्स आहेत श्रुती ठाकरे,सैय्यद सालेबा एजाज,स्वप्नील चांदूरकर,अविनाश खैरमोडे,विशाल खारोडे,स्नेहल परमाळे,कामेश लोकेवार,व्यंकटेश सांगळे,संकेत नाखले,,,,,शेतकरी,कष्टकरी माणसांची पोरं!आज अनेकानेक रुग्णांची सेवा देऊन त्यांना जीवदान देतात. हाताचे हॅन्डग्लोज काढल्यावर हात विद्रुप दिसतात ,रेषा पुसट झालेल्या दिसतात,,,,कारण ती साधी पोरं आता राहली नाहीत.देवदूत बनली आहेत,,,,,,,,,,,!
धनंजय मिश्रा,
8668267955
👍🌹👍🌹👍🌹👍🌹👍🌹