08/01/2024
PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम. या परिस्थितीमध्ये अंडाशयात अपरिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. कालांतराने या अंड्यांचे सिस्ट तयार होतो. हा सिस्ट अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून घेतो. या सिस्ट मधून पुरुषी हार्मोन्सचा स्त्राव होतो. परिणामी, मासिक पाळी अनियमित होते आणि असे झाल्याने संपूर्ण जीववनशैली बिघडून शरीरात इतरही विकार उद्भवतात. पी. सी. ओ. डी. ची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात, त्या मधील काही लक्षणे पुढील प्रमाणे
अनियमित पाळी : नेहमीच्या तारखेला पाळी न येणे, किंवा नेहमीच्या तारखेपेक्षा खूप उशिराने पाळी येणे हे पी. सी. ओ. डी. चे प्रकर्षाने जाणवणारे लक्षण आहे. अनेकदा पाळी दोन ते सहा महिने येत नाही. अशावेळी तातडीने डॉक्टरांना दाखवणे अतिशय गरजेचे आहे. पी. सी. ओ. डी. च्या महिलांना पाळी आल्यानंतर रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होतो.
केस गळती : पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये डोक्यावरील केसांच्या गळतीचे प्रमाण आढळते. केसांची योग्य निगा राखून सुद्धा केस गळती होते. पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये पुरुषी हार्मोन्स चे प्रमाण वाढल्याने डोक्याच्या मागच्या भागातले म्हणजेच भोवरा असलेल्या भागातले केस पुरुषांप्रमाणे गळू लागतात.
त्वचेमधील बदल: असंतुलित हार्मोन्स मुळे पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना चेहऱ्यावर, मानेवर तसेच पाठीवर पुरळ येण्याचे प्रमाण वाढते. तसेच मानेच्या मागच्या बाजूला, काखेत, खाजगी भागात काळपटपणा जाणवतो.
वजनात चढउतार: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांमध्ये लठ्ठ असण्याचे प्रमाण अधिक महिलांमध्ये आढळून येते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा वजन कमी होत नसेल तर हे नक्कीच पी. सी. ओ. डी. चे लक्षण आहे.
अतिरिक्त केसांची वाढ: वर सांगितल्याप्रमाणे पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील केसांची गळती होते परंतू, चेहऱ्यावर, पाठीवर, पोटावर, छातीवर केसांची अतिरिक्त वाढ होते.
तीव्र डोकेदुखी: वारंवार डोकेदुखी किंवा अर्धशिशी चा त्रास पी. सी. ओ. डी. च्या महिलांमध्ये आढळतो.
प्रजनन प्रक्रियेत अडथळा: पी. सी. ओ. डी. असणाऱ्या महिलांना गर्भधारण करण्यात अडथळे येऊ शकतात.
मुलींनो जागे व्हा , आणि वेळीच स्वतःच्या वजनाकडे ,पाळी कडे लक्ष द्या . बाहेरचे फास्ट फूड पेक्षा घरचे पालेभाजी ,मोड आलेल्या उसळी ,कच्या कोशिंबरी , ताजी फळे यावर भर दया .नियमित exercise तो कुठल्याही प्रकारचा असो, walking,cycling,Arobics, gym, dance करत रहा व आपले व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने फुलू दया.