09/10/2022
--------------------------------------
*कोजागिरी पौर्णिमा*
*स्पेशल मसाला दूध रेसिपी.*
---------------------------------------
शरद ऋतु सुरू झालाय.
वातावरणात पित्ताची उष्णता वाढायला सुरवात झाली आहे. शरीरात देखील अशीच उष्णता वाढत असते. जसे चुलीत जाळ जास्ती झाला तर चुलीतील एक दोन लाकडे मागे ओढली जातात, तसेच पोटातील उष्णता कमी करण्यासाठी एरंडेल तेल हे सर्वोत्तम औषध आहे.
सर्वसाधारण मोठ्या व्यक्तीला चार ते सहा चमचे एरंडेल पहाटे चार वाजता किंवा रात्री झोपताना घ्यावे. पोट साफ झाले की कोजागिरी साजरी करावी. पोट साफ न करता मसाला दूध प्यायले तर दुधाचेच अजीर्ण होते.
म्हणजे पोट साफ असले तरच कोजागिरी, ही पहिली अट. नंतरच दूध प्यावे.
*Like us on fb*
https://www.facebook.com/profile.php?id=100086189327003
मसाला दूध करताना दूध चंद्रप्रकाशात ठेवून आटवावे असे सांगितले आहे.
चुलीवर, गॅसवर, ओव्हनमधे, उष्णता देऊन नको.
सकाळी मातीच्या मडक्यात देशी गाईचे दुध तापवून घ्यावे. दुध तापवतानाच त्यात एक लिटर दुधाला तीन वेलची पूड, एक लवंग, पाव जायफळ, अर्धा इंच दालचिनी, अर्धा चमचा सुंठ पावडर, आणि १०० ग्रॅम खडीसाखर घालावी. साखर विरघळली, दूध गरम झाले की
उतरून मडक्यात तसेच ठेवावे. कोमट झाल्यावर ते गाळून पुनः त्यात मडक्यात ओतावे. आणि त्यात केशराच्या पंधरा वीस कांड्या घालाव्यात. आणि याला वरून फडका गुंडाळून ठेवावा. याला दादरा बांधणे असे म्हणतात. हे दूध सुरक्षित जागी थेट चंद्रप्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवावे. नेहेमीप्रमाणे सायंकाळी सातला जेवावे. आणि रात्री बारा पर्यंत उपास करावा. चरचरीत भूक लागू द्यावी. तोपर्यंत मित्र मंडळींना सोबत घेऊन आरोग्यावर सकारात्मक चर्चा करावी. मद्यपान, सिगरेट नको हं.
नंतर रात्री बारा वाजता चंद्र डोक्यावर आल्यावर हे दूध घोट घोट सावकाश प्यावे. आटीव दूध हे फक्त टीपीकल पित्त प्रकृतीसाठी ! पण ज्यांना वात आणि कफाचा त्रास असतो, त्यांनी *आटीव* च्या फंदात पडू नये.
*हे खरे मसाला दूध.*
दुधात बदाम, काजू पेस्ट, काॅर्नस्टार्च, असे काही वापरू नये. पचायला जड होते. बेदाणे आणि मनुका तर अजिबातच नकोत.
*सर्वांना सुखकर आणि आनंद देणारे होवो, हीच कोजागिरी*
https://www.facebook.com/profile.php?id=100086189327003
🌱✨🌱✨🌱✨🌱✨🌱
Holistic center for living sustainable, peaceful and happy life with simple but like minded community