26/11/2024
" *आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५* "
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त दर वर्षी आपण आपली फलटण मॅरॅथॉन चे आयोजन करत असतो . या वर्षी ७ वे वर्ष आहे . दर वर्षी लोकांचा उत्साह वाढतच आहे.
लोकांना व्यायामाची सवय लागावी , सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहावे या शुद्ध हेतूनेच आपण ही मॅरॅथॉन सुरू केली आहे. दर वर्षी आपण एक मोठी हस्ती बोलावून त्यांचे सर्वांना मागदर्शन आणि त्यांच्या हस्ते मॅरॅथॉन ची बक्षीस वाटप असा उपक्रम आपण घेत असतो .
आत्ता पर्यंत डॉ शरद हर्डीकर ,माननीय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ, आयपीएस विश्वासराव नांगरे पाटील , खासदार अमोल कोल्हे, डॉ प्रकाश बाबा आमटे, सौ मंदाकिनी आमटे , कीर्तनकार चारुदत्त आफळे , आयपीएस कृष्ण प्रकाश या सर्व लोकांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे .
यावर्षी आपल्याला लाभले आहेत -
नाटककार ,अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, बिग बॉस फेम आणि सेलिब्रिटी
*श्री महेश मांजरेकर जी.*
श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी आणि विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून ते येणार आहेत.
*5 जानेवारी 2025* रोजी *सकाळी ६ वाजता* *सजाई गार्डन* येथून सुरू होणाऱ्या
"आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५ " चा
*Flag off* ते इतर मान्यवरांच्या हस्ते करणार आहेत.
त्याच दिवशी Robotic Knee Replacement केलेले ३०० हून अधिक patients ची ३ कम ची Walkethon चे उद्घाटन पण ते करणार आहेत. अशी अनोखी Walkethon भारतात पहिल्यांदाच होते आहे .
एकूण ३ categories मध्ये पुरुष व महिला असे प्रत्येकी पाहिले तीन क्रमांकांना बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहेत.
पहिले बक्षीस :- ₹१००००
दुसरे बक्षीस :- ₹७०००
तिसरे बक्षीस:- ₹५०००.
अशी सर्व मिळून १८ बक्षिसे दिली जाणार आहेत .
मॅरॅथॉन पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक फिनिशर मेडल🥇 दिले जाणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या runners ना प्रत्येकी एक मॅरॅथॉन किट दिले जाणार आहे , की ज्या मध्ये Time chip Bib , T shirt , Energy Bar , टोपी आणि एक surprise gift असणार आहे.
तरी मित्रांनो कृपया आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५ मध्ये आपला सहभाग नोंदवा आणि तुमच्या आयुष्याचा निरोगी आणि आनंदी प्रवास सुरू करा.
नोंदणी करण्यासाठी
*www.joshihospitalpvtltd.com*
या वेबसाईट ला जरूर भेट द्या.
नोंदणी शुल्क ₹७५०/- फक्त.
*नोंदणीची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2024 ही आहे.*
मग वाट कशाची बघताय . चला नोंदणी करा 👍
धन्यवाद🙏
आपला विनम्र
आपली फलटण मॅरेथॉन संघ
फलटण रोबोटिक्स सेंटर
जोशी हॉस्पिटल प्रा ली फलटण
🙏🙏
An orthopaedic organisation catering complex trauma,Joint replacement and spine surgeries. largest se