10/06/2023
*थायरॉईड विकार - मोफत शिबिर*
*रविवार दिनांक 11/06/2023 सकाळी 8 ते दुपारी 2 वाजे. पर्यंत.*
हे शिबिर कोणासाठी ?
सर्व रुग्ण विशेषत: स्त्री रुग्ण ज्यांना पुढील लक्षणे आहेत.
*अचानक वजन वाढणे / कमी होणे
*सर्व अंगावर / चेहऱ्यावर/ दोन्ही पायावर सूज असणे
*मासिक पाळीचे विकार , केस गळणे/ भूक मंदावणे
*अती चिडचिड होणे / मानसिक ताण तणाव/ झोप न येणे/ अती झोप येणे, अनुत्साह जाणवणे.
*छातीत धडधड होणे / भीती वाटणे.
अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आपल्याला थायरॉईड विकार तर नाहीत ना? या साठी मोफत शिबिरा मध्ये आवश्य भाग घ्यावा
*शिबिरातील सुविधा*
मोफत रुग्ण तपासणी, मोफत आहार सल्ला आणि मार्गदर्शन.
थायरॉईड विकाराचे निदान ज्या व्दारे होते ती Thyroid Function Test, केवळ रुपये 250/- मध्ये उपलब्ध.
आधुनिक शास्रानुसार थायरॉईड हा एक अंत स्त्रावी ग्रंथी आणि बरेच वेळा auto immune disease स्वरूपाचा विकार असून आयुर्वेद नुसार याचे मूळ कारण हे सदोष आहार, बदललेली जीवन शैली, चुकीची दिनचर्या, मानसिक ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव या मध्ये आहे. अशा रुग्णामध्ये वरील कारणांमध्ये बदल करून आयुर्वेद औषधी योजना व पंचकर्म चिकित्सा केल्यास रुग्णाच्या तक्रारी लवकर कमी होतात.आणि थायरॉईड लेवल( TSH) पण कमी होतात.
विशेषत: आधुनिक चिकित्सा घेऊन थायरॉईड लेवल नियमित असून ही लक्षणे / तक्रारी कमी होत नाहीत अशा रुग्णामध्ये आयुर्वेद चिकित्सा खूपच उपयुक्त.
गेल्या १२ वर्षा पासून थायरॉईड विकाराच्या अनेक रुग्णांना आयुर्वेद चिकित्सेने फायदा झालेला आहे आणि अनेक रुग्णामध्ये आधुनिक चिकित्सा न घेता पण थायरॉईड विकार नियमित ठेवण्यात यश आलेले आहे
तेव्हा ज्यांना पूर्वी पासून थायरॉईड विकार आहे किंवा वरील लक्षणे असल्यास या मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यवा..
धन्यवाद
डॉ अनिश पंडित MD(आयु.)
आत्रेय आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
मोनिता विश्व फेज 2,डी.एड कॉलेज चौक , फलटण.
*संपर्क: 8446550733/7588380542*