
24/06/2025
नमस्कार,
आजकाल जो खोकला होतो तो खूप महिने चालतो थांबायचं नावच घेत नाही असं अनेक रुग्णांकडन मी ऐकलं. मध्ये अँटिबायोटिक घेऊन झालेलं असतं अनेक घरगुती उपाय केलेले असतात तरी पाहिजे तेवढा असा फरक पडत नाही. शेवटी रुग्ण कंटाळून सगळेच औषध बंद करतो. अशीच एक केस मी आज सांगणार आहे.
ज्या रुग्णाची केस मी तुम्हाला सांगते ती गेले दोन वर्षापासून माझं औषध घेते आहे वेगवेगळ्या आजारांसाठी. अचानक एक दिवस त्यांनी मला संपर्क केला. हिवाळ्यातले दिवस असावे कोरडा खोकला काही केल्या बसतच नव्हता. त्यांनी मला सांगितलं त्यांनी अँटिबायोटिक घेतलं, सिरप घेतलं,काढे घेऊन झाले पण काही विशेष फरक पडत नाही.
डॉक्टर कडे गेल्यानंतर त्यांनी छाती तपासली तर सांगितलं छातीत काहीच नाहीये. सर्व लक्षणे समजून मी होमिओपॅथी.औषध त्यांच्या घरी पाठवले. बरेच महिन्यापासून चाललेला जो खोकला होता तो महिन्याभराच्या आतच ठीक झाला.
कधी कधी खोकला हा तुमचा श्वसनाशी संबंधित नसून पित्ताची संबंधित पण असू शकतो होमिओपॅथी तुम्हाला या दृष्टीने नक्की मदत करू शकते.
Hello,
I have heard from many patients that the cough that occurs these days lasts for months and does not stop. Even if it is treated with antibiotics, many home remedies are tried, but it does not make the desired difference. Finally, the patient gets tired of all the medicines and stops them. I am going to tell you one such case today.
The patient whose case I am telling you about has been taking my medicine for the past two years for various ailments. Suddenly one day, he contacted me. It must have been a winter day, and his dry cough was not getting better. They told me they took antibiotics, syrup, and ointments, but it didn't make much difference.
After going to the doctor, he checked his chest and said there was nothing in chest. Understanding all the symptoms, I sent homeopathic medicine to his house. The cough that had been going on for many months got cured within a month.
Sometimes your cough may not be related to your breathing but to your bile. Homeopathy can definitely help you in this regard
Thanks and regards
Dr Ishwari Joshi Nanoti
MD Homoeopath
Mauli Homoeopathy Online Clinic
8793467271