18/04/2022
*गुडघा निरोगी राहण्यासाठी काही उपाय*
*सततची धावपळ, व्यायामाचा अभाव, फास्टफूड चे अतिप्रमाणात सेवन, शिळे, बेकरीचे पदार्थ-वातवर्धक पदार्थांचे अतिसेवन यामुळे पुर्वी साठी नंतर आढळणारा गुडघेदुखी सध्या तिशीतच त्रस्त करायला लागला आहे.*
*वयानुसार गुडघ्याच्या भोवतीचे कार्टिलेज हळूहळू झिजूनही जाते. शेवटी आपल्या मांडीचे हाड नडगीच्या हाडाशी घासू लागते. गुडघा दुखत राहतो. सुजतो व बेजार करून सोडतो.*
*गुरुत्वाकर्षणाविरुद्ध गुडघा वापरला (उदा जिने चडणे, जमिनीवर बसून उठणे इ.) तर प्रचंड वेदना होऊ लागतात. पाय धनुष्याकृती होत जातात. यालाच सामान्य माणूस ‘संधिवात’ म्हणतो. जेव्हा सांधा पूर्ण खराब होतो तेव्हा तो शस्त्रक्रिया करून बदलला जातो. परंतु या शस्त्रक्रियेआधी काही उपचार आहेत.*
*आपला गुडघा निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत का की जेणेकरून तो बदलण्याची वेळ येणार नाही?*
*📕 सगळ्यात आधी योग्यत्या योग वैद्यक कडून गुढघे दुःखी वरील योगोपचर सुरू करणे.कधी कधी पाठीच्या कण्याच्या आवस्थेमुळे सुद्धा गुढघ्यावर ताण येतो त्यावर इलाज सुरू करावा*
*अचानक कोणाचेही वजन कमी होऊ शकत नाही त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम तज्ञांच्या मदतीनेच बदल करावे अन्यथा स्नायूंची क्षती होते व आणखीन त्रास होतो*
*📕शक्यतो डॉक्टरी सल्ल्याशिवाय वेदनाशामक गोळ्या घेऊ नयेत.*
*📕प्रचंड वेदना नसतील तर वेदनाशामक तेल किंवा मलम लावावे.*
*📕गरमपाण्याच्या पिशवीने गुडघा शेकावा.*
*📕वृद्धापकाळात काठी वापरावी, त्याने गुडघ्यावरचा भार कमी होतो.*
*📕उत्तम प्रतीची पादत्राणे वापरल्यानेसुद्धा गुडघा सुस्थितीत राहतो.*
*📕गुडघा दुखी असणाऱ्यांनी काही दिवस फक्त शौच्यासाठी वेस्टर्न भांडी किंवा खुर्ची वापरावी.*
*📕 मांडी घालून बसण्याची सवय सोडू नये ही मनुष्याचे वैशिष्ट्य आहे*
*📕याशिवात आयुर्वेदिक फायटोजेलचे पंचकर्मांचा वापर केला असता गुडघा दुखी कमी होऊन गुडघे मजबूत होतात.*
*📕वजन कमी करणे व आहारातील पथ्ये व नियमित व्यायाम याने गुडघे दुखी कायमची बरी करता येते.*
*!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!*