16/09/2022
*बस्ति चिकित्सा*
☔☔☔☔☔☔☔☔☔
मैत्रिणींनो पावसाळ्यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढू लागले असेल.
पावसाळयात वाताचा प्रभाव वाढू लागतो, हवामानातील रुक्षता वाढते त्यामुळे स्वभावताच वाताचे प्राबल्य वाढते अशा परिस्थितीत *शरीरामध्ये देखील वातदोष वाढायला लागतो*.
पावसाळयात वात दोष वाढू नये म्हणून आपण काय केले पाहिजे.
🌱🌱आपण घ्यावयाच्या काळजी 🌱🌱
1) *अभ्यंग*
दररोज अंगाला तेल लावून मसाज करून आंघोळ करणे यामुळे शरीरात वाढ वाढणाऱ्या वातदोषाला अटकाव होतो.
2) *कोष्ण जल*
दररोज कोमट पाणी प्यावे .
शक्यतो बाहेरील पाणी पिऊ नये कारण वर्षा ऋतूमध्ये पाण्यात आम्लता आलेली असते आम्लतेच्या गुणधर्मामुळे ते पाणी पचावास हलके नसल्याने पाणी गरम करूनच प्यावे.
3) *सकस आहार*
बाहेरील चमचमीत पदार्थांचे जेवण टाळावे यामुळे पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारींवर आपण कंट्रोल करू शकतो
रोज रात्री शक्य तितका हलका आहाराचे सेवन करावे.
4) *व्यायाम*
सूर्यनमस्कार , कवायत, चालणे, प्राणायाम,योग ई. सहज सोपे व्यायाम वेळ काढून करणे.
5) *पंचकर्म*
स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्म बस्ती चिकित्सा करून घ्यावी. आयुर्वेदामध्ये असं म्हणतात वर्षा ऋतू सुरू झाला की बस्ती द्यावा, बस्ती घ्यावा, सर्वांनी बस्ती घ्या.
तर असं का ते आपण पाहूयात बस्तीला आयुर्वेदानुसार *अर्धचिकित्सा* असं म्हटलेलं आहे
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
"वातोल्बणेषु दोषेषु वाते वा बस्तिरिष्यते । उपक्रमाणां सर्वेषां सोऽग्रणीस्त्रिविधश्च सः ॥ १ ॥ "
वातादिक दोषांवर किंवा केवळ वातावर बस्ति हितकारक आहे. तो *सर्व प्रकारच्या चिकित्सेमध्ये श्रेष्ठ* असून त्याचे निरूह, अनुवासन व उत्तर बस्ति असे तीन प्रकार आहेत.
म्हणजे सर्व पंचकर्म चिकित्सा एका बाजूला आणि फक्त बस्ती पंचकर्म एका बाजूला इतकं महत्त्व बस्ती या चिकित्साला देण्यात आलेला आहे.बस्ती चिकित्सामुळे आपण वातावर जय मिळवतो. त्याचा अर्थ असा की आपल्या शरीरात होणाऱ्या सगळ्या हालचाली चलन वलन हे वाताशी निगडित असतं
वातदोषमुळे इतर दोन दोषांचे कर्म ठीकप्रकारे होऊ शकते. पित्त व कफदोषाची कामे सुद्धा वातदोषावरच अवलंबून आहेत म्हणून वातावरील श्रेष्ठ चिकित्सा बस्ती याला इतके प्राधान्य देण्यात आले आहे.
🌱🌱🌱🌧️🌧️🌧️🌱🌱🌱
*बस्ती म्हणजे काय?*
"बस्तिना दियते इती बस्ति।"
बस्तिने दिली जाते म्हणजे बस्ति .जुन्या काळामध्ये प्राण्यांचे बस्ति (bladder)वापरून बस्ति दिला जात होता त्याला बस्ति चिकित्सा असे म्हणतात.
आता ती पद्धत बदलून त्याच्या जागी सिरिंज किंवा बस्ती पॉटने बस्ती दिला जातो.
अभ्यंग व स्वेदनपूर्वक मलद्वारातुन औषधी काढे व तेल देऊन दुषित दोषांना शरीराबाहेर काढुन शरीर शुध्दी करणे म्हणजे बस्ती.
🌱 *कोणी करावे?*🌱
आयुर्वेदानुसार स्वस्थव्यक्तीसाठी आणि रोगी व्यक्तीसाठी असं दोन्ही प्रकारे पंचकर्म सांगितलेले आहे स्वस्थ व्यक्तींनी पंचकर्म करताना ऋतूनुसार पंचकर्म करावे असे सांगितलेले आहे आता ऋतू नुसार म्हणजे काय तर ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या दोषाचा प्रकोप असेल तो दोष निरहरण करण्यासाठी केलेले पंचकर्म.
जसं की,
>शरद ऋतूमध्ये पित्तासाठी विरेचन रक्तमोक्षण
>वर्षा ऋतूमध्ये बस्ती मन्याबस्ती कटीबस्ती इत्यादी
>वसंत ऋतु मध्ये वमन हे पंचकर्म सांगितलेले आहेत.
🍀🍀🍀 *रोगी व्यक्तीसाठी*🍀🍀🍀
- पॅरेलिसिस
- गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचे विकार,
-संधिवात, वातरक्त, आमवात
-गुल्म, पोटफुगी, अतिरिक्त पोटावरची चरबी( abdominal disturbance, obesity)
-पडसें (upper respiratory infection)
-शुक्र, वात व मल यांचा अवरोध,मलावष्टंभ (constipation, pcod, menstrual problems, infertility issue )
-अश्मरी (stone)
-रजोनाश ( स्त्रियांचा विटाळ बंद होणें ) (menopause syndrome)
- जुनाट वातरोग .
यामध्ये *स्थानिक बस्ती* पण वेगवेगळे केले जातात जसं की हृदयबस्ती , मन्याबस्ती, जानूबस्ती, कटीबस्ती.
🍀🍀मन्याबस्ति (ग्रीवा बस्ति)🍀🍀
या उपक्रमामध्ये मानेच्या ठिकाणी पाळे तयार करुन काही वेळे पर्यंत औषधी तेल पकडुन ठेवले जातात.
उपयोग: स्पाँडिलायटीस, मान आखडणे, दोन्ही हातास मुंग्या येणे,
🍀🍀जानुबस्ती 🍀🍀
गुडघ्याभोवती जानुबस्ती यंत्र लावुन त्यात औषधी तेल विशिष्ट काळ ठेवणे
उपयोग: संधीवात, सांध्याचीझीज होणे, गुडघेदुखी, कुर्चीका ईजा इ.
🍀🍀कटी बस्ती🍀🍀
या उपक्रमामध्ये कंबरेच्या ठिकाणी विशिष्ठ पध्दतीनेकेलेल्या पाळ्यामध्ये काही वेळ पर्यंत औषधी तेल पकडुन ठेवले जाते याशिवाय औषधी तेलांच्या धारा केल्या जातात.
उपयोग: स्पाँडिलायटीस, कटीस्तंभ,
कंबरदुखी, स्लिपडिस्क, सायटिका, पायास मुंग्या येणे,
पाय जड होणे इ.
पंचकर्म उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावेत. त्याने दुष्पपरिणाम होत नाहीत. हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर पंचकर्म उपचार वर्षातून किमान एकदा तरी करून घेतलाच पाहिजे.
क्रमशः
धन्यवाद!!!!
*सार्थ आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, रहाटणी*
*वैद्य योगिता थिटे*
*9420270093*
*MD Ayurved*