
15/07/2025
तुम्ही खऱ्या सोबतीच्या सोबत आहात.
कसे?
तर...
@घर म्हटलं की एकमेकांचा विचार मनात येतो.
@सोबत असताना सुरक्षित वाटतं.
@सोबतीने पूर्णत्वाचा भास होतो.
@कुणी दुसरंच असल्याचं ढोंग करण्याची गरज पडत नाही.
@संगतीचे क्षण आपोआप आनंदी होतात अन् चिरकाल राहतात.
@तोच तोचपणाच्या कंटाळवाण्याला बदलाची झालर दिली जाते.
@मुलांच्या असण्याबरोबरच केवळ एकमेकांचा सहवासही फुलवला जातो.
@वैयक्तिक गुपितांच्या आदराबरोबरच संयुक्तिक- एकमेकांशी निगडीत अशा गोष्टींच्या मोकळेपणाला अधिक महत्त्व दिले जाते.
@मतभेद आणि युक्तिवादाचं पर्यवसान एकमेकांचा अनादर आणि कडवटपणात होत नाही.
@आकर्षकता व सुंदरता यांचा समन्वय विचारांच्या एकरुपतेशी वा निदान जवळपास तरी होतो.
@प्रणयासाठी व त्यासंदर्भातील विचार, संमती ही परस्पर पूरक ठरून त्याचे भान व आदर ठेवला जातो.
@आपल्या संसारासोबत असलेल्या इतरही सर्व गोष्टी या सहवास अधिक प्रेममय बनवण्यासाठी आहे अशी प्रत्येक क्षणी जाणीव असते.
@दिवसातून एकदातरी कुठल्याही मार्गाने का होईना प्रेम व्यक्त केले जाते.
😍