
15/07/2025
ाराष्ट्र ाराष्ट्र_माझा_गर्जा_महाराष्ट्र_माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
॥धृ.॥
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरति पाणी, मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या, यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
॥१॥
भिंती न आम्हां तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
सेनापती बापट:-
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले
मराठ्यां विना राष्ट्र गाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा