
23/12/2024
*डिप्रेशनला डिप्रेस करणारी ती*
परवा मी एका अनोख्या रुग्णेला भेटले. तिचं नाव आपण "रुद्रा" पकडूयात. अल्पवयात वडिलांचा मृत्यू आणि त्यामुळे आलेली भरपूर संपत्ती या गोष्टीमुळे तिच्यावर नातेवाईकांचे प्रेशर खूप आले, तसेच लव मॅरेज केले म्हणूनही त्रास आणि या सगळ्या त्रासाचा परीणाम म्हणून वयाच्या तीशीत तिची बायपास झाली, अनेक आजार आले आणि ती डिप्रेशन मध्ये गेली. सहा महिन्यांमध्ये दोन ते तीन वेळा तिने सुसाईडचाही प्रयत्न केला. ती मला सांगत होती की "मॅडम एकदा मी बसलेली असताना विचार केला, माझं काय चुकतंय?ह्या लोकांमुळे मी का डिप्रेशन मध्ये जावं? मग दुसऱ्या दिवशी मी त्या सगळ्यांना, जे लोक मला pressurise करत होते त्या सगळ्यांना घरी बोलावले, माझ्यासमोर बसवले आणि सांगितले तुमच्या प्रत्येकाच्या नावाची सुपारी देईन, एकेकाला पाच-पाच हजारात उरकेन. याच्यापुढे जर माझ्या वाटेला लागले तर तुमची वाट लावेल" 😂
आणि त्या दिवसानंतर तिला कुठलीही गोळी घेण्याची गरज पडली नाही (हार्ट साठी तिची जी काही औषधे सुरू आहेत, ती सोडून)
तिला बघून मला हे जाणवलं की बऱ्याच वेळा आपण आजार ओढवून घेत असतो, आवश्यक नसताना गरजेपेक्षा जास्त ताण घेऊन आपण आयुष्य निराश करतो. जेव्हा परिस्थितीची खरी जाणीव होते तेव्हाच आपण आनंदी राहू शकतो.
जाताना ती मला बोलून गेली "मॅडम मी तुमच्यासारखं बोरिंग लाईफ नाही जगू शकत. मला ना लाईफ हॅपनिंग पाहिजे आणि लाईफ मध्ये तरच जगण्यात अर्थ आहे. काहीतरी राडा झाला की मगच लाईफ हॅपनिंग होतं"
मी हसून तिला हात जोडले.😀
Dr. Shraddha Shalgar
Pune