
02/02/2025
चिया सिड्सला मराठीत "चिया बिया" किंवा "चिया बियाणे" असे म्हणता येईल. मात्र, याला विशिष्ट पारंपरिक मराठी नाव नाही, कारण हे बियाणे भारतात नवीन आहेत.पण बरेच डायटिशियन हे घेणयाचा सल्ला देतात ..मुख्य वजन कमी करण्यासाठी ...आनेक फायदे आहेत चिया सिड्सचे
चिया सिड्स (Chia Seeds) हे सुपरफूड म्हणून ओळखले जातात आणि त्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. त्यांचे विविध आरोग्यदायी फायदे
चिया सिड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास मदत करते
हे सिड्स पाण्यात भिजवल्यावर जेलसारखे होतात आणि पोट भरल्याची भावना निर्माण करतात, त्यामुळे भूक कमी लागते.
मेटाबॉलिझम सुधारतो आणि चरबी कमी करण्यास मदत होते.
ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् भरपूर प्रमाणात असते
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरतात
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते .
त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त
साखर नियंत्रणात ठेवते (डायबेटिससाठी फायदेशीर)
प्रथिने (Protein) आणि हेल्दी फॅट्स असल्यामुळे दिवसभर उर्जा टिकून राहते.
खेळाडूंना आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर ठरतात.
तणाव आणि नैराश्य दूर करण्यास मदत होते.
चिया सिड्स कसे खाल्ले पाहिजेत?
दुधात किंवा पाण्यात भिजवून
स्मूदी, योगर्ट किंवा ज्यूसमध्ये मिसळून
ओट्स किंवा सालडमध्ये टाकून
शेक, डिटॉक्स ड्रिंक्समध्ये वापरून
सावधगिरी
प्रमाणाबाहेर सेवन केल्यास पचनाच्या तक्रारी होऊ शकतात.
सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मी वाचलेली व ऐकलेली माहिती दिली आहे ...
चिया सिड्स नियमित आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. मी गेली चार महिन्या पासुन सेवन करत आहे वजन कमी नाही पण इंच लॉस होत आहे .....
म्हणून तुमच्या बरोबर शेयर केले
कुठल्याही सुपरमार्केट मध्ये कमी किंमती मध्ये मिळतात किंवा आनलाईन हि मिळतात अमेझॉन वर वगैरे...