"
जर अनेक ठिकाणी नाव नोंदणी करून लग्न जमत नसेल किंवा खूप ठिकाणी पैसे भरून वाया गेले असतील तर या पुढे कोणत्याही वधु वर सूचक केंद्रात नाव नोंदणी करताना पुढील गोष्टी लक्षात घ्या. अभ्यास करा आणि मग योग्य तो निर्णय घ्या.
1) कोणत्याही वधु वर सूचक केंद्रात नाव नोंदणीची गरज का पडते ?
घरात जेव्हा कोणाच्याही विवाहाची बोलणी सुरु होतात तेव्हा सर्वात आधी नातेवाईक आणि मित्रपरिवारात सांगितले जाते आणि तिथून य
ेणाऱ्या स्थळांना भेटण्याचा कार्यक्रम सुरु होतो. पण या ठिकाणी विवाह जमत नाही असे जेव्हा लक्षात येऊ लागते तेव्हा आपण थोडे निराश हि होतो पण असे निराश होण्याची खरचं गरज असते का ? कारण विवाह न जमण्यामागे खूप कारणे असतात त्यातील एक म्हणजे कदाचित आपल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील असे एकही स्थळ आपल्या ओळखीत किंवा नात्यात नसेल !. हे लक्षात आल्यानंतर मग आपण संस्थांचा आधार घेतो कारण आपल्याला आपल्या मनासारखे स्थळ हवे असते .. पण मनासारखे म्हणजे नक्की कसे ? याचा विचार तुम्ही करता का ? "जेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखे एखादें स्थळ मिळेल तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनासारखे तुम्ही असाल का "? जेव्हा तुम्ही नावनोंदणी साठी विचार करता तेव्हा सर्वात आधी तुम्ही हे समजून घ्या कि , तुमचे प्रोफाइल विशेष आहे. मग आपले प्रोफाइल विशेष का आहे याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यात खूप गोष्टी येतात जसे कि, पत्रिका , कुटुंब , शिक्षण , उत्पन्न , व्यक्तिमत्व , अपेक्षा , राहणीमान , स्वभाव , विचार , जगण्याची पद्धत , मानसिक तसेच शारीरिक आरोग्य , ई , ई ... यातील नेमकी तुमची अडचण कोणती आहे आणि अशा अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे विवाह जमण्यात अडचणी येत आहेत हे समजून घेण्यासाठी आजच आमच्या समुपदेशकांशी बोलून घ्या हि सेवा वधु वर पसंती संस्था मोफत देत आहे समुपदेशनासाठी पुढील लिंक वर क्लीक करून आता लगेच अपॉइंटमेंट बुक करून घ्या. https://forms.gle/AvQeiew9s1WgDQRM9
2) विवाह म्हणजे तडजोड असे म्हंटले जाते !
विवाह म्हणजे तडजोड हे सत्य आहे. मग आपण कितपत तडजोड करू शकतो ? किंवा करू शकत नाही ? याचा विचार व्हायला हवा. तडजोड करू असे म्हणणे आणि प्रत्यक्षात स्थळ समोर आल्यावर तडजोड करणे यात खूप फरक असतो. या जगात कोणीही परिपूर्ण नसते आपल्यातील कमतरतांचा विचार करणे हि आवश्यक असते. जर हा विचार योग्य वयात नाही केला तर पुढे म्हणजे वय निघून गेल्यावर कोणत्याही तडजोडी करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून योग्य वयातच काय काय तडजोडी करायच्या हे ठरवून घ्या.
3) आपल्या अपेक्षा अ-वास्तव तर नाहीत ना ?
स्वअभ्यास (स्वतःचे शिक्षण , व्यक्तिमत्व , कौटुंबिक परिस्थिती , उत्पन्न, इ इ इ ... ) या सर्वाचा अभ्यास करूनच मग आपल्या अपेक्षा ठरवल्या आहेत ना ? कारण अपेक्षा करणे चूक नाही पण अवास्तव अपेक्षा करण्याने आपणच स्वतःला नकळत निराशेच्या गर्तेत ढकलत असतो. जिथून बाहेर पडणे एका वेळेनंतर अशक्य आहे जर तुम्हाला समजत नसेल तर आमच्या समुपदेशकाची भेट घ्या. कोणताही निर्णय तटस्थपणे घेता यायला पाहिजे भावनिक पणे घेतलेले काही निर्णय त्रासदायक हि ठरू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक पाऊले उचला. तुमचं लग्न जमविण्यासाठी सर्वात आधी वधु - वर यांनी स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ही आणि आमची वधु वर पसंती संस्था कायमच तुमच्या सोबत आहे.
4) पत्रिका पाहताना कितपत खोलात जावे ?
पत्रिका जरूर पहावी पण पाहताना कितपत खोलात जायचे याची मर्यादा हि ठरवून घ्यायला पाहिजे कारण नशीब बदलणे आपल्या हातात नसते मार्गदर्शन घेऊन त्यातून मार्ग काढणे आपल्या हातात असते . प्रत्येक अडचणीवर मात करायला पर्याय असतातच .... फक्त नकार द्यायला कारण म्ह्णून पत्रिकेचा आधार घेत असाल तर गोष्ट वेगळी आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात खूप फरक आहे आमचे ज्योतिषशास्त्रज्ञ आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचा आधार न घेता अगदी व्यावहारिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यास सज्ज आहेत. पत्रिका पाहणे चूक नाही पण practiclly त्याच्या किती आहारी जायचे हे कळायला पाहिजे. मोफत मार्गदर्शनासाठी पुढील लिंक वर क्लिक करून माहिती भरा https://forms.gle/AvQeiew9s1WgDQRM9
5) आपण ज्या संस्थेत नाव नोंदवणार आहोत त्यांचे ऑफिस कुठे आहे का ?
जर ऑफिस तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कामाची पद्धत समजून घेऊ शकता. कोण-कोणत्या सेवा ते तुम्हाला देणार आहेत याची सविस्तर माहिती घ्या तसेच त्यांचे इतर किती वधु वर संस्थांसोबत काम सुरु आहे हे पहा कारण एकाच ठिकाणी सर्व लोक नाव नोंदणी करत नाहीत हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टीचा विचार करून अंदांज घेऊ शकता कि या लोकांकडून आपले काम होऊ शकेल का ? १० ठिकाणी जाऊन पैसे भरण्यापेक्षा काही ओळखीच्या आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटून योग्य वाटणाऱ्या ठराविक संस्थामध्येच पैसे भरा आणि त्याच्या संपर्कात रहा. नोंदणी करून विसरून जाऊ नका.
6) संस्था फक्त ऑनलाईन असल्यास पैसे भरणे कितपत योग्य याचा विचार केलाय का ?
मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फ्रॉड होत आहेत त्या पासून सावध रहा . भूलथापांना बळी पडू नका. तुमच्या अपेक्षांमध्ये बसणारी स्थळे आता तयार केली जाणार नाहीत हे लक्षात घ्या. उपलब्ध स्थळाच्या साठ्यातूनच तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्यामुळे ऑनलाईन पैसे भरताना खात्रीशीर व्यक्ती असल्याशिवाय पैसे भरू नका . संभंधित संस्थे कडे आजच्या दिवशी तुमच्यासाठी किती valid स्थळे उपलब्ध आहेत ? हे विचारून घ्या त्यांची माहिती मागवून घ्या संपर्क क्रमांक नाही दिला तरी चालेल पण सदर स्थळे valid आहेत याची खात्री करून घ्या . ४ वर्षांपूर्वी चे biodata नाहीत ना हे पाहून घ्या. खात्री करून घ्या. मग पैसे भरा.
कारण लग्न जमेपर्यंत प्रयत्न करत राहणे हे जरी आपले काम असले तरी देखील तुम्ही नाव नोंदणी साठी किती खर्च करायचा याचे बजेट ठरवून घ्या. १० - १२ स्थळांच्या यादीसाठी ५००० ते १०,००० भरणे कितपत योग्य आहे याचा विचार करा . संस्थांसोबत करार करा लग्न जमवून दिल्यानंतर काही शुल्क भरू आणि आधी एक ठराविक रक्कम देऊ जी तुम्ही ठरवली असेल. कारण ते तुमच्यासाठी काम करणार स्वतःचा वेळ देणार तर त्यांना हि काही मोबदला मिळायला पाहिजे फक्त ते प्रयत्न करत आहेत हे तुम्ही स्वतः त्यांच्या संपर्कात राहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही.
7) फेसबुक , व्हाट्सअप आणि टेलिग्राम वर बरेच फ्री ग्रुप तयार झाले आहेत त्यात नाव नोंदणी करून जर फसवणूक झाली तर तुम्ही काय करणार ?
आजकाल समाजसेवा म्हणून खूप लोकांनी मोफत वधु - वर ग्रुप तयार केले आहेत त्यांचा हेतू निश्चितच चांगला आहे पण त्या हेतूचा जर कोणी गैरफायदा घेतला तर तुमचे झालेले नुकसान कोण भरून काढणार ? कोणाला हि स्वतःची वैयक्तिक माहिती पाठ्वण्याआधी थोडा विचार करा भावनेच्या आहारी जाऊन घाई करून चुकीच्या हातात तुमची माहिती जाऊ देऊ नका. नशिबात असते ते घडतेच पण म्हणून कसे हि वागून स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. घटना घडल्यानंतर कोणत्याही चर्चेला काही हि अर्थ नसतो त्यामुळे काळजी घ्या .
कोणत्याही संस्थेत पैसे भरण्याआधी वरील सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करा . पैसे भरल्यानंतर कोणालाही दोष देऊन काही उपयोग नसतो . कोणालाही तुम्हाला फसवायचे नसते पण जर तुम्ही क्लिअर नसाल कि तुम्हाला काय पाहिजे ? आणि तुम्ही नक्की काय शोधताय किंवा तुम्हाला कुठे थांबायचं तर तुम्हाला असे अनुभव येतच राहणार खूप प्रामाणिकपणे काम करणारी लोक आणि संस्था आहेत. तुम्ही ते ओळखायला शिका. कोणीही तुम्हाला तुमचे निगेटिव्ह पॉईंट तुमच्या तोंडावर सांगणार नाहीत ते तुम्हालाच शोधून काढायचे आहेत. बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्था फक्त पैसे कमवायचे म्हणून या क्षेत्राकडे पाहतात कारण विचार न करता भूलथापांना बळी पडून हजारो रु भरायची सवय काही लोकांना लागलेली आहे. आशावादी जरूर असावे पण त्याबरोबर वास्तववादी पण असायलाच पाहिजे..
धन्यवाद.
हेमलता यादव-कदम
९७६६२७१७४४ / ७८७५५५०७८९
vadhuvarpasanti.in
https://maitrimanashi.blogspot.com/
नवी पेठ , पुणे - ३०. (कृपया वरील आर्टिकल कोणीही स्वतःचे नाव टाकून प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू नये तसे आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. )