05/07/2023
🍀आरोग्य मंथन १
🧂मीठ कोणतं खाताय ?
🧂आयोडीन युक्त मिठाची खरच गरज आहे का?
▪️आहारातील प्रत्येक पदार्थ मिठाशिवाय अपुरा आहे.मीठ म्हणजे आहाराचा अविभाज्य भागच आहे.मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही असेही आपण म्हणतो
आमटी ,भाजी ,भात ,पोळी .. हल्ली तर सलाड ,दही , ताक अगदी सगळ्यात आपल्याला मीठ पाहिजे
बाजारात मिळणाऱ्या आपल्या आवडीच्या चिप्स, वेफर्स, खाकरा, फरसाण अशा कितीतरी पदार्थांवर वरून मीठ लावलेले असते
*तुम्ही ऐकलं असेल मीठ जास्त खाऊ नका..किंवा वरून मीठ घेऊ नका.. तुम्हाला याचं कारण माहिती आहे का?*
▪️आयुर्वेदामध्ये मिठाचे आठ प्रकार वर्णन केलेले आहेत.
सध्या आपल्याला परिचित असणारे 3 मीठ म्हणजे समुद्रमीठ ,सैंधव मीठ आणि काळे मीठ
या लेखात आपण *समुद्र मीठ* या बद्दल जाणून घेणार आहोत
▪️समुद्र मीठ म्हणजे आयोडीन युक्त मीठ
खरे पाहता आयोडीन हे शरीराच्या व बुद्धीच्या वाढीसाठी आवश्यक असते.आयोडीनच्या कमतरतेने अनेक गंभीर आजार सुद्धा उद्भवू शकतात. उपलब्ध असलेल्या सर्व मिठामध्ये आयोडीनचे प्रमाण असते
▪️वीस-पंचवीस वर्षांपूर्वी भारतामध्ये आयोडीन युक्त मिठाची सक्ती झाली परंतु सर्वांना आयोडीनयुक्त मिठाची गरज होती का?
खरे पाहता नाही !!!!!
भारताचा विचार करता जिथे समुद्राचा वारा किंवा पाणी पोहोचू शकत नाही अशा डोंगराळ भागांमध्ये फक्त आयोडीनची कमतरता अधिक होती उदा. हिमाचल प्रदेश काश्मीर किंवा उत्तराखंडचा काही भाग अशा ठिकाणी आयोडीनची सक्ती करणं योग्य होत आणि आता याच आयोडीन युक्त मिठाच्या अतिवापरामुळे थायरॉईडच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे
▪️समुद्र मीठ दोन प्रकारचे उपलब्ध आहे
सध्या जे आपण वापरतो पॅकेट मधल मीठ आणि दुसरं म्हणजे खडे मीठ जे लहानपणी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आवर्जून असायचं.आपली आई ते मीठ पाट्यावर बारीक करून जेवणामध्ये त्याचा वापर करत असे
आता सध्या जे आपण मीठ खात आहोत (टेबल salt) ते केमिकली रिफाईन्स सॉल्ट आहे त्यामध्ये natural minerals सुद्धा impurity म्हणून काढून टाकले जातात आणि शेवटी सोडियम क्लोराइड (NACL)शिल्लक राहते
▪️सोडियम क्लोराइड मधलं सोडियम जे आहे ते मात्र गडबड करणार आहे.आपल्याला सगळ्यांना माहिती मीठ हे अभिष्यन्दि आहे .मीठ पाणी खेचून घेत आपण थोडं मीठ काढून बाहेर ठेवलं की ते लगेच हवामानातील पाणी शोषून घेऊन त्या मिठाला लगेच ओलावा येतो म्हणजेच
*सोडियम जिथे जिथे पाणी तिथे तिथे*
▪️तज्ज्ञांच्या मते मीठाचं अतिरिक्त सेवन केल्यानं स्ट्रोक, रक्तदाबा सारखे विकार धमन्यांचे आजार, उच्च रक्तदाब, हृदयक्रिया बंद पडणं लठ्ठपणा, किडनीचे आजार, हाडांची घनता कमी असे धोके संभवतात.
शेवटी *अति सर्वत्र वर्जयेत* हेच खरे
मग मीठ खायचं नाही का आणि खायचं तर कोणतं खायचं? किती प्रमाणात खायचं ? या प्रश्नांची उत्तरे
तसेच.....
मिठाचे सर्व तोटे भरून काढणारे दुसरे मीठ म्हणजे सैंधव मीठ याबद्दलची माहिती आपण पुढील लेखात घेणार आहोत
वैद्य सुवर्णा बुद्धिवंत
वात्सल्य आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र,पुणे
99700146633
अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी ग्रुप मध्ये सहभागी व्हा आपल्याला मिळालेली माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा
https://chat.whatsapp.com/EY0ABYAhvrg55uVR77qgwx