07/08/2023
लिव्हर (यकृत)
==========
(संधर्भ -अंतरजाल )
मानवाच्या शरीरात लिव्हर (यकृत) हा महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याची अनेक कार्य आहेत. रक्ताचं शुद्धीकरण, रक्तात असलेलं विष पित्तावाटे बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं कार्य यकृत करतं.प्रतिबंधक उपचार हे यकृताच्या आजारात फायद्याचे ठरतं. प्रतिबंध उपायांमध्ये एक लसीकरण, दुसरं चांगली जीवनशैली, आणि तिसरं म्हणजे यकृताला इजा होणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणं या गोष्टी पाळल्या पाहिजेत.
यकृत हा स्वतःला दुरुस्त करण्याची प्रचंड शक्ती असलेला अवयव आहे. त्याच्यात इतर गोष्टी दुरुस्त करण्याची क्षमता असते. बऱ्याच आजारांमुळे अल्कोहोल, फॅट, विषाणू, औषधांमुळे यकृताला इजा होते. त्याच्यावर इलाज केले तरी यकृत स्वतःला दुरुस्त करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे एखाद्या व्यक्तीचं ६० टक्के यकृत काढून टाकलं, तरी ते पुन्हा येऊ शकतं. ज्या कारणामुळे यकृताचा आजार झाला आहे, त्यावर इलाज करणं हा तिसरा उपाय.
यकृताचे आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपायांचा खर्च हा पाच वर्षाला हजार रुपये देखील नाही. पण यकृताचा आजार झालेल्या रुग्णाला खर्च पाच वर्षांत उपचारासाठी २५ लाख रुपये खर्च कमी पडतात. म्हणून प्रतिबंधक उपचार हे यकृताच्या आजारात फायद्याचे ठरतं. प्रतिबंध उपायांमध्ये एक लसीकरण, दुसरं चांगली जीवनशैली, आणि तिसरं म्हणजे यकृताला इजा होणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणं या गोष्टी पाळल्या पाहिजेत.
हेपेटायटिस 'बी' आणि हेपेटायटिस 'ए' आणि 'इ' या तीनही विषाणूंवर लस उपलब्ध आहे. या लसीकरणाचा खर्च ५०० ते १००० रुपये खर्च आहे. पण दुर्देवाची गोष्ट अशी हेपेटायटिस 'इ'मुळे हजारो गर्भवती महिला देशात मरण पावतात. पण त्याची केंद्र सरकारकडून अद्याप मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झालेली नाही. तर चीनमध्ये ही लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली आहे. हेपेटायटिस 'सी'वर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. तुमची जीवनशैली चांगली नसेल, व्यायामाचा अभाव असेल, फास्टफूड खात असाल तर त्यामुळे लठ्ठपणा आणि यकृताचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोट्यावधींना लिव्हर सिरॉसिस होण्याचा धोका आहे. अतिगोड पदार्थांपासून वंचित राहणं, व्यायाम करणं, सॉफ्ट ड्रिंकपासून दूर राहणं हे अत्यंत गरजेचं आहे.
जीवनशैलीत असुरक्षित लैंगिक संबंध होण्याचा धोका असून त्यामुळे हेपेटायटिस 'बी' पसरतो. त्यामुळे ते नियंत्रणात हवे. झोप अपुरी होणाऱ्या व्यक्तींचा लठ्ठपणा वाढल्याने यकृताचे आजार बळावण्याचे प्रमाण देखील वाढायला लागतात. मानसिक संतुलन अधिक चांगले नसेल तर ती व्यक्ती अधिक खादाड बनते. त्यामुळे ती लठ्ठ होते. प्राणायम, व्यायाम करावं, व्यवस्थित झोप घेणं गरजेचं आहे. या मुद्यांकडे यकृताच्या आजाराकडे लक्ष दिले जात नाही.
दारुमुळे किंवा काही औषधामुळे यकृत खराब होते. त्यापासून इजा होते. त्यामुळे कार्य थंडावते. या गोष्टी नियंत्रणात कशा आणता येतील याबाबत विचार करणं गरेजंच आहे. या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी कुटुंबियांचा सहकार्य अथवा पाठिंबा असायला हवा. त्यावर नियंत्रण ठेवणारा कोणीतरी असावा.
लिव्हर सिरॉसिसच्या आजारात लिव्हरमधील असलेल्या पेशी मारल्या जातात. त्यांची जागी 'कार्ट टिश्यू' तयार होते. आजारामुळे कालांतरानं यकृतातील पेशींची संख्या कमी होते. त्या पेशींच्या जागी आलेल्या फायब्रस टिश्यूंमुळे यकृतामध्ये साधारण सुरू असलेला रक्तप्रवाह खंडित होतो; त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते.
लिव्हर सिरॉसिस झालेल्या व्यक्तीला रक्ताच्या उलट्या होणं, पायाला सूज येणं, कावीळ होणे, बेशुद्धावस्था यांसारखी लक्षणं दिसून येतात. लिव्हर सिरॉसिस होण्याचं पहिलं कारण म्हणजे मद्यसेवन. तीन पेगपेक्षा अधिक प्रमाणात सतत पाच वर्षं कोणी दारू घेत असेल, तर त्या व्यक्तीला लिव्हर सिरॉसिस होऊ शकतो. त्या तुलनेत महिलांनी कमी प्रमाणात दारू प्यायली, तरी त्यांना हा आजार होतो. दारूचं प्रमाण आणि त्यांच्या कालावधीचा धोका तेवढा अधिक वाढतो.
हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी यांसारख्या विषाणूमुळे देखील लिव्हर सिरॉसिस होऊ शकतो. दूषित रक्त, असुरक्षित शारीरिक संबंध, नशा करताना एकमेकांच्या सुया वापरण्यामुळे संसर्ग होण्याची भीती अधिक असते. शरीरात हा विषाणू पसरला, की हळूहळू यकृतमधील पेशी मारून टाकल्या जातात. त्या ठिकाणी फायब्रस टिश्यू तयार होऊन लिव्हर सिरॉसिस तयार होतो.
फॅटी लिव्हर हे तिसरं महत्त्वाचं कारण समजलं जातं. म्हणजेच यकृतात चरबी साठणं, असं म्हटलं जातं. त्यामुळे यकृतातील पेशी मरतात आणि सिरॉसिस होतो. लठ्ठपणा, मधुमेह, शारीरिक श्रमांचा अभाव यांमुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण हे १८ टक्के आहे. फॅटी लिव्हरमुळे दीड कोटी भारतीयांना लिव्हर सिरॉसिस होण्याची शक्यता आहे. पुढील दहा वर्षांत १८ टक्के व्यक्ती लिव्हर सिरॉसिसच्या आजारानं त्रस्त असतील. लिव्हर सिरॉसिस होण्याची इतर कारणंदेखील असू शकतात. जन्मतः काही दोष असतात. अनेक छोट्या एन्झायम्समध्ये दोष असल्यानं यकृत खराब होतं. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचं यकृत खराब होण्याची शक्यता अधिक असते. पित्त नलिकेला इजा झाली, तर यकृत खराब होतं. काही जणांमध्ये शरीरच यकृत नष्ट करत असतं. त्याला ऑटो इम्युनो हिपॅटायटिस असं म्हटलं जातं. जसा संधीवात झाल्याने त्याचा शरीरावर परिणाम होतो, तसाच परिणाम यकृत खराब झाल्यानं देखील दिसून येतो. त्वचाविकारासाठी काही औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्या औषधांचा वापर करताना लक्ष दिलं नाही, तर त्याचा यकृतावर परिणाम झाल्याचं दिसून येतं.
फॅटी लिव्हर म्हणजे काय?
व्यग्र जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे फॅटी लिव्हर. यकृत पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही परिस्थिती उद्भवते. यामुळे यकृताला धोका संभवतो. योग्य वेळी आपल्या यकृतातील वाढत्या चरबीकडे लक्ष दिले नाही, तर गंभीर परिणाम होतात.
फॅटी लिव्हर आजाराचे तीन प्रकार असतात.
स्टेटोसिस- यामध्ये यकृतात चरबी जमा झालेली असते, पण त्यामुळे सूज येत नाही.
स्टेरिएपेटायटिस - यामध्ये यकृताला जखम आणि सूज आढळते.
लिव्हर सिरोसिस - हा प्रकार अतिशय गंभीर असतो त्यामध्ये यकृताला इजा होण्याची शक्यता अधिक असते. नॉन-अल्कोहोल फॅटी यकृत आजाराची सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु चरबीचे यकृतामधील प्रमाण जसजसे वाढत जाते, तसे पोटात दुखणे वा थकवा ही लक्षणे दिसतात.
फॅटी लिव्हरची कारणे
आपल्या आहारातील फॅट्सचे योग्यरित्या विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात जास्त साखर किंवा स्निग्ध पदार्थ आणि तुलनेने कमी व्यायाम/ हालचाली यामुळे असे होते. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड/ इतर अंत:स्रावाची कमतरता, कोलेस्टेरॉल/ ट्रायग्लीसराइडचे रक्तातील प्रमाण आदी कारणे यकृतातील चरबी वाढण्यामागे आहेत.
फॅटी लिव्हरची लक्षणे
पोटाचा घेर वाढणे, वजन सतत वाढणे, यकृताचा आकार वाढणे व सूज येणे, मळमळणे, भूक न लागणे, कामात उत्साह न राहणे, पायांना सूज येणे, थकवा, पोटात उजव्या बाजूला दुखणे
लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर
प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असते. मधुमेहाच्या ७० ते ८० टक्के रुग्णांना फॅटी लिव्हरचा धोका असतो. लठ्ठपणा धोकादायक आहे की नाही, याचे मोजमाप बॉडी मास इंडेक्सद्वारे (बीएमआय ) कळू शकते. पूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. आता बदललेली आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरचा आहारात समावेश यामुळे तरुणांमध्येही हा आजार बळावल्याचे दिसते.
फॅटी लिव्हरला प्रतिबंध घालण्यासाठी-
वजन नियंत्रण करणे,
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, मद्यपान-धूम्रपान ताबडतोब बंद करणे,
कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण,
पौष्टिक-संतुलित आहार,
नियमित व्यायाम,
आहारात फळे, भाज्या, बीन्स, कोंडायुक्त धान्याचा समावेश,
तळलेले पदार्थ आणि जंकफूड वर्ज्य करणे,
आहारतज्ज्ञज्च्या सल्ल्याने आहार,
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये.
फॅटी यकृत या आजाराचे प्रमाण हल्ली फारच वाढले आहे. बहुतांश व्यक्तीमध्ये ग्रेड वन चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. दारू न पिणाऱ्या वा कमी पिणाऱ्या व्यक्तींच्या यकृतात चरबीचे प्रमाण वाढले, तर या आजाराचे निदान केले जाते. चरबीचे प्रमाण जास्त असल्यास यकृतास सूज येते, पुढे जखमा, घट्टपणा येतो. त्यामुळे पुढे सिरोसिस वा कॅन्सरचीही भीती असते. जगभर दारूमुळे होणाऱ्या सिरोसिसपेक्षा याचे प्रमाण जास्त आहे. साधारणत: सूज आलेल्या २० टक्के रुग्णांना सिरोसिस होतो व १०-११ टक्के रुग्णामध्ये ते मृत्यूचे कारण ठरते.
फॅटी लिव्हरपासून दूर राहण्यासाठी
- मुलांनी मैदानी खेळ खेळावेत.
- उघड्यावरचे पदार्थ, फास्ट फूड टाळावे, घरूनच पोषक डबा द्यावा.
- सकाळचा नाश्ता टाळू नये.
- दिवसातून किमान एक-दोन फळे खावीत.
- रोजच्या आहारात भरपूर फायबर (चोथा) असलेले अन्न उदा. पालेभाज्या, कोंडा न काढलेली भाकर यांचा आवर्जून समावेश करावा.
- रोज एक तास व्यायाम करावा. शरीराच्या प्रत्येक सांध्याची हालचाल होईल, असे पाहावे. त्यामुळे शरीर फीट राहते, स्थूलत्व येत नाही, मानसिक आरोग्यही चांगले राहते.
- आहार समतोल असावा. फळभाज्या, पालेभाज्या, कच्च्या कोशिंबिरींचा समावेश असावा.
- जेवताना शांत, आनंदी मनाने आहार घेतल्यास खाल्लेले अन्न योग्यरित्या पचते.
लिव्हर सिरॉसिस होणं अथवा यकृत खराब होण्याची अनेक कारणं आहेत. आपण खबरदारीचा उपाय करू शकतो. हिपॅटायटिस बी होऊ नये यासाठी दारू पिणं बंद करता येतं. हिपॅटायटिस सीवर प्रतिबंधक औषधं आहेत. तीन महिन्यांची औषधं घेतल्यानं आजार बरा होतो. फॅटी लिव्हर होऊ द्यायचं नसेल, तर व्यायाम करावा. फास्ट फूड खाऊ नये. त्यामुळे स्वतःला आजारापासून मुक्त करू शकता. आजाराचं निदान त्वरित निदान करून उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे आजाराची वाढ रोखण्यास मदत होते. यकृत पूर्णपणे पूर्वीच्या स्थितीत येत नाही. सिरॉसिस झाल्यास त्यावर कायमस्वरूपी लक्ष द्यावं लागतं. परिणामी भविष्यात लिव्हर कॅन्सर होण्याची भीती अधिक असते. त्याकरिता त्याबाबत लक्ष देण्याची गरज असते.
हेपेटायटिस 'बी' आणि 'सी' या विषाणूवर इंग्रजी उपचार केले जातात. त्या हेपेटायटिस 'बी'मुळे होणारा आजार नियंत्रणात ठेवता येतो. हेपेटायटिस 'बी' हा आजार घालवण्यासाठी कोणतंही कायमस्वरूपी औषध सध्या इंग्रजी उपचारात उपलब्ध नाही. हेपेटायटिस 'बी' गोळीद्वारे यकृताचा आजार नियंत्रणात ठेवून रक्तातील मात्रा शून्यानजीक ठेवली, तरी यकृताला इजा होत नाही. हेपेटायटिस 'बी'च्या दुष्परिणामपासून दूर राहू शकतो. त्याला संरक्षण मिळू शकतं. यकृताला जे आजार झाले आहेत, ते स्वतः यकृत दुरुस्त करून घेऊ शकतं. काही औषधांमुळे यकृताला इजा झाली असेल, तर मुख्य म्हणजे दारू सेवन थांबवणं आवश्यक आहे.
थोडक्यात काय ...सध्याची कुटुंब व्यवस्था ही स्वतंत्र अशी आहे. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्त्वात नाही. त्यामुळे कुटुंबांचा धाक असणं हा प्रकार आता पाहायला मिळत नाही. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहणं अवघड आहे. स्वतंत्र कुटुंबपद्धतीमुळे अशा प्रकारचे विविध आजार वाढीस लागतात. हे सुरुवातीला लक्षात येत नाही. पण त्याच्या विविध कारणांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीचा अभाव हे एक कारण समजले जाते. समाजाचे संतुलन राखण्याची आवश्यकता असून पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती असायला हवी. तेव्हाच हे आजार नियंत्रणात येतील.
डॉ प्रवीण बढे
प्रिस्टाईन हेल्थ फाउंडेशन पुणे
Phd in Ayurved
9665622886