Dr. Pooja's Homoeopathy

Dr. Pooja's Homoeopathy Homeopathy is Safe

Homeopathic medicines are prepared from tiny amounts of proven healing substance

03/07/2024

04/11/2023
09/04/2023

होम्योपैथिक अपडेट के लिए हमें फॉलो करें - #होम्योपैथिक_समाचार

#होम्योपैथिक_समाचार
#होम्योपैथिक_अपडेट


08/04/2023

Well said..

08/04/2023

*वंध्यत्व*
प्रत्येकाला वाटते, की आपले स्वतःचे एकतरी मूल असावे. सध्या वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे.
"जोडप्याला लग्नानंतर एक वर्षानंतर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता शरीरसंबंध केल्यानंतरसुध्दा गर्भधारणा होत नसेल, तर त्या जोडप्यास वंध्यत्व आहे असे म्हणू शकतो."
या समस्येला स्त्री किंवा पुरुष किंवा दोघेही कारणीभूत असू शकतात.
म्हणूनच स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यताप्राप्त लॅबमध्ये होणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
वंध्यत्वाची स्त्रियांमधील काही *कारणे*
- अनियमित मासिक पाळी
- अंडकोषातून स्त्रीबीज बाहेर न पडणे म्हणजेच PCOS नावाचा आजार असू शकतो. ह्यामध्ये शरीरातील संप्रेरकमध्ये बदल होतो व अंडाशयावरती सूज येते. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओएस) असे म्हणतात. हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे प्रमुख कारण बनले आहे.
- थायरॉइड ग्रंथी व्यवस्थित काम न करणे
- बदललेली जीवनशैली /ताणतणाव
- मद्यपान, धूम्रपान यासारखी वाईट व्यसने असणे
दोन्हीही गर्भनलिका बंद असणे किंवा गर्भनलिकेला जंतुसंसर्ग होणे.
Grade III अथवा Grade IV Endometriosis चा आजार असणे.
- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, बाहेरचे तसेच हवाबंद डब्यातील प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचे सेवन व मुख्यत्वे करून घरगुती चौरस आहाराचा अभाव
तपासणी-
- सोनोग्राफी
- फोलिकल टेस्ट
- हॉर्मोनल टेस्ट
- गर्भाशयचा स्कॅन
- टॉर्च टेस्ट
इत्यादी
या टेस्ट जरुरी प्रमाणे केल्या जातात.

पुरूषांमधील वंध्यत्व दोन प्रकारचे असते.
*नपुंसकत्व*
म्हणजे शारीरिक संबंध येण्यासाठी पुरुष लिंगामध्ये आवश्यक ते बदल घडू न शकल्याने समागमच होऊ न शकणे हा एक प्रकार आहे.
*वीर्यची कमतरता*
मूल होण्यासाठी आवश्यक असणारे योग्य वीर्य नसने.
नपुंसकत्व असणाऱ्या पुरुषाचे वीर्य गर्भधारणेसाठी योग्य असू शकते; पण असा पुरुष स्त्रीबरोबर समागम करू शकत नाही. बऱ्याच वेळा अशा व्याधीचे मूळ मानसिक गोंधळ, भीती,असू असते.
त्यावरील उपचार वेगवेगळे असतात.
*कारणे*
-आजारपण
- दुखापती
-आधीपासून असलेले आजार
-चुकीची जीवनशैली आदी कारणांमुळे शुक्राणूंच्या समस्या येतात.
-वाढत्या वयासोबत प्रजननक्षमताही कमी होते.
- तणावामुळे निर्माण झालेले वंध्यत्व प्रजननाच्या दृष्टीने कमी वयात दिसून येते.
- आघात, प्रादुर्भाव यांमुळे तरुण वयात वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते.
- अनुवांशिकता
- ट्युमर्स
- अमली पदार्थ व मद्यपान, धूम्रपान
-कामाच्या ठिकाणी उच्च तापमानाचा संपर्क येणे
-अतिस्थूलपणा
- कामवासना कमी होणे, इच्छा कमी होणे, वारंवारता कमी होते.
-इरेक्शनसंदर्भातील (शिश्न ताठर होण्याशी संबंधित) काही समस्यांमुळे, शिश्न वाकडे किंवा वेळेपूर्वीच स्खलन (इजॅक्युलेशन) यामध्ये रुग्णाला वंध्यत्वाहून अधिक तणाव असतो तो लैंगिक संबंध ठेवण्यात कमी पडण्याचा. वंध्यत्व हा येथे अप्रत्यक्ष परिणाम ठरतो.
*होमोईओपॅथि मध्ये वंध्यत्वसाठी आणि त्यासंदर्भातील अनेक आजारांसाठी उपाय आहेत. ज्याचे कोणतेही साईडइफेक्टस् नाहीत .*
*अधिक माहिती आणि उपचारांसाठी संपर्क साधा.*
*डॉ* . *पूजा कोगनोळे-* *आमनाजी*
*8600427244* .

Those who are suffering from thyroid issues can get rid of it permanently with homoeopathic  treatment..Get in touch to ...
22/05/2021

Those who are suffering from thyroid issues can get rid of it permanently with homoeopathic treatment..

Get in touch to solve your all other health issues as well..

Stay healthy

*थायरॉईड*
थायरॉईडचा त्रास

1- हायपोथायरॉईडिझाम
2- हायपरथायरॉईडिझाम

*हायपोथायरॉईडिझाम*
थायरॉईड हॉर्मोन चे रक्तातील प्रमाण कमी झाल्याने हा आजार होतो.

*लक्षणे*
_अचानक वजन वाढणे
_ थकवा येणे
_ केस गळणे
_ विसारळूपणा

*हायपरथायरॉईडिझाम*
थायरॉईड हॉर्मोन चे रक्तातील प्रमाण वाढल्याने हा आजार होतो.
*लक्षणे*
_शरीराला कंप सुटणे
_ दरदरून घाम पुटणे
_ हृदयाची धडधड वाढणे
_ भूक जास्त असून वजन त्या प्रमाणात कमी असणे
_ चीड चीड होणे
_ अतिउत्साहीपणा

*गलगंड*
थायरॉईड ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढही हॉर्मोन्स चे प्रमाण कमीजास्त झाल्याने किंवा आयोडीनची मात्र कमी झाल्यानेही गलगंड होतो.

*उपाय*
आयुष्यभर घ्याव्या लागणाऱ्या गोळी पासून आणि थायरॉईड पासून मुक्तता ते ही साईडइफेक्ट्स शिवाय होमोईओपॅथि मध्ये उपलब्ध आहेत.

आवश्यक तपासण्या
_T3
_T4
_TSH

अधिक माहिती आणि उपचारांसाठी संपर्कसाधा
_डॉ पूजा आमनाजी_
8600427244

VITILIGO / LEUCODERMA/पांढरे कोडपांढरे कोड(VITILIGO) म्हणजे काय :त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसत...
06/05/2021

VITILIGO / LEUCODERMA/पांढरे कोड

पांढरे कोड(VITILIGO) म्हणजे काय :

त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, त्यांना कोड किंवा पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही कारणांमुळे जर नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे नसते.
पांढरे डाग हे कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतात. अगदी लहान बाळापासून ते वयस्कर व्यक्तींमध्येही हे डाग दिसू शकतात. पण अधिक रुग्ण तरूण वयातील आढळतात.

कोड रोग हा संसर्गजन्य रोग नाही.

(पांढरे कोड लक्षणे)Vitiligo Symptoms

कोडाच्या पांढर्‍या डागांची सुरुवात हातापायांची बोटे, कोपर, गुडघे, ओठ व तळवे यांपासून होते. या डागांमुळे वेदना, खाज किंवा दाह होत नाही. परंतु प्रखर सूर्यप्रकाशात या डागांमुळे दाह जाणवतो. कोडासंबंधी निश्चित अंदाज वर्तविता येत नाहीत. कोडाचे डाग आकाराने वाढू शकतात वा तसेच राहतात. ज्या भागांवर कोड येतात त्या भागांतील केसही पांढरे होतात.

पांढरे डाग कारणे (vitiligo causes)

या विकाराला काही प्रमाणात जेनेटिक दोष कारणीभूत असतात. या विकारात जनुकामधील बिघाडामुळे त्वचेतील मेलॅनीन तयार करणार्‍या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. मेलॅनिनाच्या निर्मितीनुसार त्वचेचा आणि केसांचा रंग ठरतो. सुमारे तीस टक्के रुग्णांच्या बाबतीत कोडाचे डाग आनुवांशिक असल्याचे दिसते. पांढरे कोड हे संसर्गाने होत नाहीत. कोड असलेल्या व्यक्तीबरोबर राहिल्याने कोड काही निर्माण होत नाहीत. त्यामुळे पांढरे कोडसंबधी गैरसमज करून घेऊ नका.

पांढरे कोडचे प्रकार :(Vitiligo Types)

Vitiligo vulgaris – जर चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला विटीलिगो वलगारीस असं म्हणतात.

Lip-tip vitiligo – चट्टे फक्त ओठांवर, बोटांच्या टोकावर व गुप्तांगांवर असतील तर त्याला लिप टिप विटीलिगो म्हणतात.

Localised vitiligo – एकाच ठिकाणी आढळणारा चट्टा असेल तर त्याला लोकलाईज्ड विटीलिगो म्हणतात.

unstable vitiligo – जर का चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला अनस्टेबल विटीलिगो म्हणतात.

पांढरे कोड आणि मानसिक ताण :
आज सुंदर दिसण्यासाठी लोक नानाविध उपाय करत असतात. अशा ह्या ‘सेल्फी काढण्याच्या’ आजच्या काळामध्ये आपल्याला कोड झाल्याचा मानसिक ताण त्या व्यक्तीवर अधिक असतो. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचा डाग दिसल्यास अशा व्यक्ती निराश होतात किंवा त्यांना न्यूनगंड येतो.
मात्र अशा व्यक्तींनी विनाकारण ह्या किरकोळ गोष्टीचे दडपण घेऊ नये.
आपल्याकडे या साठी उपचार आहे

*होमोईओपॅथि मध्ये पांढरे कोड (vitiligo) आणि अनेक त्वचेच्या आजारांसाठी उपाय आहेत. ज्याचे कोणतेही साईडइफेक्टस् नाहीत .*
अधिक माहिती आणि उपचारांसाठी संपर्क साधा.
डाॅ. पूजा प्रतिक आमनाजी(कोगनोळे)
8600427244

नमस्कार,मी डॉ. पूजा आमनाजीमागच्या वर्षी आपण कोरोना च्या लाटेत ARSENICUM ALBUM 30 या होमोईओपॅथी च्या IMMUNITY BOOSTER  गो...
11/04/2021

नमस्कार,

मी डॉ. पूजा आमनाजी
मागच्या वर्षी आपण कोरोना च्या लाटेत ARSENICUM ALBUM 30 या होमोईओपॅथी च्या IMMUNITY BOOSTER गोळ्यांचे सेवन करून स्वतःला संरक्षित ठेवले असेलच.

या वर्षी ही दुसरी लाट अधिक तीव्रतेने पसरत असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे। मग यावेळीं ही Arsenicum Album 30 याच गोळ्या घ्याव्यात का अशी आम्हांस सतत विचारणा होत आहे.

तर यावर उत्तर म्हणजे होमोईओपॅथी ची औषधे ही व्यक्ती परत्वे भिन्न असतात. यामध्ये सरसकट एक आजारासाठी सर्वांना एक च औषध असे नसते. *व्यक्तीचा स्वभाव , मानसिक जडणघडण, सामाजिक आणि वयक्तिक वागणूक, मानसिक दडपण, आजूबाजूचं वातावरण, त्या व्यक्तीस असलेले विविध शारीरिक आणि मानसिक प्रोब्लेम्स या सर्व गोष्टींचा तपास करून मुळाशी जाऊन सर्वांगीण प्रॉब्लेम निघून जावेत; वारंवार ते उदभउ नये म्हणून औषध दिले जाते.*

यासाठी आपण 1 शॉर्ट केस (काही ठराविक प्रश्न ) घेऊन औषधे द्यायचे ठरवले आहे. त्यासाठी आपण क्लिनिक वर येऊ शकता. अथवा ऑनलाईन पद्धतीने केस देऊ शकता. यासाठी पत्ता आणि लिंक खाली दिले आहेत.
फक्त immunity बुस्टर गोळ्या हव्या असल्यास whatsapp वर मेसेज करावा. *Dr. Pooja 8600427244*

*पुण्याच्या बाहेर औषध कुरिअर/पोस्ट ने मिळेल.*

You can visit our clinic in the morning..11to2

*Prior appointment needed*

Address-
Dr. Pooja's Homoeopathy Clinic.
Shop no.8, chintamani vertex , sinhgad road, near hdfc bank , opp to ranka jewellers, Above winspire generic medical, pune 411051
Mob: 8600427244

For more updates like our fb page:
https://www.facebook.com/Dr-Poojas-Homoeopathy-100760132032333/

Google map location:

https://www.google.com/maps/d/edit?mid=1OwOSjsAef9xd-GqxTa6Vwirq07VGdhLS&usp=sharing

If you are coming from rajaram bridge side take left at vitthalwadi signal, opp to petrol pump. If coming from sinhgad side take right turn at signal of vitthalwadi. Landmark: Ranka jwellers and petrol Pump

*स्नायू दुखणे आणि कडकपणा कशामुळे होतो?*स्नायू कडक होणे,जेव्हा स्नायूंना घट्टपणा येतो आणि हालचाल करणे कठीण होते ; विशेषत:...
02/04/2021

*स्नायू दुखणे आणि कडकपणा कशामुळे होतो?*

स्नायू कडक होणे,जेव्हा स्नायूंना घट्टपणा येतो आणि हालचाल करणे कठीण होते ; विशेषत: विश्रांतीनंतर असे होणे, स्नायू ताठरपणासह वेदना, क्रॅम्पिंग आणि अस्वस्थता देखील असू शकतात.

*लक्षणे*
*वेदना
*सूज
*जखम
*कोमलता
*लालसरपणा

*कारण*
1.व्यायाम
जेव्हा कोणी नवीन व्यायाम सुरू करतो किंवा त्याच्या दिनचर्याची तीव्रता आणि कालावधी वाढवितो तेव्हा कडकपणा उद्भवू शकतो.

2. लचक आणि ताण
स्नायू तंतू ताणले किंवा फाटले जातात .
अस्थिबंधन ताणले, मुरलेले किंवा फाटलेले असताना लचक भरते.

साधारणतः पुढील अवयवात प्रामुख्याने याचा प्रभाव दिसून येतो-
*गुडघे
*पाऊल
*मनगटे
*अंगठे

3. संधिवात

4.कीटक चावणे आणि डंक कधी कधी स्नायू कडक होणे होऊ शकते.

5. औषधे
काही औषधांमुळे स्नायू कडक होऊ शकतात.

6. दैनंदिन शारीरिक क्रिया/ योग्य व्यायामाचा अभाव.
जास्त वजन असणे

7. असंतुलित चुकीचा आहार घेणे.
पौष्टीक आहार न घेता फक्त जिभेचे चोचले पुरवणारे अन्न घेणे.

8. पुरेशी झोप न घेणे.
थंड किंवा ओलसर वातावरणात असणे.

*उपाय*

*योग्य प्रकारे केलेला व्यायाम*

*होमोईओपॅथि मध्ये स्नायु आणि त्यासंदर्भातील अनेक आजारांसाठी उपाय आहेत. ज्याचे कोणतेही साईडइफेक्टस् नाहीत .*
*अधिक माहिती आणि उपचारांसाठी संपर्क साधा.*
*डॉ* . *पूजा कोगनोळे-आमनाजी*
*8600427244* .

When your intentions are pure..
30/03/2021

When your intentions are pure..

Address

Shop No 8, Chintamani Vertex, Near HDFC Bank, Hingne Khurd, Sinhagad Road, Pune/
Pune
411051

Opening Hours

Monday 6pm - 9pm
Tuesday 6pm - 9pm
Wednesday 6pm - 9pm
Thursday 6pm - 9pm
Friday 6pm - 9pm
Saturday 6pm - 9pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919766542644

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Pooja's Homoeopathy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category