11/09/2020
१० सप्टेंबर २०२०
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
आयुर्वेद प्रचार,प्रसार लेखमाला
वनस्पती : क्र १०६
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
मुलकं अस संस्कृत नाम प्राप्त असे भाजीपैकी एक,मराठीत मुळा असा उल्लेख,आहारात याच्या कच्चा खाल्ल्याने देखील रूचि उत्पन्न होते🍃👍
रस : कटू,विपाक : कटू,वीर्य : उष्ण,गुण : रुक्ष,तीक्ष्ण,लघु दोषघ्नता: कोवळा मुळा-त्रिदोष घ्न तर जुना -त्रिदोष कर🍃👍
पांढरा आणि लाल मुळा असे दोन प्रकार.पांढरा मुळाचा प्रामुख्याने वापर.कोवळा त्रिदोष शामक आहे,तो कच्चा खावा. 🍃👍
तर जून मुळा हा त्रिदोषकर मुळा असल्याने त्याला तेल किंवा तुपाचा संस्कार केल्यावर खावा म्हणजे तो त्रिदोषघ्न🍃👍
मुळा आणि त्याचा पाला यांची एकत्र भाजी करावी तसेच त्याच्या शेंगा(डिंगरी)ची पण भाजी ऋतूमध्ये करावी. डिंगऱ्यांचे गुणधर्म मुळ्याप्रमाणेच आहे🍃👍
मुळा घशाला लाभदायक आणि श्वासात(दमा) उपयोगी आहे तसेच डोळ्यांना हितकारक आहे. दीपन, पाचन असल्याने तोंडाला रुची येते आणि भूक वाढवते🍃👍
खोकला,ताप या विकारात मूग आणि मुळ्याचे कढण करून काळीमिरी,सैंधव घालून द्यावे,लंघन ही तापाची चिकित्सा करतानाची पहिली पायरी,तेव्हा उपयोगी🍃👍
*आजचा श्लोक :*
दह्यन्ते ध्मायमानानां थातूनां हि यथा मलाः।
तथेन्द्रियाणां दह्यन्ते दोषाः प्राणस्य निग्रहात् । ॥. मनुस्मृती
*श्लोक अर्थ :*
ज्याप्रमाणे अग्निमध्ये अतिशय तापविले असता सोने चांदी इ. धातुमधील अशुद्धता नाहिशी होते त्याप्रमाणे प्राण ताब्यात ठेवल्यामुळे,प्राणायामामुळे इंद्रियांचे सर्व
दोष नाहीसे होतात.
*भावार्थ:*
प्राणायाम एक अनौषध चिकित्सा आहे हे निर्विवाद सत्य आहेच,त्यापलीकडे जाऊन आपल्या शरीरातील प्रत्येक अनैच्छिक कार्यात म्हणजे मेंदू, हृदय गती,किडनी सारख्या अवयव याकडे होणारा रस,रक्त यांचा पुरवठा उत्तम राहण्यास याचा खूप मोठा फायदा होतो.आज कोरोणा संकट मध्ये बरेच रुग्ण घरी आल्यानंतर काही ना व्यापदास बळी पडत आहे अशा रुग्णांना योग,प्राणायाम ग्रथित,गुठळी मुळे होणारे पुढील व्यापद टाळण्यासाठी खूप लाभदायी ठरू शकेल.विपरीत करणी सारखे सोपे प्रकार सुद्धा खूप फायदा देऊन जातात
जय आयुर्वेद !
वैद्य कदम राजेंद्र सुधाकर
निर्मल आयुर्वेद देहूरोड
Mob - 9960886432
(सदर लेख लेखकाच्या नावासहीत पुढे पाठवावा.)
🙏🙏🙏🙏🙏🙏
अनुभव,वेगळेपण असेल तर नक्की शेअर करा.