11/09/2022
केअरनेक्स्ट इंस्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ मध्ये जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कोविड नंतर डिप्रेशन (नैराश्य) आजारात ३० % तर आत्महत्या १० % वाढ झाली आहे. दरवर्षी 10 सप्टेंबर जगभर आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो.
केअरनेक्स्ट इंस्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ, पुणे येथे आत्महत्या प्रतिबंध दिवस निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमा ची सुरवात सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्काराने करण्यात आली, या वेळी
केअरनेक्स्ट इंस्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ पुणे येथिल डॉ. भूषण अंबाडकर (एम.डी. मानसोपचारतज्ञ ), डॉ सुशील देशमुख(एम.डी. मानसोपचारतज्ञ )आणि डॉ संकल्प निर्मल (एम.डी. मानसोपचारतज्ञ ) उपस्थित होते. त्यांनी नैराश्य, उदासीनता यांची लक्षणे व उपचार तसेच मानसिक ताण तणावावर प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नैराश्ययावर उपचार उपलब्ध असून आत्महत्या हा मार्ग असूच शकत नाही असे प्रतिपादन केले . प्रमुख अतिथी म्हणून“राज्य राखीव पोलीस बलाचे”पी.एस.आय. सुनील ठोंबरे , पी. सी दत्तात्रय राऊत हे उपस्थित होते व त्यांनी जागतिक आत्महत्ययेवर आणि येणाऱ्या नैराश्यग्रस्त मानसिकतेवर तसेच तरुण पिढीसमोर उभी असलेली व्यसनाधीनता यावर कशा पद्धतीने मात करता यावी यावर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व रुग्ण मित्रांनी उत्स्फूर्तपणे आजच्या दिवशी कितीही संकट आले तरी आत्महत्या करणार नाही
आणि आत्महत्या करणाऱ्याला आत्महत्या करण्या पासून परावृत्त करू अशी प्रतिज्ञा केली.
राज्य राखीव पोलीस बलाचे”पी.एस.आय. सुनील ठोंबरे यांनी व्यसनमुक्त व मानसिक रोगमुक्त समाजनिर्मितीसाठी केअरनेक्स्ट इंस्टिट्यूट कडून होणारे काम आणि प्रयत्न हे अतिशय कौतुकास्पद असून, रुग्णांवरील उपचार पद्धती अतिशय परिणाम कारक असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जवाबदारी केअरनेक्स्ट इंस्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ चे समुपदेशक पूजा शिंदे, रामेश्वर काकडे, गणेश पाटील, सिस्टर नेहा कांबळे, सिस्टर मयुरी शेंडे यांनी पार पाडली.