09/03/2024
to 12th students
करिअर निवडणे हा विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. १५-१६ या वयात शरीरातील, मनातील बदलांमुळे मुलं जरा aggressive वागू शकतात...मोकळं बोलू शकत नाहीत...विचार मनातच ठेवतात... आई बाबा आजी पेक्षाही मित्र मंडळी जवळची वाटतात... अनेक पालक पण मुलांना मदत करू बघतात... त्यांना मुलांच्या या confusion ची जाणीव असते. करिअर चे आता खूप ऑप्शन्स असल्याने नेमके काय? हा प्रश्न पडू लागतो. शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून करिअर मार्गदर्शनाची गरज भासते.8वी ते 12वी इयत्तेतील विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेकदा खूप प्रश्न असतात. जसे, मुलांनी नेमके कोणते करिअर करायचे? त्यासाठी कुठली शाखा निवडायची? कुठले कोर्सेस उपलब्ध असतात? त्यासाठी कुठली entrance exam द्यायची? त्याचे cut off marks कसे असतील? इत्यादी... बरेच कोर्सेस जसे की डिझाईन, इंजिनिअरिंग, मेडिकल, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट नेमके काय घ्यावे? विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल नेमका कूठे आहे? अशा अनेक बाबतींत विद्यार्थी थोडे confused असू शकतात...त्यांना नेमके काय करावे, कुठले विषय-कोर्स घ्यावे, करिअर निवडी बद्दल स्पष्टता नसते...मुलं अनेकदा घरी मोकळं बोलतही नाहीत... अभ्यास,मार्क्स हा विषय क्वचित घरी भांडणाचा, वादावादीचा होउन बसतो! १५- १६ वर्षाची ही मुलंही अडनिड्या वयाची असतात..अजूनही ' खूप कळते पण वळत नाही ' या वयातली! अशात करिअरचा निर्णय खूप महत्वाचा असतो.
पालकही मुलांसाठी खूप supportive असतात. मुलांना जे हवं ते शिक म्हणतात. क्लासेस लावून देतात... मुलांची अनेक अर्थी सोय बघतात...पण अनेकदा मुलं आणि पालक आपला निर्णय योग्य आहे का ?? अशा गोंधळलेल्या अवस्थेतच राहतात. अनेकदा गणित सायन्स तितकेसे आवडत नसतांना, विशेष जमतही नसतांना अनेक मुलं ज्युनिअर कॉलेज मध्ये 'science ' घेतांना दिसतात. त्यामागे 'अनेक ऑप्शन्स ओपन राहतील ' हा त्यांचा विचार असतो.. खूपदा कॉमर्स, आर्ट्स मध्ये ही अनेक करिअर ऑप्शन्स आहेत हे अनेकदा माहीत नसते.... अनेक विषयातील अनेक संधींची पूर्ण माहिती पालकांना, मुलांना नसते... त्यात आपण कूठे करिअर करु शकू? आपल्या क्षमता कोणत्या आहेत? हे समजून घ्यावे लागते..
नेमक्या अशा वेळी psychometric टेस्ट , aptitude test कामी येते. इथे मुलांची नेमकी आवड, त्यांची passion , त्यांचे उपजत गुण , त्यांच्या अभ्यासाच्या सवयी, त्याचे एकंदर व्यक्तिमत्त्व, त्यांचे करिअर मधील नेमके गोल किव्वा लक्ष काय आहे?? अशा अनेक बाबी लक्षात घेऊन मुलं आणि पालकांचे counseling केले की मुलांना आणि पालकांना दिशा मिळते...आधार वाटतो...अनेक अडचणी ते बोलून दाखवतात...त्यांना त्यांचाच मार्ग सुचत जातो... अनेक मुलांना,पालकांना बरेचदा करिअर बद्दल खूप माहिती असते... गूगल मुळे खूप गोष्टी कळलेल्या, शोधलेल्या असतात...पण तरीही नेमके कोणते कोर्स, पुढें त्यात नोकरीची संधी, पगार, जॉब प्रोफाइल, growth prospects अशा बाबतींत अजून महिती त्यांना जरुर हवी वाटते... psychometric टेस्ट, aptitude टेस्ट, study habits टेस्ट, personality टेस्ट रिपोर्ट्स मुळे मुलांबद्दल एक स्पष्ट चित्र त्यांना मिळते....मनाला एक validation, समाधान मिळते. निर्धास्त मनाने पालक मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक ही मग करु शकतात... इतर दुसऱ्या शहरात पाठवायचे का? असे महत्वाचे निर्णय घेऊ शकतात....नेमक्या कुठल्या करिअर साठी आपण उत्तम आहोत?? आणि कुठल्या सवयी आपल्याला अजूनही सुधारता येतील??? हे देखील मुलांना counselling दरम्यान कळते...अनेकदा पालक मुलांच्या चुकीच्या सवयीबाबत त्यांना सांगून थकून जातात...तेच करिअर कौन्सेलर कडून, टेस्ट रिपोर्ट्स च्या माध्यमातून मुलांना सांगितले गेले की मुलं त्या बाबतीत नीट विचार करु लागतात. स्वतः त बदल करायची तयारी दाखवतात... वेगवेगळे कोर्स, कॉलेज , entrance exam, cut-off, आणि करिअरच्या बाबत अधिक स्पष्टता येत जाते..
विद्यार्थी आपले करिअर निवडतात तेव्हा अनेकदा ते त्यांना मिळालेल्या गुणांवर अवलंबून असते! ' मला अमुक विषयात मार्क चांगले म्हणून मी तमुक करिअर निवडतो ' असे वाक्य कानी पडते! हे किती योग्य, अयोग्य हे ही आपल्याला तपासून पाहता येते.. करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थी त्यांच्या व्यक्तिमत्त्व, आवडी आणि करिअर योग्यतेबद्दल जागरूकता मिळवू शकतात ....त्यांची पूर्ण क्षमता ते वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिकदृष्ट्या ओळखू शकतात...ही किती मोठी उपलब्धि आहे !! तीन सोप्या टप्प्यात हे आपण साधू शकतो...
1.ऑनलाइन करिअर टेस्ट जी भारतातील मुलं मुली घरबसल्या कुठूनही देऊ शकतात...
2. त्यानंतर विद्यार्थ्याचा पर्सनल करिअर guidance रिपोर्ट जो psychometric टेस्ट नंतर तयार केल्या जातो...जिथे तुम्ही मुलांच्या study habits, learning styles, memory, examination techniques, study interest, personality जाणून घेऊ शकता.
3. आणि सगळ्यात महत्वाचे तज्ञ करिअर समुपदेशकासोबतचे वैयक्तिक सेशन - चर्चासत्र !! त्यावरून मुलांमधील क्षमता तपासून उपयुक्त वेगवेगळ्या परीक्षा, महाविद्यालये, भारतातील विविध अभ्यासक्रम, विद्यापीठे, कॉलेज चे रँकिंग, वेगवेगळ्या शाखांचे कटऑफ मार्क आणि परीक्षांची तयारी, धोरणे या बद्दल माहिती दिली जाते.
8वी ते 12वी इयत्तेतील विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत गरजेच्या आणि उपयुक्त असणाऱ्या ह्या टेस्ट आहेत...त्यांचे रिपोर्ट्स counselling psychologist तपासतात आणि विद्यार्थी, पालकांशी चर्चा करतात. ह्यामुळे योग्य निर्णय घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांना मदत मिळू शकते.
- स्वाती बापट
(Counseling psychologist, career counselor )
www.baalmaitra.com
अधिक माहिती साठी कृपया 9011037488 या नंबर वर संपर्क साधावा.
• How can individuals look ‘within’? • What are thoughts and are they helpful or harmful? • How to become aware and accept oneself exactly as we are?