14/03/2023
आपण करत असलेल्या कार्याला आपल्या प्रिय गुरुजनांची उपस्थिती आणि आशीर्वाद लाभणं यापेक्षा मोठे सद् भाग्य कोणते?माननीय आचार्या अस्मिताताईंची उपस्थिती आणि त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे.. ताईंनी त्यांच्या ओघवत्या शब्दांतून,जमलेल्या महिलांच्या मनात मेडिकल योगाबद्दल नक्कीच कुतूहल निर्माण केले आहे. स्त्री आरोग्याच्या अतिशय महत्त्वाच्या पैलू वर विचार करायला प्रवृत्त केले आहे.
ताईंची उपस्थिती आणि त्यांनी केलेले आमचे कौतुक आमच्यासाठी अतिशय मोलाचे आणि प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विद्यार्थिनी असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.. माननीय आचार्यजी, जया ताई तसेच संपूर्ण निरामय टीमचे मनःपूर्वक खूप खूप आभार 🙏🙏 असेच आपले मार्गदर्शन, आशीर्वाद सदोदित आमच्या सोबत असावेत हीच ईश्वरचरणी सदिच्छा.. आमच्या दोघींन (Radhika salunkhe आणी निकिता पेमगिरीकर) आणी RETTRO FAMILY कडून सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏