26/03/2025
"युनिक मेडिकल फाउंडेशन" पुणे १६, तर्फे सेंट. क्रिस्पिनज मराठी चर्च नळ स्टॉप, एरंडवणे पुणे ४ येथे अनाथाश्रमातिल मुलींची २५ मार्च २०२५ रोजी, सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते, यात सर्वांचे हिमोग्लोबिन चेक करून गरजेनुसार रक्त वाढिसाठी गोळ्या देण्यात आल्या, सर्वांना जंतनाशक (डेव्हर्म) गोळ्या देण्यात आल्या, तसेच किरकोळ आजारासाठी (सर्दी, ताप, खोकला, खाज) इत्यादींसाठी एकुण १०८ मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये डॉ सागर लोखंडे, डॉ राहुल लोखंडे, डॉ ओमकार तिठे, डॉ शिखा शर्मा, नर्स संगिता शिल तसेच डॉ गणेश खाडे, यांनी याचे नियोजन केले. सौ.अलका चांदोरीकर वॉर्डन, व पुजा मोकर नर्स यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.