Drsupriyapuranikmarathi

Drsupriyapuranikmarathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Drsupriyapuranikmarathi, Obstetrician-gynaecologist, Anutej Athrav society, Narveer Tanaji Wadi, Shivajinagar, Pune.
(1)

10/10/2025

डिलिव्हरी नंतर शरीरातून स्राव होत असेल आणि त्याला वास येत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर काही अवशेष अडकले असतील, तर त्यांना काढणं गरजेचं आहे. ही परिस्थिती काळजीची आहे आणि त्वरित उपचार आवश्यक आहेत.

सुरक्षितता आणि आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. ⚠️

postpartum infection, postpartum discharge, bad smell after delivery, retained placenta, postpartum care, female health, dr supriya puranik tips, delivery complications, maternal health, postnatal care, warning signs after delivery, womens health awareness

10/10/2025

जर तुझा ब्लड ग्रुप RH Negative असेल आणि मिस्टरचा RH Positive असेल, तर प्रेग्नन्सी दरम्यान एनटीडी इंजेक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे.

कारण बाळ RH Positive असल्यास त्याचं रक्त आईच्या रक्तात मिक्स झालं तर अँटीबॉडीज तयार होतात, ज्यामुळे पुढील प्रेग्नन्सीला धोका निर्माण होऊ शकतो.

हे इंजेक्शन 28 व्या आठवड्यात किंवा ब्लीडिंग, अबॉर्शन किंवा अम्नियोसेंटेसिस नंतर दिलं जातं.

आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यावश्यक आहे. ❤️

RH negative pregnancy, NTD injection, Dr Supriya Puranik, pregnancy care, pregnancy tips, fertility doctor, antenatal care, Rh incompatibility, early pregnancy care, blood group complications, pregnancy awareness, maternal health, pregnancy explained

10/10/2025

तुमचं प्रोजेस्टेरॉन कमी आहे म्हणूनच वारंवार बायोकेमिकल प्रेग्नन्सी होतायत का? 🤔

प्रोजेस्टेरॉन हा गर्भधारणेसाठी सर्वात महत्त्वाचा हार्मोन आहे. ओव्ह्युलेशन नंतर सात दिवसांनी त्याची तपासणी करणं गरजेचं आहे. जर कमी निघालं तर डॉक्टर टॅब्लेट्स, सपोसिटरीज किंवा इंजेक्शन देतात, ज्यामुळे गर्भधारणा टिकते आणि निरोगी बाळाची वाढ होते.

बारा आठवड्यांनंतर प्लासेंटा स्वतः प्रोजेस्टेरॉन तयार करतो त्यामुळे तोपर्यंत प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंटेशन आवश्यक आहे. 💊👶

progesterone in pregnancy, low progesterone causes, biochemical pregnancy, early pregnancy loss, luteal phase, ovulation test, progesterone level check, progesterone supplements, IVF support, miscarriage reasons

09/10/2025

आईव्हीएफ प्रेग्नन्सी म्हणजे थोडी जास्त काळजी घ्यायची गरज असते ❤️

ब्लीडिंग, ट्विन्स, किंवा बाळाकडे जाणारा ब्लड फ्लो बघण्यासाठी डॉक्टरांना वारंवार सोनोग्राफी करावी लागते.

पण काळजी करू नका! ही सोनोग्राफी साउंड वेव्ह्सवर चालते, एक्स-रे नाहीत, त्यामुळे बाळाला अजिबात त्रास होत नाही 💫
सोनोग्राफी म्हणजे काळजीचं चिन्ह नाही, ती म्हणजे तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेची हमी 🤍

IVF Pregnancy, IVF Sonography, IVF Scans, Pregnancy Care, Sonography Safety, IVF Twins, Subchorionic Hemorrhage, Vanishing Twin, Pregnancy Tips, Doctor Explains, Marathi Pregnancy Tips, Safe Ultrasound

09/10/2025

ती 34 वर्षांची महिला, प्रत्येक पाळीला हेवी ब्लीडिंगचा त्रास. सोनोग्राफीमध्ये दिसलं Submucous Fibroid, जवळपास 70% cavity मध्ये.

सर्जरी सुरू केली, पण 90% पूर्ण झाल्यावर थांबवावी लागली. कारण Fluid Absorption Syndrome!
हा द्रव पदार्थ जास्त प्रमाणात शरीरात गेला, तर मेंदू, फुफ्फुसे, हृदय यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षिततेसाठी सर्जरी मध्येच थांबवली.

उरलेलं 10% फाइब्रॉइड स्वतः Shrink होऊ शकतं. दोन-तीन महिन्यांनी पुन्हा तपासणी करून पुढचा निर्णय घेतला जाईल.
Safety first because every surgery deserves care and caution. 🩺💫

fibroid surgery, hysteroscopic myomectomy, fluid absorption syndrome, submucous fibroid, heavy periods, uterine fibroid treatment, gynecology surgery, safe surgery, women’s health, hysteroscopy in Marathi, fibroid removal, endoscopic surgery, uterus care, fibroid awareness

07/10/2025

तुझ्या रिपोर्टमध्ये आलंय फोकल .Adenomyosis
Adenomyosis समध्ये गर्भाशयाच्या भिंतींमध्ये एंडोमेट्रियल टिश्यू अडकतो, त्यामुळे पाळीच्या वेळी वेदना आणि हेवी ब्लीडिंग होतं.

पण फोकल Adenomyosis म्हणजे हा टिश्यू एका छोट्या भागात असतो
🔸 जर फोकस लहान असेल तर थोडंसं दुखणं किंवा कमी ब्लीडिंग होतं.
🔸 मोठा असेल तर तो फायब्रॉइडसारखा वाटू शकतो.

अशा वेळी त्या भागाचं Microwave Ablation करता येतं
त्या टिश्यूला जाळून काढल्यामुळे वेदना आणि ब्लीडिंग कमी होतं आणि रुग्णाला या त्रासातून मुक्ती मिळते.

focal adenomyosis, adenomyosis treatment, microwave ablation, adenomyosis symptoms, fibroid vs adenomyosis, heavy bleeding treatment, period pain, uterine wall thickening, adenomyosis diagnosis, uterus preserving surgery

07/10/2025

Adenomyosis म्हणजे गर्भाशय मोठा होणे आणि एंडोमेट्रियल टिश्यू गर्भाशयाच्या भिंतींमध्ये अडकणे.
यामुळे पिरियड्समध्ये प्रचंड वेदना आणि हेवी ब्लीडिंग होऊ शकते आणि काही वेळा गर्भधारणा होत नाही.

💡 मायक्रोवेव ॅब्लेशन कशी मदत करते:

मायक्रोवेव अँटीना गर्भाशयाच्या भिंतींमध्ये ठेवली जाते.
Adenomyosis टिश्यू तापून जळते आणि नंतर वाढत नाही.

ब्लीडिंग आणि वेदना कमी होतात.
6–8 महिन्यांत गर्भाशयाचा आकार लहान होतो, गर्भधारणेस मदत होते.

युट्रस प्रिझर्विंग सर्जरी: गर्भाशय काढण्याची गरज नाही, पण त्रास कमी होतो.

या उपायामुळे Adenomyosis सिसमुळे होणारी वेदना आणि ब्लीडिंग कमी होते आणि गर्भधारणेला मदत होते.

adenomyosis treatment, microwave ablation, uterine preservation, adenomyosis pain relief, heavy bleeding treatment, uterine enlargement, adenomyosis surgery, uterus preserving surgery, infertility due to adenomyosis, adenomyosis Marathi, uterine treatment, adenomyosis ablation, pregnancy after adenomyosis, heavy periods relief, women health

06/10/2025

कधी कधी पहिल्यांदा बाळ सहज होतं पण दुसऱ्यांदा कितीही प्रयत्न करून होत नाही… stupid वाटतं ना? 😔

पण हे सामान्य आहे! कारणं असतात हार्मोन्स, ट्यूब्स, एंडोमेट्रियोसिस किंवा वयाचं वाढलेलं अंतर. 🩸

पण घाबरू नका, उपाय आहेत. योग्य तपासणी, योग्य मार्गदर्शन, आणि थोडं धैर्य बाळ नक्की येईल 💫

second pregnancy problem, infertility reasons, pregnancy after first child, fallopian tube issue, hormonal imbalance, endometriosis, adenomyosis, pregnancy not happening again, second baby issue, pregnancy tips, female fertility

06/10/2025

👉 तुम्ही डिलिव्हरी झाली आहे आणि आता तीन महिने झाले आहेत, पण काही प्रॉब्लेम आहे की तुमचे टाके अजून भरलेले नाहीत.
🔹 ह्याला Third Degree Perineal Tear म्हणतात.

याचा अर्थ डिलिव्हरी करताना योनीमार्गावर जखम झाली, कधीकधी बाळाचं डोकं मोठं असण्यामुळे किंवा व्यायाम/पेरिनल एक्सरसाइजेस नीट न केल्यामुळे.

कधी कधी जखम पूर्ण भरत नाही आणि काही वेळा त्यासाठी पुन्हा टाके घालावे लागतात.

✅ आता काय करायचं:
Sitz bath घेणं (गरम पाण्याने शेक)
अँटीबायोटिक मलम वापरणं
जागेची स्वच्छता राखणं
कॉन्स्टिपेशन टाळणं भरपूर पाणी, फायबर फूड, पालेभाज्या, फळं

मालमसह टाके भरू लागल्यावर डॉक्टर तपासणी

⏳ साधारण 5–6 महिन्यात टाके पूर्ण भरून येतात.
⚠️ जर त्यानंतरही भरले नाहीत तर जखम पुन्हा दुरुस्त करण्याची गरज असते.

third degree perineal tear, postpartum tear, postpartum care, टाके भरत नाहीत, postnatal recovery, perineal tear treatment, postpartum hygiene, postpartum exercises, postpartum infection

05/10/2025

🎗️ ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ

ब्रेस्ट कॅन्सर हा भारतीय महिलांमध्ये आढळणारा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. काही महिलांमध्ये त्याचं प्रमाण अधिक आढळतं.

🔹 जर आपल्या आई, बहिण, मावशी यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर आपल्यालाही तो होण्याची शक्यता वाढते.
🔹 पिरियड्स उशीरा सुरू होणं किंवा लवकर थांबणं,
🔹 वय 50 पेक्षा जास्त असणं,
🔹 अनुवांशिकता किंवा जीन्समधले बदल,
🔹 जास्त वजन, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मद्यपान, स्मोकिंग या सगळ्या कारणांमुळेही धोका वाढतो.

🎗️ त्यामुळे या Breast Cancer Awareness Month मध्ये
आपल्याला जाणीव ठेवणं, तपासणी करणं आणि स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं

breast cancer, ब्रेस्ट कॅन्सर, breast cancer awareness, women health, breast cancer causes, breast cancer risk factors, family history cancer, breast cancer genes, breast cancer prevention, lifestyle and cancer, breast cancer awareness month, women health tips

04/10/2025

👉 प्रश्न: प्रेग्नन्सीत शॉर्ट सर्विक्स म्हणजे किती लहान असेल तर ते सिग्निफिकंट मानलं जातं आणि प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते?

🔹 प्रेग्नन्सीत सर्वायकल लेंथ खूप महत्त्वाची असते.
🔹 16 ते 24 आठवड्यांच्या दरम्यान सोनोग्राफी करून सर्विक्सची लांबी तपासली जाते.
🔹 सामान्य लांबी – सुमारे 4 से.मी.
🔹 पण जर ती 2.5 से.मी. पेक्षा कमी असेल तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचा धोका वाढतो.

👉 जर लांबी कमी असेल तर काय केलं जातं?
डॉक्टर टाका (Cervical cerclage) घालतात.
जर 16–17 आठवड्यात फनेलिंग दिसत असेल तर पोटावरून टाका घालतात.
फक्त योनिमार्गातून घातलेला टाका पुरेसा नसतो.

यासोबतच बेडरेस्ट + हाय डोस प्रोजेस्टरॉन (पेसरीज/इंजेक्शन) दिले जातात.

✅ या सगळ्या गोष्टींच्या मदतीने प्रेग्नन्सी फुल टर्मपर्यंत नेता येऊ शकते.

pregnancy short cervix, प्रेग्नन्सीत शॉर्ट सर्विक्स, premature delivery risk, cervical length, cervix stitch, cervical cerclage, bed rest in pregnancy, progesterone in pregnancy, preterm delivery prevention, pregnancy ultrasound, short cervix treatment, pregnancy care

03/10/2025

👉 एक पेशंट सांगते की तिला लेबियामध्ये वरचेवर दुखतं, पण तपासणीला गेल्यावर काहीच दिसत नाही.
अशा लक्षणांवरून मला वाटतं की हे बार्थोलीन सिस्ट असू शकतं.

🔹 बार्थोलीन ग्रंथी म्हणजे योनीच्या जवळील छोटी ग्रंथी, जी सिक्रिशन करून ओलावा ठेवते.
🔹 या ग्रंथीला इन्फेक्शन झालं तर गाठ तयार होते, दुखायला लागतं, कधी पस तयार होतो, फुटतोही.
🔹 तुझ्या केसमध्ये अजून मोठी गाठ नाही, पण वेदना वारंवार होत आहेत म्हणजे इन्फेक्शन सुरू आहे.

👉 पुढचं काय करायचं?
डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे.
हाताने तपासणी + सोनोग्राफी करून निदान केलं जातं.

जर सिस्ट छोटी असेल तर Sitz bath (गरम पाण्याने शेक) + Antibiotics दिले जातात.
जर वारंवार होत असेल किंवा मोठी झाली तर Marsupialization surgery करावी लागते.

फक्त pus काढून घेतला (I&D) तर पुन्हा सिस्ट तयार होते.

✅ योग्य वेळी उपचार केले तर हा त्रास कायमचा कमी होऊ शकतो.

Bartholin cyst, लेबियामध्ये वेदना, योनीजवळ गाठ, स्त्रीरोग, Bartholin gland infection, Bartholin cyst treatment, Marsupialization, gynae problems, योनी दुखणं, vaginal pain, बार्थोलिन सिस्ट लक्षणे, bartholin cyst surgery

Address

Anutej Athrav Society, Narveer Tanaji Wadi, Shivajinagar
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drsupriyapuranikmarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Drsupriyapuranikmarathi:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram