बालक पालक

बालक पालक "Celebrating the Unconditional Love: A Tribute to Moms Everywhere 💖 "

काल झोपताना कल्याणी ची पोस्ट वाचली आणि जाणवले आपला छंद आपण विसरूनच गेलो आहोत . जूने राइट अप शोधायला अनेक दिवसांनी मैसेंज...
03/10/2025

काल झोपताना कल्याणी ची पोस्ट वाचली आणि जाणवले आपला छंद आपण विसरूनच गेलो आहोत . जूने राइट अप शोधायला अनेक दिवसांनी मैसेंजर उघडला तर किती मैत्रिणींचे मेसेज बघितले . तू कुठे आहेस? लिहीत का नाहीये? नंबर दे , असे किती तरी . खूप जणी तर माझ्या फ्रेंडलिस्ट मधे सुद्धा नाहीत. इतकं छान वाटले ना मला .

मागच्या दिवाळी पासून जरा जास्तच परीक्षा घेतली देवाने . एकदम तावून सुलाखून काढले मला कर्मा च्या भट्टीत. पण तितकी ताकद पण दिली .

आता मी निग्रहाने ठरवले आहे . I am breaking the cycle of negativity in my life . बास आता माझ्या बरोबर काही वाईट होणार नाही . गेला पूर्ण महिना मी हेच मनाशी ठरवत आहे . रात्री झोपताना मनाला पक्क सांगते - उद्या असा दिवस जाणार आहे . सुरवातीला वाटायच आपल्या मनाचा वेडेपणा आहे पण आता जाणवते अरे हे खूप भारी आहे .

वैऱ्यावर येऊ नये अशी वेळ येऊन गेल्यावर नंतर हे काही चांगले मिळते ना त्याचे मोल फार असते आणि म्हणूनच ही मौल्यवान मोमेंट शेयर करते .

गेले अनेक दिवस मी माझ्यासाठी एक चांगले

ऑफिस शोधत होते मिळताच नव्हते , कामाचे स्वरूप असे स्पेसिफिकेशन तसेच हवे. शेवटी मनाचा निग्रह कमी आला आणि माझ्या मनासारखे झाले , जे लोकेशन चिंतले होते त्याच लोकेशन ला मला मस्त आणि माझ्या बजट मधे ऑफिस मिळाले .

गोष्टी सॉर्ट करा , सोप्या करा , व्यवसाय प्रॅक्टिकल आणि संसार इमोशनल करा. खूप खूप सोपे होते सगळे .

लिहिण्यास कारण की आनंद व्यक्त करायचा होता आणि मला ज्या गोष्टीचा उपयोग झाला ती शेयर करायची होती . अनेक दिवसांनी काहीतरी लिहले आहे. . गोड मानून घ्या

माझ्या लेकाच्या शाळेत एक खूप इंटरेस्टिंग विषय शिकवतात - तो म्हणजे financial literacy  - अर्थ साक्षरता . तर या विषयाच्या ...
17/09/2025

माझ्या लेकाच्या शाळेत एक खूप इंटरेस्टिंग विषय शिकवतात - तो म्हणजे financial literacy - अर्थ साक्षरता .

तर या विषयाच्या टेस्ट खूप भारी असतात . एक वर्गतल्या ५ - ५ मुलांचा गट करून प्रत्येक गटाला शाळेला लागणाऱ्या समानाची यादी दिली जाते . आणि डीमार्ट सारख्या स्टोर मधे सोडले जाते .
यादी मधे काय असते तर - टॉयलेट क्लीनर्स , सोप , टॉवल , napikn , पेन , पेन्सिली असे सामान . सुरवातीला त्यांना काही टेक्नीक शिकवले गेले , जस की ऑफर पहाणे , बारकोड वाचणे , कंटेट काय आहे ते पहाणे आणि मग नंतर
जी टीम कमीत कमी बजट मधे हे करेल ती विनर .
यामुळे माझे लेकरु खूप समुतदार झाले आहे .

परवा कल्याण भेळ मधे गेल्यावर सगळ्यात स्वस्त आणि जास्त पोट भरेल असा पदार्थ यावर रिसर्च केला आणि मग ऑर्डर दिली पठ्ठ्याने .

म्हणला कालच माझे क्रिकेट चे पैसे भरलेस ना म्हणून मग माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे . 🥹🥹 तिथे कुठ इमोशनल व्हाययला जागा नव्हती मग मी पण घरी येऊन इमोशनल झाले .
तोवर अत्यंत आवडला होता विषय .

आता आईडिया खुपच छान फँटास्टिक असली तरी आणि आपल्याला आवडली असली तरी लेकाची FL ची book अपडेटेड आहे इथ पर्यंतच माझे समाधान टिकले .

दुसऱ्या दिवशी पासून घरात हे काही येईल त्याचे विस्तृत विवरण झाल्याशिवाय वापरायला मिळायचे अवघड झाले . पनीर मागवले तर आई If paneer is homemade and fresh, it is healthy and should definitely be prepared at home when needed ,
महिन्याचं बजेट काढून झाल्यावर जर मी ब्लिंक इट / झेपतो वरून अर्जट डिलीवरी मागवली तर , आई you have to be more careful from next time . अशी वाक्य जाता येता ऐकू यायला / ऐकायला लागली.

आता दसरा दिवाळी तोंडावर आली म्हणल की एखादे पार्सल घरी येणार तर तेही ठेवायची चोरी झाली आहे . Sale जरी असला तरी एखादी वस्तू लिस्ट मधे नसेल . आत्ताच्या आत्ता गरजेची नसेल तर घेणे योग्य नाही . मार्क झुकेरबर्ग बघ तीनच टी शर्ट आहेत ... इत्यादी.. इत्यादी सुविचार सतत कानावर पडत आहेत .

भाजी आणि फळ ही स्वतः जाऊन लोकल
मार्किट मधून आणली तर स्वस्त असतात हा अनुभव घेतल्याने आता ते जर instamart मधून आले तर गुड बिहेवियर्स मधून माझा एक स्टार कमी केला जातो आहे .
त्याची स्वतःची मार्किट ला जायची तयारी असते तुला जमत नाही तर मी आणतो,
पण एकतर तो लहान आहे (असे मला वाटत) आणि हे सर्व त्याला अभ्यासाच्या वेळी आठवते आणि मग तो FL या विषयाचाच अभ्यास करतो. त्यामुळे मी पाठवत नाही.

देवाची आन घेऊन सांगते माझ्या सासुने कधीही मला शॉपिंग वरून टोकले नाही की माझ्या ऍमेझॉन / मिंत्राला नाव ठेवली नाहीत . पण गेले सहा महिने झाले पोराने उच्छाद आणला आहे. शिवाय बाबा दारात आल्या आल्या .. बाबा सांगू आईने ऍमेझॉन वरून अमुक मागवले ते मिसो वर इतक्यातच होते . 100 रुपिज एक्स्ट्रा गेले आपले 😫😐 अस जोरदार वाजवले जाते . बाबा काही बोलत नसला तरी पोराची फाइनेंसियल लिटरसी (FL) त्याच्या चांगलीच पथ्यावर पडलेली आहे ले लक्षात येतच की ..

मी म्हणुन टिकले ग ... बाई .. !
असे म्हणायाची सोय सुद्धा न ठेवता या विषयाने आम्हाला वळण लावले आहे. ते पण चांगले.

A Cautionary Tale for Parents: The Importance of Choosing the Right Shadow TeacherA six-year-old child had made remarkab...
09/02/2025

A Cautionary Tale for Parents: The Importance of Choosing the Right Shadow Teacher

A six-year-old child had made remarkable progress in therapy, achieving independence in reading small words and writing multiple lines unaided. Transitioning happily into school, his initial success was evident, with teachers praising his development. However, within a few months, concerns arose: he became reliant on multiple prompts to write and exhibited attention-seeking behaviors.

Upon investigation, it was discovered that his assigned shadow teacher, lacking a background in disability management, was inadvertently hindering his progress. She consistently prompted him, held his hand to increase writing speed, and reacted to every negative action, leading to increased dependency and behavioral issues.

Key Takeaways for Parents:
• Select Qualified Support: Ensure that any shadow teacher or assistant working with your child has a solid background in disability management and understands effective techniques to foster independence.
• Continuous Guidance: Regularly communicate with and guide the shadow teacher to ensure consistency in approaches and to address any challenges promptly.
• Monitor Progress: Stay vigilant about your child’s behavior and academic performance. If you notice any regression or negative changes, address them immediately with the support team.

Your involvement and careful selection of support personnel are vital in sustaining and enhancing your child’s growth.

Asmita Kulkarni
Child behaviour therapist and educator.
099224 16668

  अत्यंतिक दुःखाबद्दल सर्वकाही.ऑटिझम च्या सगळ्याच पोस्टला उत्तम प्रतिसाद मिळाला आता नवीन विषय काय घ्यावा ? हा विचार करत ...
23/01/2025



अत्यंतिक दुःखाबद्दल सर्वकाही.

ऑटिझम च्या सगळ्याच पोस्टला उत्तम प्रतिसाद मिळाला आता नवीन विषय काय घ्यावा ? हा विचार करत असतानाच माझ्याच मनाच्या काही कप्यांचा अभ्यास केला आणि हा विषय नक्की केला.

दुःख नाही असा माणुस जगात नाही. पण या दु:खाच्या स्थितीनुसार आपल्या बोध /अबोध मनात अनेक जाणीवा आणि गरजा यांचा उद्रेक किंवा दडपून टाकणे होते.

दुःखाचे प्रकार आधी पाहू आपल्या मधे यापैकी कोणता ना कोणता प्रकार आपल्याला लागू होतोच. हे माहित असेल तर जास्त जागरूक पणे आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो.

Anticipatory grief.

This refer to a sense of loss before the actual occurrence of loss.
या मधे बरेचदा घटना घडण्याआधीच त्याबद्दल ची भिती /दु:ख या भावना निर्माण होतात. आधीच्या घटनांशी संदर्भ लावून अस्वस्थता येऊ शकते.

Normal grief
Natural experience of loss
आपल्याला माहित असते की आता आपण हे गमावणार आहोत किंवा गमावलेले आहे. त्याबद्दल अतिव दुःख असूनही पुढे जाण्याव्यतिरिक्त पर्याय नाही.

Complicated grief.
Grief that prolonged and resultant in sever behavioral concern such as suicidal thoughts,addiction,mentle illness.
अशाप्रकारच्या आघातामुळे व्यक्ती मधे अतिशय टोकाचे परिमाण होतात. धक्का बसल्यामुळे जीवनेच्छा कभी होणे(दिर्घ कालावधीसाठी) आत्महत्येचे विचार येणे
व्यसनाधीनता वाढणे. मंत्रचाळेपणा करणे. असे मानसिक आजार उद्भवू शकतात.

आज दुःखाचे प्रकार पाहिले पुढच्या post मधे .

Asmita Makrand
Behavioral therapist .
9922416668

  Autism and second pregnancy! Considering a Second Pregnancy After Having a Child with Autism or Developmental Disorder...
30/12/2024



Autism and second pregnancy!

Considering a Second Pregnancy After Having a Child with Autism or Developmental Disorders

Deciding on a second pregnancy can be an emotional journey, especially if your first child has autism or a developmental disorder. As a parent, you might wonder about the risks, causes, and steps you can take to ensure a smooth journey ahead. Here are some important considerations and precautions:

1. Understand Genetic Factors
• Autism and developmental disorders may have a genetic component. Consult a genetic counselor to understand if there is an increased likelihood of recurrence and what testing is available.

2. Address Nutritional Deficiencies
• Maternal health plays a crucial role. Ensure optimal levels of folic acid, Vitamin D, and Omega-3 fatty acids before and during pregnancy, as deficiencies may increase developmental risks.

3. Environmental Factors
• Limit exposure to toxins such as pesticides, lead, and air pollution during pregnancy. These factors have been linked to an increased risk of developmental disorders.

4. Health Screenings
• Have a thorough pre-pregnancy health screening to rule out any underlying conditions. Conditions like thyroid imbalance or diabetes can impact fetal development.

5. Plan Prenatal Care
• Ensure regular check-ups with a doctor specializing in high-risk pregnancies. Early monitoring can help identify potential issues and manage them proactively.

6. Behavioral and Emotional Preparedness
• Understand the unique dynamics of raising a neurodiverse family. Plan for additional time, resources, and emotional support that may be needed.

7. Risk Reduction During Pregnancy
• Avoid alcohol, smoking, and medications not prescribed by your doctor. These can increase the risk of developmental issues.

8. Connect with Specialists
• Work with a neonatologist and pediatric specialists to ensure the best prenatal and neonatal care for your baby.

9. Build a Support System
• Raising one child with special needs while preparing for another can be overwhelming. Strengthen your support network, including family, therapists, and parent groups.

10. Stay Informed but Avoid Overthinking
• Every pregnancy is unique. While being cautious is important, focus on building a healthy environment and staying positive throughout the process.

Message to Parents:

While no one can completely eliminate risks, taking proactive steps can help you feel confident and prepared. Trust your instincts and seek guidance from professionals to make an informed decision about your second pregnancy.

दुसऱ्या गर्भधारणेपूर्वी घेतावयाची काळजी (पहिले मूल ऑटिझम किंवा विकासात्मक अडथळ्यासह असल्यास)

1. जैविक घटक समजून घ्या
• ऑटिझम आणि विकासात्मक अडथळ्यांमध्ये काही प्रमाणात अनुवांशिकता असू शकते. जेनेटिक काउंसेलरशी संपर्क साधून संभाव्य धोके आणि उपलब्ध चाचण्या यांची माहिती घ्या.

2. आहारातील कमतरता दूर करा
• आईचे आरोग्य महत्त्वाचे आहे. फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन D, आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड यांचे योग्य प्रमाण सुनिश्चित करा, कारण यांची कमतरता विकासात्मक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

3. पर्यावरणीय घटकांवर लक्ष ठेवा
• गरोदरपणात कीटकनाशके, शिसे, आणि वायुप्रदूषण यांसारख्या विषारी घटकांपासून दूर रहा. हे घटक विकासात्मक अडथळ्यांच्या जोखमीशी संबंधित आहेत.

4. वैद्यकीय तपासणी करा
• गरोदरपणापूर्वी संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्या. थायरॉईड किंवा मधुमेह यांसारखे आजार गर्भाच्या विकासावर परिणाम करू शकतात.

5. गर्भारपणाची पूर्वतयारी करा
• उच्च-जोखमीच्या गर्भधारणेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर तपासणी करून संभाव्य अडचणी ओळखता येतील आणि योग्य वेळी उपचार करता येतील.

6. भावनिक आणि वर्तनात्मक तयारी
• न्यूरोडायव्हर्स कुटुंबातील जबाबदाऱ्य समजून घ्या. अतिरिक्त वेळ, साधने, आणि भावनिक समर्थन यासाठी नियोजन करा.

7. गर्भधारणेदरम्यान जोखीम कमी करा
• अल्कोहोल, धूम्रपान, आणि डॉक्टरांनी न सांगितलेल्या औषधांचा वापर टाळा. हे विकासात्मक समस्यांचा धोका वाढवू शकतात.

8. विशेष तज्ञांचा सल्ला घ्या
• नवजात तज्ज्ञ आणि बालवैद्यकीय तज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधा, जेणेकरून आपल्या बाळासाठी सर्वोत्तम वैद्यकीय काळजी मिळेल.

9. समर्थन यंत्रणा तयार करा
• विशेष गरजा असलेल्या मुलाचे संगोपन करताना दुसऱ्या बाळासाठी तयारी करणे कठीण होऊ शकते. आपल्या कुटुंब, थेरपिस्ट, आणि पालक गटांचा आधार घ्या.

10. माहितीपूर्ण राहा पण चिंता करू नका
• प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते. काळजी घेणे आवश्यक आहे, पण सकारात्मक वातावरण तयार करून आणि ताण न घेता तयारी करणे महत्त्वाचे आहे

For consultation connect with us on 099224 16668

16/12/2024

नवरोबाच्या किरकोळ सर्जरी साठी हॉस्पिटल ची वारी झाली ,
आणि पुन्हा एकदा आपल्याला ईश्वराचे असंख्य आशीर्वाद आहेत याची जाणीव सुधा.

शेजारच्या वार्ड मधे एक मावशी आपल्याला मुलीला सोबत आल्यात बरोबर अन्य कोणीही नाही . हातात चिठ्ठी घेऊन हे कुठे आहे इथे कस जायचे? विचारात होत्या. त्यांना म्हणाले चला मी सोडते लिफ्ट च ओड इवन च गणित ना कळल्याने चुकलेल्या त्या . मोठ्या शहरातले हे भलामोठा हॉस्पिटल बघूनच जीव दडपला असणार याचा अंदाज मला आला .
खर म्हणजे इथला स्टाफ अतिशय तत्पर असतो पण यूनिफॉर्म वाल्या नर्स ला काही विचारायच म्हणाले तरी भीड आड येणार हे मला माहीत आहे . मी स्वतःहून च म्हणले
मावशी काही लागले ना नर्स ला विचार बिनधास्त. आणि उद्या मुलीच ऑपरेशन आहे तर खाली पैसे भरून मदतनीस घ्यायची तर घेऊ शकता.
हे ऐकून मावशींचा जीव भांड्यात पडला. मला म्हणाल्या हे वर झालं
पैशाच काही नाही बाई खर मला काही त्यातला कळत नाही कोणीतरी मदतीला पाहिजे बघ. त्यांचा तो रिलैक्स झालेला चेहरा इतका लक्षात राहिला माझ्या , की चला आता काही अडणार नाही असा भाव होता .

वरती आले तर एक बरेच वयस्कर आजोबा बेंच वर बसून होते . आजी एडमिट होत्या आणि केयरटेकर होती आज्जी बरोबर रूम मधे , तिला ऑकवर्ड होऊ नये म्हणून आजोबा बाहेर बसलेले . बायकोला सोडून घरी जाववत नाही आणि रूम मधे कस जाणार ? अस सगळं चालू होत त्यांचं, कोणाशी तरी फ़ोन वर बोलत होते , प्रॅक्टिकल विचार होत नाही रे बाबा . असुदे आजच्या दिवस थांबतो इथे , तिकडची व्यक्ती केयरटेकर आहे तुम्ही घरी जा म्हणून समजवत होती पण आजोबा ऐकत नव्हते . आज्जी ला काही झाल तर मी एकटा असा विचार त्यांना सकाळ पासून अनेकदा हादरवून गेला असणार . चेहरावरच्या सुरकुत्या आज एका दिवसात अजून गहिऱ्या झाल्या असणार . मागची अनेक वर्ष आठवली असणार .

आज सर्जरी करायची असल्याने डॉक्टर नी पहाटे पाच ला नाश्ता करायला सांगितलाय - रात्री उशिरा एडमिट झाली त्यामुळे दीर नष्टा घेऊन येणार हे गणित डोक्यात असल्याने बाकी काही आणले नव्हते . आता झाली का पंचाईत? पहाटे पाच ला कुठून काय आणायचे? म्हणून रात्रीच पुन्हा कँटीन मधे गेले तर आत्ता पडून काही घेऊ नका ५ ला चहा नास्ता मिळेल असे आश्वासन मिळाले . २४ तास उघडे असलेल्या कँटीन चा किती लोकाना आधार असेल नाही का ?

पहाटेच्या ब्रेकफास्ट ची सोय झाली खरी पण कँटीन जरा आड बाजूला आहे . ४.३० ला तिथे जायच म्हणजे अंगावर काटा आला . दुसरे कोणी नसेल तर? बापरे! दबकतच वॉचमन ला म्हणाले नव्या बिल्डिंग मधले कँटीन उघडे असेल ना? तिकडे जाते . तर म्हणला इथेच जा खाली महिला गार्ड आहेत. मग माझे मलाच हसू आले. एरवी मारे झाशी की राणी बनून फिरत असतेस बघ किती भित्री भागू बाई आहेस . नष्टा घेऊन वर आले अगदी निर्धास्त . कँटीन मधे चांगली जाग होती . चहा द्यायला आलेल्या पोऱ्याला ८ ला कॉलेज ला जायच होत म्हणून रूम सर्विस च्या ऑर्डर चा चहा द्यायची गडबड करत होता . साडेसात नंतर रूम सर्विस सुरू होते म्हणून त्रागा करवून दुसऱ्याला सांगत होता सहाला सुरू झाली तर बरोबर पोचतो बघ मी त्या वेळात.

प्रीमियम इन्शुरन्स असल्याने मला साध मेडिसिन आणायला ही रूम च्या बाहेर पडाव लागत नाहीये . आणि पैशाची जमवा जमव सुद्धा करायची नाहीये , प्राइवेट रूम च्या पैकेज साठी कशाला उगाच पैसे घाला असा विचार सुधा करावा लागत नाहीये . मी आहे ग मी येते ऑपरेशन च्या वेळी म्हणून घट्ट हात पकडणारी जाऊ आहे. आणि दाद्या मी थांबतो आज इथे, वहिनी तुम्ही घरी जा , असा आग्रह करणार दीर आहे , एक फ़ोन वर च्या अंतरावर राहणारे आणि मनापासून करायची इच्छा असणारे नातेवाईक आणि मित्रमंडळ पण .जर्नल वार्ड च्या बाहेर कडाक्याच्या थंडीत रात्रभर खुर्चीवर बसून काढणारे बघितले आणि दैवाने आपल्याला किती काय दिले याची जाणीव झाली पुन्हा एकदा आई वडीलांची पुण्याई आणि देवाला हात जोडले .

सगळ्यात महत्वाच्या म्हणजे बाबा आणि आई दोघंही जवळ नसताना माझा लेक दोन्ही आजीच्या कुशीत निर्धास्त झोपलेला असेल . या सगळ्या प्रोसेस मधे त्याला उगाच अकाली समजूतदार व्हाव लागत नाहीये .

त्या कँटीन मधल्या पोऱ्याला हवी तशी सहाला रूम सर्विस चालू होऊ दे,
आजोबांच्या आज्जीला बार वाटू दे , लिफ्ट मधल्या मावशीला आज चांगली मदतनीस मिळूदे आणि तिच्या लेकीच ऑपरेशन सुखरूप पार पाडू दे आणि जनरल वार्ड च्या सर्वांसाठी इन्शुरन्स ची छान सेवा निर्माण होऊ दे रे देवा! म्हणत निद्रादेवी परत प्रसन्न होण्याची वाट पाहत
बाहेर बघते तर काय मटर्निटी वार्ड च्या बाहेर गर्दी वाढली आहे . आणि आतून नवजन्माचा आवाज येतोय चेहेरे फुलले आहेत आणि सकाळ होती आहे .

पुन्हा एकदा सांगते" ग्रैटिट्यूड "इतकं सुंदर या जगात काहीही नाही .

Big shout out to my newest top fans! 💎 Big shout out to my newest top fans! 💎Ujjwala Kanitkar
24/07/2024

Big shout out to my newest top fans! 💎 Big shout out to my newest top fans! 💎

Ujjwala Kanitkar

21/07/2024

Urgent Call to Action: Protect Our Children's Health!
Supriya Sule
(Hon. Member of Lok Sabha)
Devendra Fadnavis

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Murlidhar Mohol

PCMC Muncipal Co-operation

Tanaji Sawant - तानाजी सावंत(health ministry )

Rahul Jadhav

Usha Manohar Dhore -Mai

We are facing a critical issue that demands immediate attention and action. A garbage depot (tathwade garbage depot) in the designated parking area, according to the development plan, is not only illogical but also poses a severe health risk to our children. This depot is perilously close to the school zone affection school, turning what should be a safe learning environment into a hazardous zone.

Health Concerns:

Air Quality:
The presence of a garbage depot leads to the release of harmful gases and unpleasant odors, significantly degrading the air quality around the school. This can cause respiratory problems and aggravate conditions like asthma in our young students.

Disease Risk:Garbage depots attract pests and rodents, which are vectors for various diseases. The close proximity to the school increases the likelihood of disease transmission.
Mental Well-being:Constant exposure to foul smells and an unsanitary environment can impact the mental well-being of students, leading to stress and anxiety.

We Demand

1. Relocation of the Garbage Depot: Move the garbage depot to a location that does not pose a threat to the health and safety of our children and the community.

2. Transparent Development Plans: Ensure future development plans prioritize the well-being of residents and adhere to environmental safety standards.

3. Regular Health Assessments: Conduct frequent health and environmental impact assessments around schools to prevent similar issues in the future.

Our children deserve a safe and healthy environment to learn and grow. Let's come together to demand change and ensure that their well-being is not compromised by poor planning decisions.

Your presence and support can make a difference. Together, we can create a safer, healthier community for our children.



We the responsible ‘tax payers ‘and worried parents who cast our vote betterment and expecting sincere cooperation from all the readers of this of this post .

Please refer letters and application.

तुमची मुले तीन - एज मधे असतील तर हे नक्की वाचा  What is Silent bulling in the school?काल एक पोस्ट वाचनात आली की दहावीतला...
15/07/2024

तुमची मुले तीन - एज मधे असतील तर हे नक्की वाचा

What is Silent bulling in the school?

काल एक पोस्ट वाचनात आली की दहावीतला मुलगा शाळेत जायला नकार देतोय ,रडतोय . आत्ता पर्यंत काही प्रॉब्लम नाही पण आता असे होते आहे . हे फक्त उदाहरण म्हणून बघू हां

की मुलगा दहावीत आहे , हुशार आहे , अभ्यासात छान आहे मग प्रॉब्लम काय ?

तर प्रॉब्लम हा आहे की आत्ता ची जनरेशन z हे खूप स्मार्ट आणि ओवर
knowladgeble आहे .

सेक्स , सागा, बीडीएसएम हे शब्द आणि त्याचे अर्धवट अर्थ सुद्धा त्यांना माहित आहेत . शिवाय सोज्वळ पणे हे लपवणे , how innocent I am हे pretend पण मस्त करता येत . Baby at home , bad at school (environment) असा सगळा फंडा . आता इथे जो खर्रच साफ सरल आहे त्याला टारगेट करायचं , समजा अडचणीत अलोच तर ग्रुप ने त्याला येडा ठरवायचं ( माझी नाही मुलाची भाषा आहे )

अर्थात सगळेच असे नसतात. आणि इथेच सगळं सुरू होत. जी मुले सरळ , साधी असतात त्यानं टारगेट करून साइलेंट ली त्यांच्या भावनांचा गैर फायदा घेतला जातो. मुलीही काही कमी नाहीत् . अशा मुलाला
जाळ्यात ओढायचं मग नंतर इमोशनल ब्लैकमेल मग एस कर नाहीतर टीचर ला सांगेन तास कर नाहीतर आईला सांगेन. (यात ही मूले टीम ने काम करतात, आणि इतका पद्धतशीर की संशयाला जाग नाही) आणि सरळ साधी मुले या ब्लॅकमेलिंग ला घाबरतात . आणि मग डिनायल ला सुरवात होते .

मारहाण केली की लक्षात तरी येते , वागणे कसे लक्षात येईल तेही स्वीट ..

तू पुरुष नाहीस / तू मुलगी नाहीस / तू सुंदर नाही / तुझे स्तन हवे तसे नाहीत so you are not made for men’s . Ase gender specific bullies झाल्याच्या घटना कितीतरी होतात आणि रेप्यटेशन साठी दबल्या पण जातात .

सगळ्यात वाईट हे की मुल एक्सट्रीम साइन दाखवत नाही तोवर त्य बाहेर ही येत नाहीत . सुख दुखतंय? आम्ही इतका करतो आणि तू काय करतोस? नुसत शाळेला जाणे होत नाही का? अशी डफरा डफरी होते मुल अजून कोमेजते.

इथे एक गोष्ट अशी आहे की हे salient बुली करणारे ग्रुप सुधा लहान मुलांचे (adolescent) मुलांचेच आहेत . काही मालिका / पिक्चर्स. साईट्स, पॉर्न साईट्स वरून सिस्टिमेटिकली शिकलेले असतात . ही मूले पण विक्टिम च असतात . बुली होणाऱ्या मुलापेक्षा बुली करणाऱ्या मुलानं ट्रीटमेंट ची गरज जास्त असते पण आमच मुल चांगल्या घरातले आहे म्हणून ते असे करणे शक्य नाही या भ्रमात पालकांनी राहू नये .

इंटरनेटच्या बेफाम वापराने मुले भयंकरच्या वाटेवर आहेत याच भान लवकरात लवकर ऐल तर बेयर होईल . नाहीतर smart yet mentally ill जनरेशनचे जन्मदाते तुम्ही आम्ही असू ….

हे सिद्ध जरी झाले तरी शाळा एक्शन घेत नाही कारण एकतर ग्रुप
ब्लेम त्य सरळ
मुलावर असतो आणि रेप्यटेशन महत्वाचं असते . जेव्हा माझी नवी नवी प्रैक्टिस होती तेव्हा एका शाळेबरोबर टाई अप होते आणि अशाच सिलीलर केस मधे शाळेवर ब्लेम येतोय म्हण्यावर त्यांनी माझे contract terminate केलं होत . सुदैवाने शाळा बंद पडली हे बरचं झाले .

तूर्त इतकाचं…

Asmita Kulkarni
Behavioural psychologist

Address

Poona
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when बालक पालक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to बालक पालक:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram