10/08/2021
नाते आणि लग्न "नारसिस्सीटिक' व्यक्ती शी झाले असेल तर ते तुटणारच -डॉ वैभव लुंकड©️
वरून खूप छान वाटली ती, तो तिच्या प्रेमात पडला, तिने ही खूप हुशारी करून त्याला आपल्या पूर्ण कंट्रोल खाली पकडला. तो स्वातंत्र्या साठी गया वया करत राहिला. तिने त्याला सर्वांपासून हळूहळू युक्तीने तोडला.आता तो तिच्या साठी सोन्याची अंडे देणारी कोंबडी होता. पण एक दिवशीं तिने कोंबडीलाच खायचे ठरविले. कोंबडी धूम ठोकून आई वडीलांकडे राहुरी ला पुण्यातून पळून गेली. इकडे चवताळून घाऱ्या डोळ्याच्या घारीने आपली शिकार सुटून जाते की काय हातातून म्हणून आईच्या मार्गदर्शनाखाली खोट्या पोलीस केसेस टाकून नवऱ्याला ना घरका ना घाटका करून ठेवले. बीपी वाढत गेले त्याचे भीतीने आणि आधीच बापड्या भित्रा भोळा बावळट.नवऱ्याचे पूर्णतः मानसिक खच्चीकरण करण्या साठी त्याच्या कंपनीत जाऊन बरीच नाटके व गोंधळ घातला. फक्त नशीबा मुळे नोकरी तात्पुरती वाचलेली आहे. पण पोलिसांनी व वकिलांनी पण गैरफायदा घेतला तर ती नौकरी टिकणे मुश्किल. नवरा मुलगा शॉक खाली संपूर्ण हवालदिल. कायद्याचे फायदे म्हणा किंवा गैरफायदेच जास्त घेताना दिसतात मुली आजकाल मिश्किल. हा मुलगा आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला नव्हे, तर ह्या नारसिसिस्टिक मुलीने त्याला आणला. कारण तो चूप राहिला व गेला तर तिचा खेळ उघडकीस येणार नाही. मुलाला काउनसेलिंग अतिशय गरजेचे पण त्याचे खाते, कार्ड, सर्व काही तिच्या हातात. घार आपल्या शिकराला धड जगून देत नाही आणि लगेच पूर्ण मारून ही टाकत नाही. अशा या अत्यंत हुशार घारीला ना कायद्याने पकडता येतंय ना हुशारीने शिताफिने. घार आपल्या आई सोबत नवऱ्याकडून बळकावलेल्या टू बिएचके फ्लॅट मध्ये आरामशीर तग धरून आहे. घार पकडणे कोणाला जमणार नाही हा तिच्या ओव्हर कॉन्फिडन्स मुळे ती सापडेलच पुराव्या सह कधीतरी, अशी आशा बाळगतो मी.घार आता तरी मजेत आहे. पण कर्म परत फिरते कधीतरी. आणि घार तिच्या आईसह पोलिसांना रंगेहाथ पुराव्या सकट सापडते. मामला अत्यंत गंभीर. पैसे देऊन सहज मिटविता येईना.
माफी मागून थोड्या वेळे करिता शांत बसले आहेत घार व तिची आई, आता माहित नाही या नारसिसिस्टिकचा पुढचा शिकार कोण होई..... इतिहासात शकुनी मामा, कंस, दुर्योधन, मंदोदारी, कैकेयी, औरंगजेब, अफझल खान, हे सगळे नारसिसिस्टिक पात्रे. आपल्या आजूबाजूला ही नारसिसिस्टिक लोक आहेत, त्यांना वेळीच ओळखा आणि त्वरित दूर करा.......... स्वतः सुख घ्यायचे नाही आणि दुसऱ्याला सुखी होऊन द्यायचे नाही हे त्यांचे ब्रीद्वाक्य आहे, आणि आपला विश्वास ही बसणार नाही की हा खतरनाक सरडा आहे.