
24/07/2025
पद्मश्री , पद्मभूषण , पद्मविभूषण आणि पुण्याचे पुण्यभूषण असणारे डॉक्टर के एच संचेती यांचा आज वाढदिवस ! 90 व्या वर्षात पदार्पण करत असताना त्यांनी घडवलेल्या अनेक डॉक्टरां सोबत आयोजित आनंद सोहळ्यात , मला हास्याद्वारे वातावरण प्रफुल्लित करता आले. तसेच मला आणि हर्षदा ला त्यांचा आशीर्वाद लाभला हे आमचे भाग्य !
आंतरराष्ट्रीय पातळीवर संचेती हॉस्पिटल चे नाव सन्मानाने घेतले जाते. डॉक्टर पराग संचेती यांनी आवर्जून कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलावले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या हास्य क्लब चळवळीला त्यांचा कायम पाठिंबा राहिला आहे.
संस्थेच्या 240 शाखा व 25 हजाराहून अधिक शाखा सदस्यांद्वारे डॉक्टर के एच संचेती यांना आभाळभर शुभेच्छा!
जीवेत शरद: शतम् ...💐💐💐
- मकरंद टिल्लू
(हॅप्पीनेस कोच, लाफ्टरयोगा मोटिवेशनल ट्रेनर)