Dr. Kalpana's Homoeopathic Mental Health Clinic & Counselling Center

  • Home
  • India
  • Pune
  • Dr. Kalpana's Homoeopathic Mental Health Clinic & Counselling Center

Dr. Kalpana's Homoeopathic Mental Health Clinic & Counselling Center MD Predictive Homeopath & psychiatrist. We provide homeopathic treatments covering all the diseases. Her treatments approach is entirely different and unique.

We do Psychotherapies, Hypnotherapy, career guidance and Teach Life management skills. Dr. Kalpana’s Homeopathic Mental Health Clinic & Counselling Center is a rapidly growing mental health care center in Pune which is started by Dr.Kalpana Bhumbre. Dr. Kalpana Bhumbre, M.D. Psychiatry (Homoeopath) is a Psychiatrist, Clinical Hypnotherapist, Psychotherapist, Homeopathic Physician and an excellent Counselor. She is one of the Psychiatrists from the Homeopathic system of medicine in Pune. Her metaphysical approach for life is very rational and hence his way of treating a sick person is very natural, holistic and painless. She treats her patients by helping to develop their insight for life, health and sickness. She merely prescribes medicine for altered health and encourages her patients to go for self recovery by strengthening their will power. She gives great emphasis to real cause of sickness and helps to change the mental and physical behavior pattern. She uses different psychological techniques like Counselling, Psychotherapy, Cognitive Behavioral Therapy, Hypnotherapy, Metaphysical Therapy and Bach Flower Therapy along with Homeopathic treatment to help patient for complete recovery, not only from sickness to health but comprehensive meaning of health i.e. physical, mental, social and spiritual health. She has a great professional Experience in academics and clinical practice. She is actively involved in teaching Medicine, Psychiatry and homeopathic subjects in Homoeopathic colleges LSFPEF’s LHM Chinchwad, Pune as a lecturer and a clinician in research ethical committee.

09/11/2025

"I AM DONE"
Some time we feel's like we have done, everything is over, but believe me its new beginning my friend.
"A journey unfolds to find true self, to bloom where you were planted, and to love self without conditions."

31/10/2025

“अश्रू — न बोललेली माणुसकीची भाषा”

अश्रू… हे फक्त पाण्याचे थेंब नसतात.
ते मनाच्या गाभ्यात साठलेले शब्द असतात -
जे कधी ओठांवर यायला धजत नाहीत,
आणि शेवटी डोळ्यांतून वाहत बाहेर येतात.
अश्रूंमध्ये वेदना असते, पण तीव्र प्रेमही असतं.
कधी हरवलेल्या माणसासाठी,
कधी अपूर्ण राहिलेल्या नात्यासाठी,
तर कधी स्वतःलाच समजावण्यासाठी ते वाहतात.
माणूस जेव्हा रडतो,
तेव्हा तो कमकुवत नसतो —
तो त्या क्षणी सर्वात प्रामाणिक, खराखुरा आणि जिवंत असतो.
हसणं सगळ्यांना येतं, पण रडणं —
ते फक्त त्या मनाला जमतं ज्याने वेदना अनुभवली असते.

शांततेच्या मागची किंकाळी…

शांत दिसणाऱ्या माणसाच्या आत
किती वादळं दडलेली असतात, हे कुणाला कळत नाही.
त्याच्या चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा असतो,
पण आत मात्र आठवणींचा गुंता,
वेदनांचा जडपणा, आणि न बोललेले शब्द साचलेले असतात.
लोक त्याच्या शांततेला उदासीनता समजतात,
पण ती खरं तर मनाच्या किंकाळीचं मौन असतं.
कधी तरी कोणीतरी आपुलकीने विचारतं —
“कसा/कशी आहेस?”
आणि ते दोन शब्द पुरेसे ठरतात —
डोळ्यांत दाबलेले अश्रू ओघळण्यासाठी.
कारण त्या क्षणी वाटतं —
“अजून कुणीतरी आहे, जो समजून घेतो… न्याय करत नाही.”

समजून घेणं — हीच खरी माणुसकी

आपण सगळे कुणाच्या ना कुणाच्या वेदनेचं कारण होतो,
पण आपण किती वेळा कुणाच्या वेदनेचं उत्तर बनतो?
या जगात माणसं खूप भेटतात,
पण समजून घेणारी मनं फार थोडी असतात.
कधी तरी थांबा…
आणि कोणाचं मन शांततेने ऐका.
कारण काही लोकांना उपाय नको असतो —
फक्त आपुलकीनं ऐकणारा कान हवा असतो.

अश्रूंनी बोललेली भाषा

अश्रूंना आवाज नसतो, पण अर्थ असतो.
ते नात्यांच्या अंताची गोष्ट सांगतात,
आठवणींची वेदना मांडतात,
कधी स्वतःवर झालेल्या अन्यायाचं नि:शब्द उत्तर देतात.
त्या प्रत्येक थेंबात एक कहाणी दडलेली असते —
ज्यानी प्रेम केलं पण व्यक्त करू शकले नाही,
ज्यानी सहन केलं पण बोलू शकले नाही,
जे हसत राहून आतून तुटत गेले.

त्यांना शांतपणे ऐका आणी समजून घ्या

जीवनात फार काही लागत नाही —
थोडं समजून घेणं,
थोडं प्रेम देणं,
आणि थोडं शांतपणे ऐकून घेणं शिका.
कारण कधी कधी माणूस शरीराने जगत असतो,
पण मनाने मरत असतो.
एखाद्याच्या डोळ्यांतले अश्रू पाहून
त्याचं दुःख ओळखा…
कारण प्रत्येक थेंबामागे
एक न सांगितलेली कहाणी असते —
आणि ती कहाणी…
कदाचित तुमच्याही मनाशी संबंधित असते.

डॉ. कल्पना दीपक भुंबरे, MD (Hom.) psychiatry

शांततेचा आवाज— जेव्हा मन थकलेलं असतं, पण सांगत नाहीकधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की त्या शांततेतच एक आवाज दडलेला असतो — ...
29/10/2025

शांततेचा आवाज
— जेव्हा मन थकलेलं असतं, पण सांगत नाही

कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की त्या शांततेतच एक आवाज दडलेला असतो — "आपल्या थकलेल्या मनाचा."
आपण सगळं ठीक असल्याचं दाखवतो — हसतो, काम करतो, नाती निभावतो — पण आत कुठेतरी आपल मन म्हणजेच “मी” थकलेलं असतं.
ते काही मोठं दुखणं नसतं, पण सतत काहीतरी ओढत असतं, थांबायला सांगतं.

आजच्या वेगवान जगात आपण सगळे धावत आहोत — गुणांसाठी, यशासाठी, ओळखींसाठी. पण या धावपळीत स्वतःकडे पाहायला वेळ कोणाला आहे?
आपण इतरांना समजून घेण्यात इतके गुंततो की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायचाच विसरतो. आणि एक दिवस अचानक वाटतं — सगळं आहे, पण काहीतरी हरवलं आहे.

शांततेचा आवाज म्हणजे तो क्षण, जेव्हा मन ओरडत नसतं, पण आपल्याला थांबायला सांगतं.
थोडं स्वतःसाठी जगा — एक कप चहा स्वतःसोबत घ्या, आकाशाकडे बघा, गप्प बसा. कारण शांततेत मन स्वतःचं औषध शोधतं.

काही प्रवास असे असतात, जे आपल्यालाच एकट्यानं चालायचे असतात.
ते एकटेपण वेदना नसतं, तर आत्मशोध असतो.
त्या नि:शब्द प्रवासातच आपलं खरं अस्तित्व म्हणजेच “मी” सापडतं — थकलेलं, पण अजूनही जगण्याची आस असलेलं.

म्हणून …
शांततेचा आवाज दाबू नका — तोच तुम्हाला पुन्हा जगायला शिकवतो.
कारण कधी कधी, सर्वात मोठं उत्तर शब्दांत नाही, तर शांततेत दडलं असतं.

डॉ. कल्पना दिपक भुमरे
MD (Hom.) Psychiatry.

📖 "पढ़ने की आदत, जीने की राहत"(विश्व पठन दिवस पर एक भावनात्मक लेख)तस्वीर मे...एक लड़की किताबों से बने शब्दों को गले लगा ...
15/10/2025

📖 "पढ़ने की आदत, जीने की राहत"
(विश्व पठन दिवस पर एक भावनात्मक लेख)

तस्वीर मे...
एक लड़की किताबों से बने शब्दों को गले लगा रही है — जैसे उसने ज्ञान, सुकून और आत्मा को गले लगा लिया हो।
ऊपर लिखा है —
“और इन्हें पढ़ने की आदत डालिए।”
कितना गहरा संदेश है इसमें...
क्योंकि किताबें सिर्फ पढ़ने के लिए नहीं होतीं — वो महसूस करने के लिए होती हैं।

"किताबें – जो हमें समझती हैं"

कभी सोचा है, जब हम उदास होते हैं तो किताबें कैसे हमें चुपचाप संभाल लेती हैं?
कभी पन्ने पलटते हुए लगता है जैसे किसी पुराने दोस्त से मुलाकात हो गई हो।
किताबें हमें सुनती हैं — बिना टोके, बिना जज किए।
वो हमारे भीतर झाँकती हैं, हमारे सवालों को सहेजती हैं, और जवाब भी खुद में छिपाए रखती हैं।

"पढ़ना मतलब अपने आप से बात करना"

हर किताब अपने पाठक से संवाद करती है।
कभी वो हमें सोचने पर मजबूर करती है,
कभी अपने भीतर झाँकने पर।
किताबें हमें बदलती हैं — धीरे-धीरे, पर गहराई से।
हर शब्द हमारे भीतर कुछ नया बोता है — एक विचार, एक भावना, एक उम्मीद।

"डिजिटल शोर में खो गई वो खामोशी"

आज स्क्रीन की रोशनी ने आँखें तो चमका दीं,
पर आत्मा को थका दिया।
“रील्स” और “पोस्ट्स” के इस दौर में
पन्नों की ख़ुशबू, कागज़ की सरसराहट कहीं खो सी गई है।
पर याद रखिए —
फोन की स्क्रीन ‘लाइट’ देती है,
किताबें ‘रोशनी’ देती हैं।

पढ़ने की आदत क्यों ज़रूरी है?

यह हमें अंदर से मज़बूत बनाती है।

यह हमारी भाषा और सोच को निखारती है।

यह हमें संवेदनशील और समझदार बनाती है।

यह हमें अकेलेपन में साथी और जीवन में दिशा देती है।

"विश्व पठन दिवस का सन्देश"

पढ़ना कोई शौक नहीं — यह एक यात्रा है।
हर किताब एक नया रास्ता खोलती है,
हर कहानी में एक नया जीवन बसता है।
तो आज, इस पठन दिवस पर,
अपने व्यस्त जीवन से कुछ पल निकालिए,
एक किताब खोलिए...
शब्दों को महसूस कीजिए,
और उन्हें अपने दिल से लगाइए।

क्योंकि किताबें भी चाहती हैं — कोई उन्हें पढ़े, समझे और प्यार करे।

🙏विश्वपठनदिन की आप सभी को बहुत शुभकामनाएं! 🙏

Dr. Kalpana Bhumbre

“वारी चरणसेवा: भक्ती, सेवा आणि साक्षात्काराचा अनुभव"मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या संकल्पनेतून उभारी घेतलेली वारीतील भक्तीस...
26/06/2025

“वारी चरणसेवा: भक्ती, सेवा आणि साक्षात्काराचा अनुभव"

मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या संकल्पनेतून उभारी घेतलेली वारीतील भक्तीसेवा
________________________________________
✦ वारकरी परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक जीवनाची अविभाज्य शिरा.
प्रत्येक आषाढी एकादशीला लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिपाठाच्या गंगेत न्हालेल्या अवस्थेत, वैष्णवांचे ठायी पंढरीचा रस्ता धरतात.
वारी म्हणजे चालणं नव्हे, ती एक अंतःकरणातील स्फुरणाची यात्रा असते.
दरवर्षी लाखो वारकरी आपल्या घरापासून पंढरपूरच्या वाटेवर निघतात.
• कुणाच्या पायात चप्पल नसते
• कुणाच्या डोळ्यात अश्रू असतात
• पण प्रत्येकाच्या हृदयात असतो फक्त एकच देव – माझा विठोबा
________________________________________
✦ जगात अशी कोणती यात्रा आहे?
जिथे लाखो लोक उन्हातान्हात चालतात, पावसात भिजतात,
पण चेहऱ्यावरून थकव्याचा लवलेशही नसतो?
हे फक्त वारकऱ्यांनाच जमू शकते –
कारण त्यांच्या चालण्याला साथ असते भक्तीची,
आणि मुखात असते फक्त एकच नाव – श्री विठोबा.
________________________________________
✦ “वारी चरणसेवा” – एक सेवाभावाने नटलेली योजना
या भक्तिरसपूर्ण वारीमध्ये अभिनव, भक्तिश्रद्धेने प्रेरित, जनसेवेचे सुंदर उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “वारी चरणसेवा”.
महाराष्ट्राच्या या पवित्र वारीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभी केली आहे एक अशी सेवा,
जी शासनाची नव्हे, तर भावनेची योजना आहे.
जेव्हा एखादा राजा स्वतःला त्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेत झोकून देतो,
तेव्हा तो राजा नसून वारकऱ्यांचा दिंडीतील सेवक होतो.
________________________________________
✦ संतांचा अभंग आणि मुख्यमंत्र्यांची सेवा
"जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले..."
"तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा..."
या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की,
जो दु:खी, पीडित व्यक्तीला आपला समजतो आणि त्याच्या सेवेत स्वतःला अर्पण करतो, तोच खरा साधू —
आणि देवही त्यातच वास करतो.
________________________________________
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना केवळ प्रशासनापुरती ठेवलेली नाही,
तर ती त्यांच्या अंतःकरणाची भक्तीसेवा आहे.
पंढरपूरच्या दिंडीत, धुळीच्या वाऱ्यात, टाळ-चिपळ्यांच्या गजरात
जेव्हा एखादा पाय थकतो,
तेव्हा त्या पायांना आधार देण्यासाठी शासनाची नव्हे, तर सेवक वृत्तीची सावली उभी केली जाते.
________________________________________
✦ माझा अनुभव...
“वारी चरणसेवा” देताना मी आयुष्यात पहिल्यांदा इतकं समाधान अनुभवलं.
“सामाजिक काम शिकताना पुस्तकं वाचली होती, पण आज पाय थकलेल्या भाविकांचे अश्रू पुसताना वाटलं –
‘सेवा म्हणजे पांडुरंगाचं दर्शन!’”
“वारकऱ्यांचे फाटलेले पाय, त्यांच्या डोळ्यांतील प्रेम,
आणि त्यांनी हात जोडून दिलेला आशीर्वाद,
‘तुज्यात पांडुरंग दिसतोय बाळा...’ यापेक्षा मोठं काहीच नाही”.
“आम्ही आमचे करिअर इथे शोधलं नाही, पण आमचं अस्तित्व आणि अर्थ इथे सापडला.”
________________________________________
✦ संतांचा अभंग आणि सेवकांची भक्ती
– संत ज्ञानेश्वर म्हणतात
“उभा विठोबा अंगणात माझ्या | चरण धरावे भक्तिभावाने...”
हे अभंग केवळ ओळी नाहीत,
तर "चरणसेवा" मध्ये सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आणि विद्यार्थ्याच्या हृदयात धडकणारी भक्तिरचना आहेत.
– संत तुकाराम म्हणतात
"जिथे करुणा, तिथेच नारायण"
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीच्या या भक्तीरसात सेवेची करुणा मिसळली आहे.
त्यांची कल्पकता ही केवळ एक 'प्रोजेक्ट' नाही –
ती भाविकांच्या सोईसाठी सज्ज झालेली शासनाची भावनाशील प्रतिमा आहे.
________________________________________
"पंढरीचे रंग गोड गोड | मज वेड लागे त्या विठोबाच्या पायांत..."
– संत ज्ञानेश्वर महाराज
"चालता चालता नाम घेता | हरिपंढरी गाठावी..."
– संत तुकाराम महाराज
या वचनांचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात साकारला आहे –
कारण सरकारने पंढरी गाठण्याचा रस्ता सुरक्षित, सुव्यवस्थित आणि स्नेहपूर्ण केला आहे.
________________________________________
✦ “राजा हरिश्चंद्राची नवी प्रतिमा”
त्यांचा हा उपक्रम म्हणजे आजच्या काळातील 'राजा हरिश्चंद्राची नवी प्रतिमा' –
जो सत्याशी, श्रद्धेशी आणि सेवेशी बांधलेला आहे.
देवेंद्र फडणवीस हे केवळ मुख्यमंत्री नाहीत,
ते एका भावनिक, अध्यात्मिक वारीचे मार्गदर्शक आणि सेवक आहेत.
त्यांनी ‘राज्यकारभार’ हाती घेताना ‘भक्तिपंथ’ही स्वीकारला आहे.
________________________________________
त्यांच्या मनात प्रत्येक वारकऱ्यासाठी आहे एक भावना –
"हे माझे भगव्या वेशातील बंधू – त्यांच्या वाटचालीत मी सावली होईन, ओल होईन, शिदोरी होईन!"
ही केवळ सेवा नाही,
ही माझी विठोबाच्या भक्तांप्रती आदरांजली आहे.”
मी तर म्हनेल – “विठोबाच्या दर्शनात सरकार साक्षात उतरलं”
________________________________________
🚩 वारी चरणसेवा – एक अखंड दिंडी
वारी चरणसेवा हा प्रकल्प म्हणजे एक अखंड दिंडी –
जिथे शासन चालतंय, सेवा देतंय,
आणि मन विठोबाच्या पायात अर्पण करतंय.
“सेवा केली भक्ताच्या ठायी | तेथेच पांडुरंग दृष्टीस पडला...”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरीच्या वारीत राजकारणापलीकडचा भावनिक अध्याय लिहिला आहे –
जो प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या हृदयात, दिंडीच्या टाळांमध्ये आणि विठोबाच्या ओवाळणीत कायमस्वरूपी घर करून बसेल.
________________________________________
🙏
|| पांडुरंग हरि ||
|| जय जय राम कृष्ण हरि ||

🙏 डॉ. कल्पना भुंबरे 🙏

11/02/2024

विचार आणि भावना आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करतात

तुमचे विचार आणि भावना तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. एकीकडे judgment शिवाय किंवा attachment शिवाय मुक्तपणे अनुभवलेल्या आणि व्यक्त केलेल्या भावना आपल्या आरोग्यावर परिणाम न करता प्रवाहीपणे वाहत असतात तर दुसरीकडे दडपलेल्या भावना (विशेषत: भीती , राग किंवा नकारात्मक भावना) मानसिक उर्जा कमी करतात, शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात आणि आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
आपले विचार आणि भावना ओळखणे आणि त्यांचा काय परिणाम केवळ एकमेकांवरच नाही तर आपल्या शरीरावर, वागणुकीवर आणि नातेसंबंधांवरही होतो याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे—
Poorly-managed negative emotions तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत
नकारात्मक दृष्टीकोन आणि असहायता आणि निराशेची भावना तीव्र ताण निर्माण करू शकते, ज्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, आनंदासाठी आवश्यक मेंदूतील रसायने कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचते. दीर्घकालीन तणावामुळे आपले आयुर्मान कमी होऊ शकते. विज्ञानाने आता ओळखले आहे की तणावामुळे आपले Telomeres, the “end caps” of our DNA strands, आपल्या डीएनए स्ट्रँडचे "एंड कॅप्स" लहान होतात, ज्यामुळे आपले वय वेळेआधीच जास्त दिसते.
Poorly managed or repressed anger (hostility) असमाधानकारकपणे नियंत्रित केलेला किंवा दडपलेला राग किंवा शत्रुत्व हा उच्च रक्तदाब (High BP), हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, पाचक विकार आणि संसर्ग यासारख्या अनेक आरोग्य परिस्थितीशी संबंधित आहे.
सकारात्मक भावनांचे महत्त्व
सकारात्मकतेसह जगणे आपले जीवन बदलू शकते:
1. Positive emotions broaden our perspective of the world सकारात्मक भावना जगाबद्दलचा आपला दृष्टीकोन विस्तृत कतात. अशा प्रकारे अधिक सर्जनशीलता (Creative), आश्चर्य (Wonders) आणि पर्यायांना (Options) प्रेरणा मिळेते.
2. कालांतराने चिरस्थायी भावनिक लवचिकता निर्माण होते आणि भरभराट होतो. (Emotional flexibility build over time, creating lasting emotional resilience and flourishing it.)
सकारात्मक विचारांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार नाहीसा होतो, चांगली झोप येते, सर्दी कमी होते आणि एकंदर आनंदाची अधिक भावना निर्माण होते यासह सकारात्मक विचार शारीरिक आणि भावनिक फायद्यांचे आहेत. सकारात्मक वृत्ती-जसे की खेळकरपणा, कृतज्ञता, विस्मय, प्रेम, स्वारस्य, शांतता आणि इतरांशी जोडलेली भावना (Feeling connected to others)- याचा थेट परिणाम फक्त आरोग्यावर होतो असे नाही, आनंदाची बातमी ही आहे की आपण सरावाने त्यांचा विकास करू शकतो.
आपल्या नकारात्मक पक्षपातावर मात करणे Overcoming our negativity bias
जीवनातील धोका आणि तोटा यापासून बचाव करण्यासाठी, आम्ही चांगल्यापेक्षा वाईटाला प्राधान्य देतो. धोकादायक वातावरणात अतिदक्ष राहण्याची गरज असलेल्या व्यक्तीसाठी ही एक नीटनेटकी जगण्याची यंत्रणा असली तरी, सत्य हे आहे की आपल्यापैकी बहुतेकांसाठी हा "नकारात्मक पूर्वाग्रह" प्रतिउत्पादक आहे. (The truth is that for most of us, this "negativity bias" is counter-productive.)
"नकारात्मक पूर्वाग्रह" चा अर्थ असा आहे की आपण अनुभवत असलेल्या किरकोळ निराशा, किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीशी मतभेद- यावर टिका करण्यात आपण खूप वेळ घालवतो आणि आपल्याला दिवसभर धन्यवाद आणि कृतज्ञता अनुभवण्याच्या अनेक संधींकडे आपण दुर्लक्ष करतो.
ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि एक सुसंवादी भावनिक स्थिती अनुभवण्यासाठी, आपल्याला एका नकारात्मक भावनांसाठी तीन सकारात्मक भावनांचा अनुभव घेणे आवश्यक आहे. हे हेतुपुरस्सर केले जाऊ शकते. या सकारात्मक भावना नकारात्मकतेचे शारीरिक परिणाम अक्षरशः उलट करतात आणि भरभराटीच्या जीवनात योगदान देणारी मानसिक संसाधने तयार करतात.
माफीची भूमिका
क्षमा करणे म्हणजे नकारात्मक घटना घडली आहे हे पूर्णपणे स्वीकारणे आणि परिस्थितीभोवती असलेल्या आपल्या नकारात्मक भावनांचा त्याग करणे. क्षमा केल्याने आपल्याला चांगले मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य अनुभवण्यास मदत होते. आणि हे शिकले जाऊ शकते.
क्षमा करण्याची प्रथा उत्तम रोगप्रतिकारक कार्य आणि दीर्घ आयुष्याशी देखील जोडली गेली आहे. माफीचा हृदयावर केवळ एक रूपकात्मक प्रभाव आहे असे नाही: तर ते खरोखर आपला रक्तदाब कमी करू शकते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य देखील सुधारू शकते.
कृतज्ञतेचे फायदे
आभारी व्यक्ती नेहमी निरोगी आणि आनंदी असतात, जीवनातील चांगल्या पैलूंची कबुली देणे आणि आभार मानणे याचा भावनिक आरोग्यावर शक्तिशाली प्रभाव पडतो. उदा:-अधिक आनंदी वाटने, अधिक व्यायाम करण्याची क्षमता, तसेच कमी शारीरिक तक्रारी आणि चांगली झोप असे बरेच फायदे आहेत.
आनंद आणि कृतज्ञता यांच्यात एक आश्चर्यकारक संबंध आहे, परंतु हा “आनंद आपल्याला कृतज्ञ बनवतो असे नाही तर कृतज्ञता आपल्याला आनंदी बनवते”.
सकारात्मक भावनांमुळे भावनिक लवचिकता निर्माण होते :
सकारात्मक भावनांचा एक वैज्ञानिक उद्देश असतो - शरीराला सतत नकारात्मक भावनांच्या दुष्परिणामांपासून बरे होण्यास मदत करणे. अशाप्रकारे कालांतराने सकारात्मकता जोपासणे आपल्याला संकट किंवा तणावाचा सामना करताना अधिक लवचिक बनण्यास मदत करू शकते.
भावनिक लवचिकता ही रबर बँड सारखी असते - एखादी लवचिक व्यक्ती नकारात्मक भावनांनी कितीही ताणली गेली किंवा ओढली गेली तरी, त्याच्या किंवा तिच्याकडे त्याच्या मूळ स्थितीत परत येण्याची क्षमता असते.
लवचिक लोक वेदना, राग, निराशा आणि दु: ख यासारख्या कठीण भावनांचा अनुभव घेण्यास सक्षम असतात. लवचिक लोक ते अनुभवत असलेल्या वेदना किंवा दुःख नाकारत नाहीत; उलट, ते सकारात्मकतेची भावना टिकवून ठेवतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या परिस्थितीच्या नकारात्मक प्रभावांवर मात करण्यास मदत होते. किंबहुना, काही लोक आव्हानात्मक काळाकडे आशावाद आणि आशेने पाहण्यास सक्षम असतात, त्यांना हे माहीत असते की त्यांच्या कष्टांमुळे वैयक्तिक वाढ होईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.
तुमच्या भावना व्यक्त करा :
बरेच लोक तीव्र भावना व्यक्त करण्यास घाबरतात कारण त्यांना नियंत्रण गमावण्याची भीती वाटते. हा व्यायाम तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो आणि त्यांना सुरक्षित आणि निरोगी मार्गाने कसे व्यक्त करावे हे शिकू शकतो.
या क्षणी तुम्हाला आत्ता काय वाटत आहे हे ओळखून सुरुवात करा.
"मी" भाषा वापरून तुम्हाला जे वाटत आहे ते मोठ्याने बोलण्याचा सराव करा. उदाहरणार्थ: मला राग येतो, मला वाईट वाटते, मला भीती वाटते. आपल्या भावनांचे मालक व्हा.
जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमच्या भावना व्यक्त करून सुरुवात करा. तुम्ही अधिक सोयीस्कर झाल्यानंतर, ज्याच्याशी तुमचे सुरक्षित, विश्वासार्ह नाते आहे अशा व्यक्तीसोबत सराव करा.
शेवटी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत सराव सुरू करा. लक्षात ठेवा की समोरच्या व्यक्तीला दोष देऊ नका आणि त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी तयार रहा. तुम्ही इतरांना फीडबॅकसाठी देखील विचारू शकता.
सकारात्मक श्वास घ्या :
प्रकाश, प्रेम आणि Healing ऊर्जा याची कल्पना करा आणि हळूहळू पोटात श्वास घ्या. खोल श्वास घेत असताना हे स्पष्ट, तेजस्वी किंवा चमकणारे म्हणून चित्रित करा (Visualize bright light, love and healing energy/power entering your body and enlighten each and every cells). आपण प्रकाश आणि आनंदाने भरल्यावर स्वत: Heal होत आहोत असल्याचे अनुभवा.
कोणतीही नकारात्मक स्थिती किंवा भावनांना मुक्त करून, पूर्णपणे श्वास सोडा. तुम्ही ते अंधार किंवा धुके म्हणून चित्रित करू शकता. जर तुम्हाला राग, भीती किंवा दुःख असेल तर त्यांचा श्वास सोडा. जर तुम्हाला तणाव, घबराट किंवा चिंता असेल तर तुम्ही श्वास सोडत असताना त्यांना सोडा आणि तुम्हाला किती मोकळे वाटते ते तुम्ही अनुभवाल.
अशा प्रकारे तुम्ही तुमचे विचार आणि भावनांचा तुमच्या आरोग्यावर घडणाऱ्या वाईट परिणामांपासून सुरक्षित राहू शकता.
असेच आणखी लेख वाचण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया आम्हाला या लिंकवर फॉलो करा https://www.facebook.com/profile.php?id=100084389046727

Dr. Kalpana Bhumbre, MD, PhD Psychiatry
Counsellor & Homoeopathic consultant

Mob. No: 7387388732
Website: https://drkalpanahomeopathy.com

04/12/2023

Address

Back To Jotiba Temple, Athwan Chauk, St. Alphonsa School Road, Main Road, Vijay Nagar, Kalewadi Pimpri
Pune
411017

Opening Hours

Monday 9:30am - 8pm
Tuesday 9:30am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Kalpana's Homoeopathic Mental Health Clinic & Counselling Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category