
22/06/2022
खजूरात अनेक पोषक घटक असतात जसं की मिनरल्स, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स, अमिनो अॅसीड, लोह आणि कॅल्शिअम, सहाजिकच या पोषक घटकांमुळे खजूर हे एक आरोग्यदायी आणि त्वरीत ऊर्जा देणारं फळ ठरतं. खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. एक हेल्दी स्नॅक्सच्या रुपात आपण रोज ४-५ खजूर खाऊ शकतो. हाडांच्या मजबुतीसाठी, रक्तवाढसाठी, उच्चरक्तदाब मध्ये तसेच त्वरीत एनर्जीसाठी खजूर उपयुक्त ठरते.