SHRI Sainath Hospital

SHRI Sainath Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SHRI Sainath Hospital, Hospital, Pune.

15/01/2024

पुर्वी..
कोणाचे तरी ग्रिटींग्ज यायचे. पत्र यायचे
त्यात छोटे पांढरे पाकीट..
त्यात.. हलव्याचे व तीळाचे चार दाणे..
वर्ष भर वाट पाहीली जायची..
कोणाच्या घरी गेलं..
ए आपला तिळगूळ दे गं.
छान झालाय यंदा आमचा..
प्रत्येक घरात वेगळी चव..
तीळगुळ वाटप आपणच करायचे.
एक वाटला की दोन पोटात..
आता..
रेडीमेड जमाना आलाय..
दोन किलोची ऑर्डर द्यायची. पण त्यात तो गोडवा नाही
तिळ.. गुळा पासून दुरावला आहे..
गोडवा तर केव्हाच संपलाय..
मेसेज मेसेज च्या खेळात..
पोस्टमनची वाट पाहणं संपलं
क्षणात किलोभर तिळगूळ आणू एवढा पैसा आला
पण ते ग्रिटींग्ज मधले तिळगूळ चारच ,गोडवा आणायचे
आता , ग्रिटींग्ज संपली , पत्र व्यवहार संपला
सोशल मीडियावर, भरमसाठ मित्रमंडळी
एक दुरावला की दुसरा हजर असे
इनबॉक्सातील खोटे टोपलीभर आधार
उत्क्रांती.. आक्राळ विक्राळ होत चालली आहे..
पाऊस.. ऊन.. मनाला येईल तसे येताहेत...
प्रकृती.. कुस बदलतेय..
तीळा तीळा ने..
आपण मात्र न बदलता माणुसकी, मैत्री, विश्वास जपुया..गोड बोलूया
✨*तिळगुळ घ्या.. गोड गोड बोला*✨🙏🏻🙏🏻😊
डॉ संभाजी मांगडे
पुणे

Happy birthday dear chetandada god bless you
01/01/2024

Happy birthday dear chetandada god bless you

01/01/2024

*काय हरवलं? काय कमावलं? -वर्ष संपताना हिशेब मांडलाच तर काय हाती लागेल आपल्या.....?*

नवीन वर्षाची सुरुवात होणार म्हटलं की लगेचच आपण मागच्या वर्षीचा आढावा घ्यायला बसतो. अनेकवेळा तो माध्यमातून आपल्याला कळतो किंवा माध्यमे सांगतात की हे असं झालं होतं आणि मग त्याचा परिणाम असा झाला. मग तोच परिणाम सामान्य माणूस एकमेकाला सांगत राहतो. समजा माध्यमे नसतीच तर हा असा आढावा घ्यायचा असतो हे सामान्य माणसाला कळलं असतं का? अर्थात वर्तमानपत्र, टीव्ही नसला तरी आता अनेकांकडे मोबाइल आहे आणि त्यामुळे सर्व अभासी जग हातात आलं आहे, त्यामुळे नवीन वर्ष येत आहे हे कळतेच. खरेतर मागची काही वर्षे आणि आजही उद्याचा दिवस उगवेल की नाही या धास्तीने माणूस जगत आहे. काही माणसांची धास्ती खरी ठरली तरी, त्यातले आपल्यासारखे बरेच जण नवीन वर्ष बघायला आहेत. त्याकडे स्वच्छ नजरेने बघण्याची आपली क्षमता या येणाऱ्या वर्षाने वाढवावी, अशी इच्छा राहून राहून मनात येत राहते.
मागच्या वर्षात नक्की काय बदल झाला याचा विचार करताना माझ्यासमोर असणाऱ्या लहान मुलांकडे बघत होते.

या मुलांचे आयुष्य किती बदलले आहे. त्यांचा होमवर्क मोबाइलवर येतो, त्यांचे प्रोजेक्ट मोबाइलवर बघून होतात, गॅदरिंगची गाणी, नृत्याच्या स्टेप्स त्यातच बघायच्या. तरीही आई-वडील म्हणतात की, आमचं मूल खूप वेळ मोबाइल बघतं, त्याचा स्क्रीन टाईम कमी व्हावा, असं काहीतरी करा. मग वहीत होमवर्क लिहून घेऊ द्या, बाकी प्रत्यक्ष तुम्ही शिकवा असं म्हटलं तर ते ही त्यांना पटत नाही. कारण मुलांची वही बघणे त्यांना जमत नाही, वेळच राहत नाही.

असं होऊ शकतं. म्हणजे मुलं आणि पालक यांनीही हा बदल असा स्वीकारलेला दिसतो. त्यात आता सर्व मुलांना पास करायचंच आहे, पण मुलांच्या क्षमता वाढवण्यासाठी परीक्षेत काही बदल केले, मुलांना विचार करून काही लिहिता यावे, असे प्रश्न टाकले तर ते ही पालकांना चालत नाही. ते लगेच विचारतात, मुलांना जे शिकवलंच नाही, त्यांच्या वहीत हे प्रश्नच नव्हते, किंवा धड्याखाली असे प्रश्नच नाहीत तर तुम्ही असे प्रश्न कसे विचारू शकता? मग त्यात मुलांना त्यांच्या आजीचे नाव विचारले, आपल्याजवळ स्थलांतर करणारे कोणते पक्षी येतात, असं विचारलं तरी पालकांना ते आवडत नाही.

काही पालक म्हणतात, मुलांना चांगलं वळण लागावं म्हणून त्यांना मारलं तरी चालेल. दुसरीकडे मुलांना एक मार्क कमी पडला म्हणून शिक्षकांशी भांडायला येणारेही पालक आहेत. पुस्तकात जे आहे तेच शिक्षण असं मानणारेही पालक आहेत.

पालकांचा असा प्रवास बघताना प्रश्न पडतो की नक्की आपण पुढे जात आहोत की मागे? हेच समजत नाही.
मुलांमध्ये असणाऱ्या क्षमता शोधण्यासाठी परीक्षा घ्यायला हवी. त्यातून मुलांमधले विविध गुण समजतील. त्यांचा विकास होईल. आताचं सगळं बदलू शकणार नाही, पण एखादे छोटे पाऊल आपण टाकू शकतो, असा विश्वासही काही पालकांनी यावर्षी दाखवलेला मात्र मला दिसला. ते पाहून मनात नवीन वर्षाच्या आशा अधिक पल्लवित झाल्या.

नवीन वर्षात आपण शिक्षणाकडे अधिक गांभीर्याने बघायला हवं. कारण शिक्षण घेऊनही निरक्षर असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि मला तर याची दहशतवादापेक्षा जास्त भीती वाटते. सगळ्या गोष्टी एवढ्या सुमार करून टाकल्या आहेत किंवा टाकत आहोत आपण की एखादी योग्य अशी गोष्टही अवघड वाटू लागते. मग तिला विशिष्ट चौकटीत टाकण्याचा आपण प्रयत्न करतो. एकदा ती चौकट बसवली की मग वाटेल तसे वागायला आपण तयार होतो. आज विविध कंपन्या शैक्षणिक पुस्तके काढत आहेत, ती पुस्तके परत परत वापरता येत नाहीत. नवीन तंत्रज्ञान मुलांना कळले पाहिजे, त्यांना जगाचे ज्ञान व्हायला हवे, असे या कंपन्या म्हणतात. पण एक पुस्तक घरातील दोन्ही मुले एकानंतर एक वापरू शकतात. नंतर ती दुसऱ्याला कमी किमतीत विकू शकतात. त्यातून कागदाची बचत होऊ शकते, पर्यायाने पर्यावरण वाचवण्यास हातभार लागू शकतो, वाटून घेण्याची क्षमता वाढू शकते. ही मूल्ये तंत्रज्ञानाच्या काळात महत्त्वाची नाही का? पण हा प्रश्न आपण त्या कंपन्यांना विचारू शकत नाही.

मागच्या वर्षाने आपल्याला जशी तंत्रज्ञानाची गरज दाखवून दिली तशीच किंवा त्यापेक्षा अधिक गरज माणसांची एकमेकांना समजून घेण्याची आहे, हे ही दाखवून दिलं आहे. नवीन वर्षात आपण तसं केलं नाही तर?
कोणीतरी थोपवलेल्या मतांमध्ये अडकून पडलो तर आपणच आपल्याला ओळखेनासे होऊ असे वाटते.
मागच्या वर्षाने आपल्याला खूप सावध केलं आहे पण आपण तसं झालो आहोत का? हे आपण बघायला हवे.
काळाच्या बरोबरीने चालायचं म्हणजे योग्य गोष्टी सोडून द्यायच्या असे नाही. वाचन, लेखन ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यात आहे आणि ती आपण जपली पाहिजे.

जरी आज स्क्रीन महत्त्वाचा असला तरी त्यातून काय बघायचे आणि काय नाही हे ठरवण्यासाठी आपली विचाराची बैठक पक्की असायला हवी. नवीन वर्षात आपल्याला हे जमायला हवे!🙏🏻🙏🏻
डॉ. संभाजी किसन मांगडे.
पुणे.

26/12/2023

*_“Date with Dad” डेट विथ डैड_*

रविवारची आळसावलेली सकाळ, सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला.
“तुमचं होऊ द्या. मी नंतर वाचतो” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडुन मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले. मी नानांचा अतिशय लाडका, त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेलं सिनेमे. सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे, सातवी पर्यन्त हा सिलसिला चालू होता परंतु नंतर बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस, टेंशन्स अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळ झालं. वाद नव्हता पण संवाद नक्कीच कमी झाला. आतातर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.
मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो
शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं की आज २ ऑक्टोबर म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहीलं.
“फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय” नाना फक्त हसले.
“संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी कार्यक्रमाला तू आणि रिया जा” नाश्ता करताना मी म्हणालो तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.
“आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ. शंभर टक्के, प्रॉमिस” मी
“ठीकय. एंजॉय पार्टी पण लिमीटमध्ये”
“डोन्ट वरी, थॅंक यू बायको”
“दुपारी जेवायला गोड काय करायचं” बायकोनं विचारलं
“राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो.
“मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवसयं”
आठशे चाळीस व्हॉल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो.
“काय रे, काही पाहिजे का”
“वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मी सुद्धा खूप भावुक झालो.
“दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली.
सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी??? प्रचंड गिल्ट आला.
“आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना”
“हो, स्वयंपाक करून जाते”
“नको”
“का??”
“आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!!”
“आम्हांला !!” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या.
“नक्कीच!! पण नंतर आज दोघंच जातो, प्लीज”दोघीनी समजुतीने घेतलं.
“उगीच खर्च कशाला. बाहेर नको” सवयीने नानांनी नकार दिला पण मी हट्ट सोडला नाही.
संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली.
पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता आता मी.
काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा....
हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्याचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती.
“टेंशन घेऊ नका. रीलक्स”
“फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले.
“किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय”
“तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो त्यानंतर आजच..”
“बापरे, एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट” नाना काहीच बोलले नाहीत.
“नाना, सॉरी, माफ करा.”
“अरे, होत असं आणि तसंही आता या वयात कसलं आलय वाढदिवसाचं कौतुक!!”
“वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकड दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”
“अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”
“आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारला. स्वतःवर बंधनं घालून घेतली आणि तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीज मध्ये तुम्ही नव्हताच.”
“हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना
“तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं ” मी हात जोडले एकदम आवाज कापरा झाला तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काहीक्षण शांततेचे होते.
“उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकांच नात असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतेच.”
“खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.
“ *वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे.* ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली.
“यापुढे काळजी घेईन”
“अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”
“तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं” नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. सगळा बँकलॉग भरायचा होता. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.
“काय झालं. हसताय का”
“इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं.
“खरं सांगू , बोलायची खूप इच्छा व्हायची पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते”
“पर्याय नाही”
“मान्य तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचे याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”
“नक्कीच”
“आजचा दिवस कायम लक्षात राहील.”
“माझ्याही”
“सर्वात महत्वाचं, आज माझा उपास नाहीये ” नाना मिष्किलपणे म्हणाले. बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती.
“आयला, हो की....” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली.
“चायनीज खाऊ” नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डोळे भरून आले.
बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच दोघांची नजर आभाळकडं गेली.
*घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व* *"बाप"माणसांना समर्पित...*😔😔🙏🏻

*...

24/12/2023

🙏🌹🪷 *जीवन...* 🪷🌹🙏

*बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही राहत नाही......*

*कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहुन सुंदर असणारच हे आपण विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो. म्हणून केवळ एकटं पुढे राहण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहुन गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात......*

*यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं नितांत गरजेचं आहे. इतर धावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही.जगणं हे राईसप्लेटसारखं असावं,त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो.....*

*जगण्याचंही काहीसं असंच आहे, ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरते. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटुन जाऊ देऊ नका, ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या....*

*आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी अख्ख आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते, त्यामुळे ते क्षण वेचा. तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठुन समरसुन जगावं.....*

*स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर "निरोगी कसं जगावं" हे पुस्तक वाचुन काय उपयोग....….?*

*बघा पटतंय कां....?*🙏🏻

07/10/2022
07/09/2021
भोगापेक्षा त्यागातील आनंद मोठा....पुणे डॉक्टर्स असोषिएशन पुणे आणि छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नसरापूर यांनी रविवार ...
19/08/2021

भोगापेक्षा त्यागातील आनंद मोठा....
पुणे डॉक्टर्स असोषिएशन पुणे आणि छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नसरापूर यांनी रविवार दि 15ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी वेल्हा तालुक्यातील मांगदरी गावातील महिला आणि पुरुषांसाठी "अनेमिया" मुक्त ग्राम या उपक्रमांतर्गत मोफत हिमोग्लोबिन आणि रक्तशर्करा आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले..
भारतातील ६०टक्केहून जास्त महिला या अनेमीया या आजाराने त्रस्त असतात एकीकडे शहरी भागातील जीवनशैली भौतिक सुखाकडे कल असणारी असताना भोगापेक्षा त्यागात आनंद जास्त मिळतो हीच शिकवण आपल्या संत महात्म्यांनी दिली ..पुणे शहरातील १२००हून सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची संघटना आणि त्यांचे सभासद नेहमीच सार्वजनिक उपक्रमात सहभागी असतात या संघटने तर्फे वर्षभर असे आरोग्याजगृती चे उपक्रम घेतले जातात त्याचाच एक म्हणून या वर्षीचा स्वतंत्रादिनी वेल्हा तालुक्यातील मांगदरी येथे तालुक्याचे माजी उपसभापती आणि पुणे डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ संभाजी मांगडे यांच्या पुढाकारातून हे सर्वरोग तपासणी मोफत औषध उपचार आरोग्य शिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ माजी सरपंच संपत मंगडे यांचे हस्ते झाले या प्रसंगी छत्रपती हॉस्पिटल चे डॉ बालाजी कल्याने यांनी सहकार्य केले तसेच डॉ सचिन केदार उपाध्यक्ष डॉ रवींद काटकर डॉ मेघना कारंडे डॉ स्वप्नाली वाडेकर डॉ अनिल लिंगडे डॉ मनोहर जाधव डॉ रमेश मोहिते डॉ चंद्रशेखर जवळकर डॉ अश्विनी घोडके डॉ आंबिका गरड डॉ शर्वरी अवलसकर इ डॉक्टर उपस्थित होते याप्रसंगी सरपंच संपत मांगडे नितीन मांगडे मुगाजी मांगडे सुनील ओझर साधू हरपुडे इ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते २०० हून जास्त रुग्ण यांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि त्यांचा स्टाफ याचे विशेष सहकार्य लाभले

आग्रहाचे निमंत्रण.
24/07/2021

आग्रहाचे निमंत्रण.

5000mask distribution to pmpl workers and there family on occasion of blood donation camp at swargate in presence of ceo...
29/05/2021

5000mask distribution to pmpl workers and there family on occasion of blood donation camp at swargate in presence of ceo of pmpl dr rajendra jagtap.

Address

Pune
411043

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHRI Sainath Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category