11/01/2020
जुने ते सोने !
कांस्य थाळी यंत्र - आयुर्वेदाला जोड तंत्रज्ञानाची
कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्त मिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. पूर्वी कांस्य वाटीने हाता-पायांच्या तळव्यांना रोज मसाज केला जायचा पण काळाच्या ओघात वेळ नसल्याने त्याकडे आपले दुर्लक्ष झाले. पण आता आयुर्वेदाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि कांस्य थाळी यंत्रे तयार करण्यात आली त्यामुळे आपले पुर्वीचे उपचार आपण सहजपणे घेवू शकतो.
कांस्य थाळी मसाजचे फायदे
1. कांस्य थाळी यंत्राने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग / जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात.
2. आपल्या शरीरांत ७२००० नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळव्यात होतो. त्यामुळे तळव्याना मसाज हा अनेक दुखण्यांवराचा एक कमी खर्चाचा पण गुणकारी उपाय आहे. हा मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. शरीरात थंडावा वाढतो.
3. डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणे फायदेशीर ठरते.
4. त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो.
5. पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.
6. कांस्य थाळी यंत्राने पायाला मसाज करताना तेल किंवा तूपाचा वापर केला जातो. पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे.
7. गुडघेदुखी, टांचदुखी, कंबरदुखी या त्रासांचे प्रमाण कमी होते
8. वेरीकोस वेन्स वर उपयुक्त.
9. डोळ्यांखालील काळेपणा कमी होतो
10. चेहर्यावरील काळे डाग कमी होतात.
11. पित्ताचा त्रास कमी होतो.