Dr Saurabh B Kadam

Dr Saurabh B Kadam Providing Quality Service & Affordable, Excellent HealthCare

07/09/2024
19/09/2023

किडनी फेलियर CKD रोगियों के लिए शुद्ध आयुर्वेद उपचार...

https://fb.watch/mAbh4WMH8f/?mibextid=RUbZ1f

किडनी फेल्योर के मरीजों का इलाज एलोपैथिक दवा और नियमित डायलिसिस से किया जाता है।

इसके साथ ही हम आयुर्वेदिक आहार और पूरी तरह से हर्बल (पूर्णतः वनस्पती जन्य) आयुर्वेदिक चिकित्सा शुरू करते हैं ।

हिलवाईन आयुर्वेद किडनी केयर यूनिट, पिंपरी पुणे द्वारा इलाज करते समय,

सबसे पहले विशेषज्ञ आयुर्वेद एम. डी. डॉक्टरों द्वारा
ऑनलाइन (वीडियो कॉल/ज़ूम मीटिंग आदि के माध्यम से) या
ऑफ़लाइन (चिकित्सालय मे प्रत्यक्ष रूप से तपासणी) परामर्श किया जाता है।

तज्ञ डॉक्टर:

- *Dr Prashant A. Khade*
M. D. (AYURVED), Ph. D., F.I.C.H. , Research Study Chronic Kidney Disease (CKD).

सन 2007 से CKD पे आप्तश्री आयुर्वेद, पुणे और HealVibe आयुर्वेद, पुणे के माध्यम से शुद्ध आयुर्वेद उपचार दे रहे हे।

- *Dr Saurabh B Kadam*
M. D. (AYURVED), Pune
आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ

सन 2015 से CKD पे आप्तश्री आयुर्वेद, पुणे और HealVibe आयुर्वेद, पुणे के माध्यम से शुद्ध आयुर्वेद उपचार दे रहे हे।

उपचार की विधि:

ऑनलाइन/ऑफ़लाइन जाँच के बाद,
प्रत्येक रोगी में आयुर्वेद के अनुसार उसकी किडनी खराब होने का कारण का पता किया जाता है और उसी के अनुसार उपचार शुरू किया जाता है...

इसलिए हर मरीज को दी जाने वाली दवा अलग-अलग हो सकती है...

We will give you medicine only if you have a chance of recovery as per ayurved science.

औषध चिकित्सा की शुरुआत के बाद,
आमतौर पर 2 से 3 सप्ताह के बाद
मूत्र उत्पादन बढ़ने लगता है।
सूजन कम हो जाती है
अच्छी भूख लगना शुरू होता है।।
रोगी हल्का और ताज़ा महसूस करता है।

लैब रिपोर्ट में
Sr Creatinine में कम होना शुरू होता है...
Sr Electrolyte संतुलन शुरू होता है...

फिर जैसे-जैसे Sr Creatinine कम होता जाता है, डायलेसिस के डॉक्टरोंद्वारा डायलिसिस धीरे-धीरे कम कर दिया जाता है...

लगभग 90% रोगियों में अच्छे परिणाम आते हैं...

नये नये शुरू हुए डायलिसिस के पेशेंट, युवा मरीजों को फर्क बहुत जल्दी से नजर आता है...

लेकिन अनियंत्रित मधुमेह के मरीज़, जो दो साल से अधिक समय से डायलिसिस पर हैं, जिन्होंने कई दिनों तक स्टेरॉयड, लेसिक्स जैसी दवाएं ली हैं, उनमें result में देर लगती है।

इसमें उपयोग की जाने वाली औषधियों की योजना आयुर्वेद ग्रंथों में वर्णित मुत्रकृच्छ व्याधि की स्थिति को ध्यान में रखते हुए तदनुसार बनाई जाती है।

ये दवाइयां पूरी तरह से हर्बल हैं।
पौधों के काढ़े की भावना देकर औषधी की गुणवत्ता बढ़ाई जाती है।

इसमें किसी भी प्रकार के खनिज या रसायन नहीं होते हैं।

यह दवा किडनी की बीमारी को जड़ से खत्म करने का काम करती है और इसका कोई साइड इफेक्ट भी नहीं होता है।

इसका इलाज करते समय दवा के साथ-साथ आहार का पालन करना भी बहुत जरूरी है। जो हम लिखित स्वरूप में दवा के साथ देते है।।

आप अपने CKD रोगी को आधुनिक उपचार के साथ-साथ आयुर्वेद उपचार के लिए भी हमारे पास रेफर कर सकते हैं।

संपर्क:

Branch1
Ayurveda Kidney Care Unit, Pimpri - Pune
2nd Floor, M Space Mall, Pimpri Chauk, Pimpri-Bhosari Rd, Pimpri-pune 411018

Branch 2
Ayurved & Panchakarma Clinic,
1st Floor, Above SBI ATM, next to singh cycle,Near Ramkrishna mangal karyalaya, Dapodi Road, Shivdatta Nagar, Pimple Gurav, Pune 411061

Online / Offline Consultation Appoinment booking
Cont no.
788 788 2442/
9665 010 500

Web:
https://shriayurvedic.in/kidney-failure-ayurvedic-treatment/

*Our Sevices & Speciality*

Ayurvedic Kidney Treatment For all Types of Diseases!

- Treatment Under M. D. Ayurved, Ph. D. in Kidney Disease Expert Doctors Team

-100% Natural & Herbal Medicines

- Get Diet plan as Per Patient Conditions

- 3 Branches in Pune, More than 1000 patients Experience

- IPD Hospitalization service Available

-Online Consultation & Home delivary of medicines Available

Eating Methods(आहार सेवनाची आयुर्वेदोक्त पद्धत)- डॉ शलाका कदमआयुवेदाचार्य, पुणेBlog Link:
04/08/2022

Eating Methods
(आहार सेवनाची आयुर्वेदोक्त पद्धत)

- डॉ शलाका कदम
आयुवेदाचार्य, पुणे

Blog Link:

August 4, 2022 Eating Methods Ayurved, Ayurvedic, Healthy Life With Ayurveda, आयुर्वेद सर्वांसाठी, आयुस्पर्श AyuSparsh by shriayurvedic01@gmail.com 0 Comments Ayurved Treatment, eating habit, Good way to eat, how to eat food, Hybrid food जे.....

*मुळव्याध:अवघड जागेचं दुखणं...!**आयुर्वेद उपचार* https://shriayurvedic.in/piles-ayurved-treatment/
26/03/2022

*मुळव्याध:अवघड जागेचं दुखणं...!*

*आयुर्वेद उपचार*
https://shriayurvedic.in/piles-ayurved-treatment/

March 6, 2022 Piles Ayurved Treatment Ayurved, Ayurvedic, Healthy Life With Ayurveda, Panchakaram, आयुर्वेद सर्वांसाठी by shriayurvedic01@gmail.com 0 Comments Ayurved Treatment (Hemorrhoids /मुळव्याध / बवासीर) Join Now सहनही ....

08/04/2021

*Covid -19 : विनंती वजा सतर्कतेचा इशारा...!*

Covid 19 ची ही दुसरी लाट खूपच जोरदार आहे..! दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे...!! कित्येकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत...!!! खुपच दयनीय अवस्था आहे सध्या...!!!!

या महामारीच्या काळात तुम्हाला आलेला अशक्तपणा - कणकण - अंगदुखी - सर्दी - खोकला - डोकेदुखीला क्षुल्लक न समजता..... जरा ज्यास्ती विचारात घेणं गरजेचं आहे।।

काल गार पाणी पिलो... आईस्क्रीम खाल्लं.... ज्युस पिलो......दुपारी जरा कुलर समोर बसलेलो ..... जरा धावपळ ज्यास्त झाली .... कामाचा लोड... मार्च एन्डची कामं....!!
असली कारणं शोधून स्वतःचीच समजूत काढू नकात....!

कारण होतं असं, लक्षणं दिसू लागल्यानंतर गरम पाणी घे, वाफ घे , हे खा - ते खा करत पाहिले पाच दिवस असेच "मी तो नव्हेच" असं म्हणत मज्जे मज्जेत जातात.... डेंजर हालत होते सातव्या दिवसापासून 14 व्या दिवसा मध्ये....!!

ताप - खोकला - सर्दी - दम लागणे - ओ टू कमी होऊ लागणे आदी लक्षणं जरा तिव्रतेने जाणवू लागल्यावर....!

मग सगळंच कपाळात याय लागतं ... केलेला निष्काळजीपणा समोर दिसू लागतो...! भयंकर चिंता वाटू लागते...!! ' ह्याचं हे झालं - त्याचं ते झालं ...आपलं ही तसंच होणार' याचं टेन्शन याय लागतं...!! मग ढीगभर तपासण्या चालू होतात - रिपोर्ट येईपर्यंत देवाला साकडं...!अन रिपोर्ट आल्यावर ICU - व्हेंटिलेटर असलेल्या हॉस्पिटलची शोधाशोध चालू व्ह्यायला लागते....! तोवर इकडे मागच्या आठवड्याभरात संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणून निघतात..!! सगळा धिंगाणा होऊन जातो....!!!

इथे वेळ खुप महत्वाची आहे...! हे समजुन घ्या....!

*कोरोनामध्ये, संसर्ग झाल्यानंतर मधमाशीच्या पोळ्या सारखं इन्फेक्शन फुफ्फुसाच्या मागच्या बाजूला वरून खाली वाढत असतं। ते भरून खाली टेकायला आल्यावर त्याची तीव्रता दाखवतं।। तोपर्यंत मला काही झालं नाही।। हे नेहमीचं आहे।। क्षुल्लक आहे ।। असं आपल्याला वाटत असतं।।*

या वेळी अजिबात वेळ न दडवता,
पहिल्या पाच - सात दिवसात व्यवस्थित आयुर्वेद व आधुनिक औषध उपचार व विश्रांती घेणं अत्यंत गरजेचं असतं।।

पोकळ नाही सांगत....
मागच्या मे - जुन पासून कोरोना पेशंट बघतोय...! त्याचा अनुभव बोलतोय हे...!!!

*तुम्ही जर पहिल्या पाच दिवसात, जवळच्या आयुर्वेद वैद्याकडून औषधी काढा, लक्षणरूप चाटण औषधी, ठराविक पद्धतीने प्रमानयुक्त बनवलेल्या अमृतधारेची वाफ, वातावरण शुद्धीची धुपन औषधी, आहार, विहार व पिण्याचे पाणी आदिंचे पथ्यापथ्य घेतलं....! तर फार लौकर बरे व्हाल...!! वैद्याच्या सल्ल्याने एखादे लघु वमन घेणं पण लै फायद्याचे आहे।।।*

या बरोबर वैद्याच्या सल्ल्यानेच, गरज असेल तर एखादे ऐलोपॅथी अँटिबायोटिक्स औषध पण घेऊ शकता..!! लौकर उपशम मिळतो।।।

उगाचंच पाहिले पाच दिवस अंगावर काढून, पुढं स्वतःचाच नंगानाच करून घेऊ नका।।

परस्थिती हाताबाहेर गेल्यावर आम्ही काय....? कुणीच काही करू शकत नाही...!! हे पक्कं लक्षात घ्या।।

शुगर - बीपीवाल्या बाबांनी तर, आधीपासूनच रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्याच्या कामाला लागा।। सोशल डिस्टन्सिंग बरोबर, वैद्यांच्या सल्ल्याने (online Consulting नें) आहार विहाराची पथ्यापथ्य, दिनचर्या पालन, रोगप्रतिकारक शक्तीवर्धक औषधींचा काढा - आयुर्वेद वैद्यांनी स्वतः बनवलेला अस्सल च्यवनप्राश आदी आधीपासूनच चालू ठेवा।। जेणेकरून व्याधींशी लढायला व अँटिबॉडीज बनवायला शरीर आधीपासूनच तयारीत असेल...!!

Emergency साठी म्हणून, आयुर्वेदिक "चाटण" औषधं आपल्या वैद्यांकडून घेऊन स्वतः जवळ ठेवु शकता ।।।ऐन वेळी खुप कामाला येईल।।

बाकी सावध करणं आपलं काम आहे, नाही ऐकलं तर आपले भोग आपल्यालाच भोगायचे आहे...! त्याला पळवाट नाही।।

जय आयुर्वेद..!!!

- *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune*
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,पिंपळे गुरव, पुणे 411061, Contact no.9665010500*
https://wa.me/message/B3RZESAQBSRUE1

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

https://www.shriayurvedic.in/*दुसरी लाट...!!**काळजी घ्या, कोरोना व्हायरस पुन्हा आपला विस्तार वाढवतोय।।*आधी वाटलं अफवा अस...
17/03/2021

https://www.shriayurvedic.in/

*दुसरी लाट...!!*

*काळजी घ्या, कोरोना व्हायरस पुन्हा आपला विस्तार वाढवतोय।।*

आधी वाटलं अफवा असेल, परंतु खरंच रुग्णांची संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे।। रोज दोन चार कॉल येत आहेत ONLINE Consultation साठी।।

कुठल्याही Virus विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच काम करत असते।। शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीने बनवलेले AntiBodis त्या Virus चा नाश करतात।। आणि मग त्या Viral Infection पासून आपली सुटका होते।।
यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असणं गरजेचं आहे।।

अँटिबायोटिक्स(Antibiotics) औषधं डायरेक्ट Bacteria शी लढतात, बॅक्टेरीचा खातमा करतात।। त्यांच्या या लढाईत शरीर हे महाभारतातील कुरुक्षेत्राच्या रणभूमीसारखं असतं।।

आणि यात पुढे जाऊन Bacteria च्या हल्यावेळी शरीर अँटिबायोटिक्स औषधींवर विसंबून राहू लागतं।। स्वतः व्याधींशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती गमावून बसतं।।

तर *आयुर्वेदिक शास्त्रोक्त चिकित्सा पद्धतीने घेतलेले औषध उपचार हे आपल्या शरीरालाच (रोगप्रतिकारक शक्तीला) त्या बॅक्टेरीया विरुद्ध लढण्यास सक्षम करत असतात।। शरीराला औषधींवर अवलंबून ठेवत नाहीत।।*

वेगवेगळ्या आजारातून अन कोरोना - निपाह - स्वाईन फ्लू - बर्ड फ्लू असल्या हल्ल्यातून वाचन्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असणं गरजेचं असतं।। म्हणून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे।।

*शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सशक्त असण्यासाठी शरीराचं Functional Unit असणाऱ्या वेगवेगळ्या Cells आणि पर्यायानं आमच्या आयुर्वेदात वर्णलेले रस - रक्त - मांस - मेद - अस्थी - मज्जा - शुक्र हे सप्तधातु सदृढ असणं गरजेचं आहे।।*

त्यासाठी उत्तम गुणवत्तेचं पौष्ठीक अन्न खाणं - व्यवस्थित पद्धतीनं खाणं अन खाल्लेलं व्यवस्थित पाचन होणे अतिशय महत्वाचे आहे।।

*त्यासाठी शरीराला तसंच पौष्टीक अन्न द्या।। रसायनांच्या खते - फवारणीच्या टेकून वाढलेलं अन्न देण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने वाढलेलं अन्न द्या।।*

NICU मध्ये वाढवलेल्या बाळाप्रमाणे वाढवलेलं हरितगृहातलं अन्नधान्य पोषण देऊ शकतं पण रोगप्रतिकार करण्याची ताकत देण्यास खुपच कमी पडते।।।

कारण ते धान्य वाढत असताना,पक्व होत असताना त्याला कुठल्याच व्याधींचा रोगप्रतिकार करावा लागलेला नसतो।।
त्यामुळे त्यांच्यात तशी रोगप्रतिकारक क्षमता नसते।।

"आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येणार?" या न्यायाने, ते अन्न खाऊन आपल्याला रोगप्रतिकारत्व कसं मिळणार??

बर्गर पिझ्झा अन कुरकुरे वेफर्स वर पोषण होत नाही ।। बॉयलरची हाडं मांस चघळून आपली हाडं-मांस मजबूत होत नाहीत अन दही न बनवता,न घुसळता मशीनवर फॅट वेगळं करून बनवलेलं घी आमच्या शरीरात पचत नाही, ते नुसतं कोलेस्टेरॉल वाढवतं ।

असल्या चुकीच्या अन्नपदार्थ खाण्याने अन चुकीच्या खाण्याच्या पद्धतीने शरीरातल्या धातूंचे (पेशींचे)पोषन व्यवस्थित होत नाही।। आणि त्यामुळे व्याधींशी लढण्यास ते सक्षम नाहीत होत।।

*तुम्ही जसं खाल, तसं तुमचं शरीर बनतं।*
*नैसर्गिक रितीने वाढलेलं देशी वानाचं खाल्लं तर तशीच गुणवत्ता असलेलं शरीर बनतं, आणि जर रसायनांच्या खते - फवारण्यावर वाढलेलं अन्न धान्य खाल्ले तर शरीरही तसेच छोट्या छोट्या आजारांना बळी पडणारं, कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेलं रोगट बनतं, सारखं Antibiotics चा अन इतर औषधिंचा टेकू लावावा लागतो।।*

*आहार हेच महाऔषध आहे।। त्याचे सेवन करताना विचारपूर्वक व विधिपूर्वक करणे गरजेचे आहे।।*

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोना - निपाह - वेगवेगळे फ्लू यांना घाबरायची आजिबात गरज नाही।।

म्हणून *आहार - विहार - निद्रा - व्यायाम - ब्रह्मचर्या - ऋतूचर्या - दिनचर्या यांचे पालन करून रोगप्रतिकारक शक्ती सांभाळा।। आपल्या तक्रारी व प्रकृतीनुसार वर्षातुन एकदा वमन-विरेचन-बस्ती पैकी एखाद्य दुसरं पंचकर्म शरीर शुद्धीसाठी आवर्जून करून घ्या।*

याबद्दल सविस्तर माहिती देत राहिनच,
*तूर्तास सध्याच्या कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी विशेष खबरदारी घ्या।।*

*घरात बनवलेलंच सकस अन्न खा।।*
*शुद्ध साजूक तुप, सैंधव मीठ,सुंठ,आलं, जिरे, ओवा, वेलची, हळद,बडीशेप, मनुका, डाळिंब, आवळा, खजूर,अंजीर यांचा आवर्जून वापर करा।।*

*फळे भाज्या मिठाच्या पाण्यांत स्वच्छ धुवून मग वापरायला घ्या।। ताजीच वापरा।।*

*शिळं - आंबलेलं खाऊ नका।*
*मैदा - रवा - पाव - ब्रेड - बर्गर -बाहेरचं उघड्यावरचं काहीही खाऊ नका।।*

*अन त्या रोगाट, हार्मोन्सची Injection देऊन पोसलेल्या बॉयलरचं चिकन-अंडी, साठवणुकीचे मासे, शिळं मांस खाणं पुर्णपणे टाळा।। किंवा संपुर्ण मांसाहारच टाळा, तो बंद केला म्हणून काहीही फरक पडत नाही ।।*

असलं रोगाट मांस खाऊनच एक वर्षापुर्वी चिनीलोक सर्वात ज्यास्त कोरोना ग्रस्त झाले होते।।।

*पाणी उकळून गार करून प्या।।उकळवताना त्यात थोडेसे सुंठ -धणे टाका।। साधारण लिटरला अर्धा चमचा (सुंठ - धणे दोन्ही मिळून अर्धा चमचा)।।*
*एकदा उकळलेले पाणी आठ तासांनंतर वापरू नका।।*

*च्यवनप्राश अवलेहासारखी रसायन औषधी खाण्यात ठेवा।। जी रोगप्रतिकारक शक्ती सशक्त ठेवेल।।।*

* रोगप्रतिकारक शक्तीवर्धक आयुर्वेदिक काढा किमान दिवसातून एकदा तरी घ्या*

*घरात कडुनिंबाची पाने - वावडिंग - वेखंड- जिरे - ओवा - कापूर - शेणाची शेणी यापैकी उपलब्ध असेल त्या द्रव्यांनी सकाळ - संध्याकाळ धुपन करा।। त्यासाठी धुपनी शोधायची गरज नाही, गॅसवर तव्यात ठेऊन गॅस चालू करा, होईल धूप आपोआप।।*

*गर्दीत सार्वजनिक ठिकाणी जाणं - प्रवास करणं टाळा।। सार्वजनिक वस्तुंना स्पर्श करणं टाळा।। बाहेर जाताना मास्क आदी संरक्षण करणाऱ्या गोष्टी वापरा।।*

*बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून घ्या।। वेळोवेळी कपडे बदला।। हात धुण्यासाठी योग्य ते साबण - हँडवॉश वापरा।। टॉलेट बाथरूम मध्ये डांबरगोळ्या ठेवा।।स्वच्छता ठेवा।।*
*कोरडे अन मोकळं वातावरण ठेवा।।*

*घराच्या आजूबाजूला तुळस - पुदिना - आजमोदा(ओवा)- वेखंड यासारख्या सुगंधी वनस्पती कुंड्यात लावून ठेवा।।*

झाडे लावायला आणखी जागा असेलच तर शोभेची झाडं लावण्यापेक्षा तुळस -निर्गुंडी - कडुनिंब - महानिंब अशी वातावरण शुद्ध करणारी झाडे लावा।।

*जर वर्षीप्रमाणे सध्याच्या ऋतुबदलामुळे सर्दी - खोकल्याची साथ काहीप्रमाणात सर्वत्र आहेच।। त्याचा उगाच बाऊ न करता, न घाबरता तसेच निष्काळजीही न राहता वेळेत वैद्याकडे जाऊन औषध घ्या।। बरे व्हा।।*

*।। काळजी घ्या ।। या दुसऱ्या लाटेच्या कोरोनालाही लवकरच पळवून लावु।।।*

- *Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*

*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी - पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*

*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*

*असेच माहितीपर लेख whats app द्वारे मिळवण्यासाठी आम्हाला आपल्या ग्रुप मध्ये add करू शकता।।*

तसेच *अस्सल आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी* आमच्या website ला व आमच्या Blog ला जरूर भेट द्या...

https://www.shriayurvedic.in/

मुतखडा, मूत्राशय व किडनीचे विकार आणि विशेष अनुभवी चिकित्सा

Address

Aaptashri Ayurved & Panchakarm Clinic, 1st Floor, Opp. To Sad Bekar, Dapodi-Pimple Gurav Road, Pimple Gurav
Pune
411061

Telephone

+919665010500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Saurabh B Kadam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Saurabh B Kadam:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram