GIRME Clinic

GIRME Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from GIRME Clinic, Medical and health, Pune.

06/08/2022
Thank you for thinking of me. I will cherish your gift always..... रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये आलेला व्यावसायिकपणा याच...
15/04/2022

Thank you for thinking of me. I will cherish your gift always.....
रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये आलेला व्यावसायिकपणा याच्या पलीकडे जाऊन श्री.सागर दादा भंडारी यांनी आम्हा डॉक्टरांना अशाप्रकारे आपुलकीने दिलेल्या अमूल्य भेटवस्तू मुळे अजून जोमाने काम करण्यास प्रोत्साहन मिळते. आपण आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून प्रोत्साहित केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻

दि. १३/०४/२०२२ दैनिक पुढारी धन्यवाद 🙏🏻 पत्रकार मनोज गायकवाड
13/04/2022

दि. १३/०४/२०२२ दैनिक पुढारी धन्यवाद 🙏🏻 पत्रकार मनोज गायकवाड

माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना,मित्रांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा सर्वांशी बोलण्याची वेळ येऊन...
24/04/2021

माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना,मित्रांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा सर्वांशी बोलण्याची वेळ येऊन ठेपली आहे सद्य स्थिती पाहता महाराष्ट्रातील परिस्थिती आपण टीव्ही वरील न्यूज बातम्या बघून न बघितल्या सारखं वागत आहोत पण न्यूज मध्ये जेवढे दाखवले जात आहे त्यापेक्षा भयानक परिस्थिती सध्या आहे न्यूजमध्ये जेवढे दाखवलं जात आहे पंचवीस ते तीस टक्के स्थिती आहे ॲक्च्युअल मध्ये खूप वाईट परिस्थिती आहे पेशंटला गरज असल्यास हॉस्पिटल मध्ये जागा मिळत नाही आहे आणि समजा जागा मिळाली तर ऑक्सिजन मिळत नाही आहे आणि समजा दोन्ही मिळाले तर रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही सद्य परिस्थिती अशी आहे पण वास्तव त्यापेक्षाही भयावह आहे.
सर्वप्रथम पुन्हा एकदा थोड्याशा बेसिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात समजा घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला ताप,अंगदुखी, डोकेदुखी यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्याला अलगीकरण (आईसोलेट) करणे खूप गरजेचे आहे कारण सध्या दुसरा कोणताही आजार आम्हा डॉक्टरांना दिसून येत नाही आहे. तुम्ही म्हणाल ताप आला म्हणजे करोना असेलच असं कशावरून म्हणता तर सर्वांनाच सर्दी खोकला दम लागणे ही लक्षणे पहिल्या आठवड्यात जाणवत नाही सुरुवातीला अंगदुखी डोकेदुखी व ताप अशीच लक्षणे 80% रुग्णांमध्ये जाणवून येत आहे तर त्यामुळे असे रुग्ण घरामध्ये काळजी न घेता वावरतात त्यामुळे संपूर्ण फॅमिली परिवार आजारी पडत आहेत आपणास यापैकी कोणतेही लक्षण जाणवल्यास त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा नजीकच्या सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवून घ्यावे व शक्य झाल्यास covid-19 rt-pcr तपासणी करून घ्यावी तुम्ही म्हणाल मी असं का म्हणतोय तर याचे कारण पॉझिटिव्ह रिपोर्ट हातामध्ये आल्याशिवाय आपण घरामध्ये काळजी घेत नाही आयसॉलेट होत नाही व तसेच बाहेर आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरतो ऑफिसला कामाला सगळीकडे जातो त्यामुळे संसर्ग अधिक प्रमाणात वाढतो म्हणून सर्वप्रथम तपासणी करून घ्यावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत दुसरी महत्त्वाची गोष्ट व्हाट्सअॅप फेसबूकवरून पाहून ट्रीटमेंट घेऊ नका तसेच फक्त वाफ घेणे गरम पाणी पिणे व कोणतेही काढे घेऊन करोना पूर्णपणे बरा होत नाही पहिला लाटेमध्ये बरेचसे लोक असेच प्रयोग करून नीट झाले पण त्याच्यामागे शास्त्रीय कारणे आहेत असेच बरं होण्यामागचे कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली असल्यामुळे ती लोकं बरे झाले. तर हे सांगण्या मागचे कारण आत्ता सध्याची परिस्थिती पाहता म्हणजे सर्व गोष्टींचा तुटवडा आहे हॉस्पिटल मध्ये बेड ऑक्सिजन औषधे सर्व सर्व गोष्टींचा तुटवडा आहे एवढेच नाही जर समजा दुर्दैवाने कोणी मरण पावले तर स्मशानामध्ये सरपंण सुद्धा कमी पडते आहे एवढी भयाण परिस्थिती असताना सुद्धा आपण थोडीशी काळजी घेणे खूप गरजेचे आहे म्हणून हे सर्व तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या आपण रुग्ण वाढ बघता आपण कम्युनिटीस्प्रेडच्या दिशेने चाललो आहोत म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे पण फक्त लॉकडाऊन पुरेसा आहे का?तर नाही. फक्त सरकारची जबाबदारी आहे का? नाही आपली पण जबाबदारी आहे आपल्याला असंच खूप दिवस लाॅकडाऊन मध्ये राहायचं आहे का? नाही तर सर्वांनी मिळून काळजी घेणे व सरकारने सांगितलेले सर्व नियमांचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. कसा आहे सध्या रोजचे मृत्युदर वाढत आहे, त्याचे कारण रुग्ण संख्या पण खूप वाढली आहे व आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे.त्यामुळे सर्वांना उत्तम उपचार मिळत नाही आहेत. म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी काळजी घेणे व वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.
कसं आहे आपण आजारी पडलो आपण काळजी नाही घेतली म्हणजे घरामध्ये नाही काळजी घेतली तर बाकीचे आजारी पडतात आणि सर्वात महत्त्वाचे सगळेच लोक गोळ्या औषधांवर नीट होत नाही दहापैकी दोन ते तीन जणांना ऍडमिट करावे लागत आहे व शंभर पैकी दोन ते तीन मृत्यू पावत आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो काळजी घ्या तपासणी करा डॉक्टरांना दाखवा अंगावरती काढू नका व काही पण त्रास झाल्यास सर्वप्रथम आईसोलेट व्हा.कमीत कमीदोन आठवडेकाळजी घ्या शक्य झाल्यास वेगळ्या रूम मध्ये व वेगळे बाथरूम टॉयलेट वापरण्याचा प्रयत्न करा. समजा ज्यांच्याकडे एकच टॉयलेट बाथरूम असेल त्या ठिकाणी बाथरूम मध्ये व टॉयलेटमध्ये जाण्यापूर्वी मास्क घालून व साबणाने स्वच्छ हात धुणे मगच बाथरूमचा वापर करावा बाकीच्या लोकांनी पण अशीच काळजी घ्यावी त्याचप्रमाणे घरामध्ये शक्य झाल्यास सर्वांनीच मास्कचा वापर करावा व अंतर ठेवून बसावे दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या गोष्टींना सर्वांचा स्पर्श होत असेल जसे की दरवाजाचे कडी हँडल टीव्हीचे रिमोट मोबाईल अशा गोष्टी दिवसातून दोन वेळा तरी सॅनिटाईज करायला हव्यात. बाकी बेसिक गोष्टी सर्वांनाच माहीत आहेत फक्त त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांना काही गोष्टी करण्याचा जोर येतो जसे की वॉकिंग करणे गल्लीतल्या गल्लीत का होईनापण जास्त लोकं वॉकिंग करताना दिसतात वॉकिंग करणे चांगले आहे पण त्याबरोबर काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे अजून एक गोष्ट सध्या घरी बसल्या बसल्या बरेच लोक वेगवेगळे खेळ खेळताना दिसतात लहान मुले क्रिकेट बॅडमिंटनअसे खेळ खेळताना दिसतात तर मोठी माणसे मोठी मुले पत्ते कॅरम यासारखे खेळ शेजारीपाजारी नातेवाईक खेळतात तर हे पण थोडे दिवस बंद करणे गरजेचे आहे. तसेच घरामध्ये कोणाचा बर्थडे छोटे मोठे सण असं काहीही असेल तर फक्त आपल्याच घरातील म्हणजे राहणारे एवढ्याच लोकांबरोबर साजरे करावेत आजूबाजूचे व जवळ राहणारे नातेवाईक सर्व बोलवून साजरे नका करू जरी कोणी आजारी नसेल तरीपण तो व्यक्ती कॅरियर स्टेजमध्ये म्हणजे कोणतेही लक्षण नसणारी व्यक्ती पण अशी व्यक्ती दुसऱ्यांना इन्फेक्शन देऊ शकते म्हणून घरातल्या घरातच सर्व गोष्टी करा व आपण सर्वांनी काळजी घ्या. तसेच आजारी व्यक्ती बरोबर दवाखान्यामध्ये गरज नसताना म्हणजे सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती बरोबर जाऊन गर्दी करू नये व तसेच तो दवाखाना आहे तिथे इनफेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात नसलेल दुखणे घरी घेऊन जाण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी जाणे पण टाळावे. तसेच बाहेर गेल्यावर आपल्या नाकाला डोळ्याला तोंडाला स्पर्श करू नका हात धुतल्या नंतर किंवा सॅनिटाईज केल्या नंतरच हाताने स्पर्श करावा. घराबाहेर पडल्यावर पूर्ण वेळ मास्कचा वापर करावा. बरयाचवेळा असं दिसून येत लोक रस्त्यावर, गाडीवर मास्क वापरतात पण दुकानात थांबल्यावर दवाखान्यात आल्यावर गप्पा मारताना मास्क काढून किंवा खाली घेऊन बोलतात तर हे पूर्णपणे चुकीचे आहे घरातून बाहेर पडल्यावर पूर्णवेळ मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.
अजून एका विषयावरती थोडसं बोलावसं वाटतं पण बोलावं की नाही बोलावं असा प्रश्न पडतो तर तो विषय राजकारण आहे आत्ताची स्थिती जी आहे ती राजकारण करण्याची नाहीये आपण खूप मोठ्या संकटा मधून चाललो आहोत यामध्ये राजकीय लोक एकमेकांना दोष देत आहेत ते त्यांचे कामच आहे पण त्यांनीही परिस्थितीची जाणीव व गांभीर्य ठेवून वागावं एवढीच अपेक्षा. सरकार सरकारच्या परीने योग्य निर्णय घेत आहे काही चुकतही असतील किंवा उशिरा घेतले असतील ठीक आहे आपण सर्वांनी सरकारला साथ देणे गरजेचे आहे सरकार फक्त पैसे देऊ शकतो व्यवस्थापन करू शकत पण डॉक्टर सिस्टर नर्सेस वॉर्डबॉय हे असेच रातोरात तयार नाही करू शकत तर आपली लोकसंख्या पाहता आपली आरोग्य व्यवस्था खूप कमकुवत आहे म्हणजे कमी पडत आहे पण तरीदेखील आपल्या देशातीलआणि आपल्या राज्यातील रिकवरी रेट जगातील इतर देशांपेक्षा सर्वात चांगला आहे पण हा केव्हा पर्यंत चांगला राहील जी आरोग्य व्यवस्था आहे त्यांच्या कार्यक्षमतेचे एका विशिष्ट मर्यादे पर्यंतच करू शकते एकदा का परिस्थिती हाताबाहेर गेली की कोणीही काहीही करू शकत नाही ऑलरेडी एक वर्षापासून सर्व व्यवस्था जसे डॉक्टर नर्सेस आरोग्य कर्मचारी सर्व काही विसरून खूप काम करत आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत तर ते पण थकलेले आहेत तरीदेखील दुसऱ्या लाटेमध्ये त्या लोकांनी आपल्याला जाणवून देखील दिलेलं नाही आहे तरी आपली पण जबाबदारी आपण सर्वांनी ओळखली पाहिजे फक्त सरकार डॉक्टर शास्त्रज्ञ लसीकरण ह्या गोष्टीने करोना आटोक्यात येणार नाही त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरच आपण ह्या संकटातून बाहेर पडू शकतो तर मित्रांनो थोडीशी काळजी घ्या गोष्टींचे पालन करा स्वतःची काळजी घ्या त्याबरोबरच स्वतःच्या परिवारातील व समाजाची पण आपण काहीतरी लागतो म्हणून नियमांचे पालन करा व अशाप्रकारे आपण सर्वजण मिळून या करोना महामारी ला संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करूयात काळजी घ्या घरीच रहा सुरक्षित रहा...

आपलाच,
डॉ. सागर गिरमे
गिरमे क्लिनिक,
मुंढवा, पुणे
9860068872

Stay home Stay safe stay healthy & take care..... 🙏🏻

Services
02/02/2021

Services

Address

Pune
411036

Telephone

+919860068872

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GIRME Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share