22/05/2021
*जर डॉक्टर कमी पडतायेत, कोरोना वर आणखी उपचार मिळत नाही तर मग दुसऱ्या पॅथीला ( आयुर्वेद )उपचार करण्याची संधी का दिली जात नाही ?*
अलोपॅथी मुळे तुम्हाला नुकसान झाले तरी चालेल पण दुसऱ्या कुठल्याही पॅथीला WHO मान्यता देणार नाही, व दुष्परिणाम झाल्या नंतर देखील त्याच डॉक्टराना भेटा म्हणजे ते परत एकदा उपचार करून दुष्परिणाम काय होणार आहेत हे ही सांगतील.
*कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना होतोय ‘म्युकोरोमायकॉसिस'चा त्रास, काय आहे ‘म्युकोरमायकॉसिस’?*
कोरोनातून बरे झाल्यानंतर आता अधिकची खबरदारी बाळगणं आवश्यक झाले आहे. कोरोनातून बरे झालेल्या निवडक रुग्णांमध्ये नव्या प्रकारचे साइड इफेक्ट जाणवत आहेत. ‘म्युकोरोमायकॉसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णांवर होत आहेत. राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. अशा वेळी रुग्णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे.
*काय आहे ‘म्युकोरमायकॉसिस’?*
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जिवाणू नाकामध्ये जातात. परंतु, रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर ‘म्युकोरमायकॉसिस’ या बुरशीची वाढ होते. कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे.
*म्युकोरोमायकॉसिस घातक का आहे?*
* या बुरशीचा संसर्गाचा वेग सर्वाधिक आणि उपचारासाठी वेळ कमी मिळतो.
* लवकर निदान झाले तर इंजेक्शनद्वारे उपचार शक्य
* जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ
* डोळ्यांपाशी संसर्ग पोचल्यास त्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता
* मेंदूपर्यंत संसर्ग पोचल्यास उपचार करणे दुरापास्त होते.
या आजाराची सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी लक्षणे दुर्लक्षित केली गेली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोविडमधून बरे झालेल्यांनीही प्रत्येक लक्षणाकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे
*म्युकोरोमायकॉसिसची लक्षणे*
चेहऱ्यावर सूज येणे.
गाल दुखणे.
डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे.
डोके दुखणे, नाक चोंदणे.
रक्ताळ किंवा काळसर जखम.
या आजाराची लागणच होऊ नये यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं आवश्यक आहे.तसंच, कोणतीही लक्षणं दिसली तर तातडीनं डॉक्टरांना दाखवणंही गरजेचं आहे.
*कोणी घ्यावी विशेष काळजी.*
* मधुमेह असणाऱ्यांनी.
* उच्च रक्तदाब असलेल्यांनी.
* रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले.
* कीटोॲसिडॉसिस
अधिक माहितीसाठी संपर्क - 9075892010