08/12/2023
*गेली १४ वर्षे सातत्याने मी महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर अवेरनेस लेक्चर्स, तपासणी, स्क्रिनिंग कॅम्प*
*आणि त्यानंतर आवश्यक ते* *मार्गदर्शन आणि योग्य तज्ञ* *डॉक्टरांकडून ट्रिटमेंट ह्या सर्व विषयांवर कार्यरत आहे.*
*इतक्या वर्षात काम करीत असताना असे निदर्शनास आले आहे की*
*महिला आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःच्या तब्येतीकडे जरा दुर्लक्ष करतात.*
*परंतु जी स्त्री संपूर्ण कुटुंब सक्षमतेने संभाळते ती आरोग्याच्या दृष्टीने अतिशय सक्षम असणे जरुरीचे आहे* .
*आजच्या काळात महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढत आहे*
*आपण जर*
*२२ महिलांच्या तपासण्या केल्या तर १महिला ही कॅन्सरपिडीत असते म्हणजे २२ मध्ये १ असे खूप काळजी करण्यासारखे हे प्रमाण आहे*
*तरी माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण ह्या आजाराच्या अवेरनेसबद्दल, आणि पूर्वतपासणीबद्दल अतिशय गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे*
*२० वर्षे वयापासूनपुढील मुलींना ह्या आजाराचे संभाव्य धोके आणि तत्पूर्वी घ्यावयाची काळजी आणि दक्षता ह्या गोष्टी माहित असणे अत्यावश्यक आहे*
*४०वर्षे वयापर्यंत नॉर्मल महिलेने ब्रेस्टकॅन्सर तपासणी अंतर्गत* *ब्रेस्टची सोनोग्राफी करून घेणे आवश्यक आहे*
*४० वर्षापुढिल वय असणाऱ्या नॉर्मल महिलेने वर्षातून एकदा मेमोग्राफी करूनच घ्यावी आणि त्याचा जो काही रिपोर्ट येईल तो ब्रेस्टकॅन्सर तज्ञांना दाखवावा आणि योग्य तो सल्ला घ्यावा*
*ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकारची *UNWANTED GROWTH* *किंवा काहीही वेगळेपण जाणवले की महिलांनी त्वरित डॉक्टरांकडे जाऊन ते सांगतील त्याप्रमाणे पुढील तपासण्या करून घ्याव्यात*
*महिलांसाठी अवेरनेस लेक्चर्स मी आणि माझी टीम देतो*
*आपण जास्तीत जास्त महिलांच्या साठी अश्या लेक्चर्स चे नियोजन अवश्य करा*
*जंगली महाराज रोडवर LCIF आणि लायन्स क्लब पुणे सहकार नगर, लायन्स क्लब पूना सेंट्रल ह्यांच्या संपूर्ण सहकार्याने LRCC हे कॅन्सर डायग्नोसिस अत्याधुनिक मशिन्स सह गेली ५ वर्षे कार्यरत आहे*
*येथे सर्व तपासण्या कन्सेशनल दरात केल्या जातात*
*आपण लायन्स क्लब मार्फत दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी तपासणी कॅम्प, आपल्या सेंटरवर आवश्यक त्या तपासण्या, जरूर पडल्यास ऑपरेशन्स अत्यंत अल्प दरात करून देतो*
*आपल्या माहिती मधील सर्व क्षेत्रातील महिलांसाठी पण आपण तपासणी कॅम्प चे नियोजन करून त्यांना योग्य ती मदत करू शकतो उदाहरणार्थ--- (शैक्षणिक संस्था, बचतगट, कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या महिला, कॉर्पोरेशनच्या शाळेतील शिक्षिका,सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिला,LIC तील महिला ,ग्रामीण भागातील गरीब व गरजू वंचित महिला, भाजीमार्केट मध्ये हमालकाम करणाऱ्या महिला,किंवा हमालकाम करणाऱ्या पुरुषांच्या बायका, बुधवार पेठेतील दुर्लक्षित महिला)*
*👆👆👆👆👆👆*ह्या सर्वांसाठी आपण काम करु शकतो*
*तर चला मग त्वरा करा आणि त्वरित मला संपर्क करून मानवतेच्या दृष्टिकोनातून अतिशय जरूरी असणाऱ्या सेवाकार्यामध्ये सहभागी होऊ यात*
*आपण सर्वजण मिळून ह्या जीवघेण्या आजारापासून माता भगिनींना वेळेआधी जागरूक करू यात आणि आपली कुटुंबसंस्था सक्षम आणि निरोगी करण्याच्या दिशेने वाटचाल करू यात*
*संपर्कासाठी नंबर्स👇👇👇👇👇👇*
*9850676976*
*7757063639*
*9011062419*
*लायन सरिता सोनावळे*
*D C Breast cancer* *awareness and checking*