02/01/2023
**AWritersClub
Screen addiction part 3
नमस्कार सगळ्यांना.
आज आपण या series मधला तिसरा भाग बघणार आहोत..
Corrective measures:- आपलं मूल जर already screen addiction च्या विळख्यात अकडलं असेल तर त्याला त्यातून बाहेर कसं काढायचं हे आज आपण बघणार आहोत..
1. Generate alternatives & be strict :- जर मूल screen च्या आहारी गेलंय आणी आपल्याला त्याला परवृत्त करायचंय तर आपल्याला strict होणं गरजेचं आहे.
उ.दा. जर आत्ता तुमचं मूल 3-4 तास टोटल screen बघत असेल, may it be phone, laptop, TV, anything.. या आपल्याला त्याच्याशी बसून बोलणे गरजेचे आहे की screen जास्त वेळ बघितल्याने काय काय होऊ शकत.. अर्थात त्याला कळेल अश्या पद्धतीने.. मग त्याच्या सोबत बसून आपल्याला 4 तासावरून screen time हळू हळू कमी करण्यासाठी एक time table बनवायला हवा.. make it attractive, & colourful.. तो त्यांना दिसेल अश्या जागी लावा.. त्यांना विचारून हे सगळ करणे अपेक्षित आहे. "मी हे time table बनवलाय उद्या पासून follow कर" अस म्हणून उपयोग नाही..
अर्थात त्या time table सोबत आपला स्वतःचा screen time लिमिट करण्याची जवाबदारी सुद्धा आपलीच.. कारण मूल आपलं बघूनच शिकतात.. आता सुरुवात होणार time table follow करण्याची.. सुरुवातीला मूल त्रास देणार follow करायला मात्र मुलाने कितीही हट्ट केला तरी या वेळेस strict असणे फार गरजेचे आहे.. कारण आपण घरात बनवलेल्या नियमांना seriously घेत नसू आणी मुलांच्या हट्टा पुढे किंवा काही कारणाने ते follow करत नसू तर मुलं त्यांचे सोयीस्कर interpretation करतात.. म्हणजे काय की rules are made to be broken, चलता है, काही फरक पडत नाही.. आणी मग त्यांना सगळ्यातून बाहेर काढणं अवघड होऊन बसतं. आईचं नाही म्हणजे खरंच नाही असतं, असा मॅसेज मुलांना जायला हवा तेव्हाच ते rules seriously घेतील.. आईला strict असणं गरजेचं आहे.. मात्र strict असणे म्हणजे कायम रागावणे, किंवा ऐकलं नाही तर मारणे असा मुळीच नाही.. स्वतःच्या बोलण्यावर कायम असणे म्हणजे strict असणे होय..
या सोबतच जर मुलाने एक दिवस सुद्धा time table follow केला तर त्या time table वर tick mark करणे आणी त्याला appreciate करणे, आणी मुलाला आपलं target achieve करण्या साठी प्रोत्साहित करणे सुद्धा अतिशय महत्वाच आहे. Appreciation acts as a driving force for kids to follow rules..
आता अर्थात हे करत असताना screen नाही तर दुसरे काय हे alternatives आपल्याला generate करायला लागणार..
2. Alternate activities for dopamine secretion:- आपण पहिल्या भागात बघितल्या प्रमाणे screen बघितल्याने pleasure hormone dopamine secrete होतं, आणी त्या pleasure चा अनुभव परत परत घेण्यासाठी मूल परत परत screen बघणार.. आता ह्या dopamine मुळे मिळणारा आनंद मुलापासून अचानक हिरावून घेतला तर मुळीच चालणार नाही कारण त्याने मूल restless, चिडचिडे, होणार.. तर आपल्याला हे बघायला हवं की अजून कुठल्या activities आहेत ज्या safe आहेत आणी ज्याने dopamine secrete होतं..
तर sports, exercise, प्राणायाम, किंवा कुठला art form शिकणे उ.दा. dance, music, painting, drawing, musical instrument. यापैकी काहीही सातत्याने केल्याने dopamine secrete होतं आणी हळू हळू आपण स्क्रीन ला या गोष्टींनी replace करू शकतो.
आणखीन एक अतिशय महत्वाची बाब, या सगळ्या वरच्या गोष्टींसोबतच praise म्हणजे कौतुक हे सुद्धा dopamine secrete करत.. आपण मुलांच्या चांगल्या वागणुकीला कितीदा appreciate करतो बरं, आठवा जरा.. मुलं त्यांची image आपल्या डोळ्यात बघत असतात, आपण त्यांना छान म्हंटल की त्यांना फार आनंद होतो. याचा अनुभव आपण बरेचदा घेतला असेल.. मूल चुकलं की आपण त्यांना जसं आवर्जून रागावतो तसच जर त्यांनी काही चांगलं केल तर त्यांच मनापासून कौतुक नक्की करा..
3. Greens and Blues:- मूल जन्मापासूनच Nature कडे attracted असतात. तुम्ही बघितलं असेल की मुलांना हिरवळ, समुद्र, प्राणी या सगळ्या मध्ये इंटरेस्ट असतो आणी ते त्यात रमतात.. इतकाच काय तर साधं बाथरूम मध्ये पाणी खेळायला पण त्यांना खूप आवडतं, किंवा बगेतल झाड कसं मोठं होतं, कसे त्याला फुलं येतात हे सुद्धा ते जाणून घेतात आणी मज्जा वाटते त्यांना हे सगळं बघायला..
मुलांना screen पासून परावृत्त करण्यासाठीचा हा अतिशय चांगला, safe मार्ग आहे आणी nature मधून मुलं बरच काही शिकू शकतात.
अर्थात त्यांना Green & Blues च्या सान्निध्यात घेऊन जाणे म्हणजे महागड्या trips प्लॅन करणे अजिबात नाही.. तर त्यांना गड किल्ले दाखवणे, तिथली greenery, तिथलं सौंदर्य, तो freshness त्यांना अनुभवू देणे महत्वाचे आहे. किंवा कधी त्यांना अगदी गावात नेणे, तिथली विहीर, नदी , ओढा दाखवणे, चांदण्या रात्री गावात त्यांना चांदण्या बघायला घेऊन जाणे.. अगदी काहीच नाही तर त्यांना घरात आवडेल तसं पाण्याशी, रंगांशी, खेळू देणे.. एक लक्षात घ्या जर त्यांना addiction पासून लांब नायायचा असेल तर कितीही messy वाटलं तरी त्यांच्या आवडीच्या काही गीष्टी त्यांना करून देणे गरजेचे आहे. कारण त्यात त्यांना आवड असल्याने त्यांच मन रमेल आणी त्यांची curiosity वाढेल आणि ते आपोआप screen पासून लांब जातील करण त्याहून अधिक lucrative त्यांना काहीतरी मिळालेलं असेल..
बघा करून.. अर्थात addiction ही गोष्ट काही दिवसात जाणारी नाही.. त्याला बरेच प्रयत्न करावे लागणार, मात्र प्रयत्न करताना कुठलीही अडचण आली तर मला नक्की कळवा.. आपण मिळून त्यावर मात करू मात्र मुलांना यातून बाहेर काढू... ही generation अतिशय हुशार आहे, अशा addiction मुळे ती वाया जाता कामा नये..
WHO नी age wise screen time ची लिस्ट दिलीय, तुमच्या reference साठी ती खाली देतेय.. बघा आपल्या मुलाचा screen time जास्तीत जास्त किती असायला हवा आणि आपल्याला अजून किती काम करायचंय ते..
Infant (less than 1 year of age): Screen time is not recommended.
1-2 years of age: No screen time for a 1-year-old. No more than an hour for 2-year-olds, with less time preferred.
3 to 4 years old: No more than one hour.
आपल्याला आणखीन कुठल्या विषया संदर्भात माझ्या कडून लेख हवा असेल तर मला नक्की कळवा. मी प्रयत्न करेल लिहिण्याचा..
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत
धन्यवाद..
Ketki Kale
Psychological counselor
Transform Counseling Services