श्री Yoga & Wellness Centre Acupuncture Clinic

  • Home
  • India
  • Pune
  • श्री Yoga & Wellness Centre Acupuncture Clinic

श्री Yoga & Wellness Centre Acupuncture Clinic Hello to all ��� we are providing such as Massage Therapy, Seat Bath, Mud Therapy, Hydro Therapy, Acupuncture, Diet Consultation, Counseling

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला...
10/10/2024

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व,सच्चे देशभक्त स्व. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!💐💐🙏🙏💐💐

बदलत्या काळात आपल्याला मुलांना शिकवाव लागेल Health is Wealth...🕺🤸🏃🧍🧑‍🦱🧑‍🦲
08/10/2023

बदलत्या काळात आपल्याला मुलांना शिकवाव लागेल Health is Wealth...🕺🤸🏃🧍🧑‍🦱🧑‍🦲

*पचनसंस्था आणि मन(मेंदू) यांचं कनेक्शन*       आपल्याकडे पचनाविषयी विविध प्रकारचे वर्णन ऐकायला मिळते व त्याबद्दल अनेक असे...
10/09/2023

*पचनसंस्था आणि मन(मेंदू) यांचं कनेक्शन*
आपल्याकडे पचनाविषयी विविध प्रकारचे वर्णन ऐकायला मिळते व त्याबद्दल अनेक असे गैरसमज पण आहेत, कोणाचा कोठा जड असतो, कोणाचा हलका असतो.कोणाचे पोट जड राहते, कोणाचे डब्ब असते! काही जणांना पोटाचा कधीही त्रास नसतो, तर काही जण पचनाच्या विकारांनी सदैव त्रस्त असतात.

लहान मुलाला ताप आलेला असला, तरी घरातल्या मोठ्या बाई म्हणतात, 'पोट साफ झालंय ना, आता ताप उतरेल!' म्हातारपणी कोणी आजारी पडले तरी म्हटले जाते, 'खाल्लेले पचते आहे ना, मग काळजीचे कारण नाही!' पचन आणि प्रकृती यांचा संबंध अशाप्रकारे महत्त्वाचा मानला जातो!
आपल्याला वाईट वाटले की
*'पोटात गलबलते'*. *भीतीने 'पोटात गोळा येतो'* किंवा *'पोटात खड्डा पडतो'* कोणाविषयी मत्सर वाटला की *'पोटशूळ उठतो'*. आपल्या मनातली तळमळ व्यक्त करताना कोणी *'पोटतिडकीने सांगतात'*. आपल्या वेगवेगळ्या मानसिक स्थितीचे वर्णनही पोट, पचन संस्था यांच्या माध्यमातून आपण करतो आणि जणू काही *पचन संस्था आणि मन यांच्यातला दुवाच मान्य करतो.*
प्रत्यक्षात सुद्धा पचन संस्था आणि मानसिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे, असे लक्षात येते. *Inflammatory bowel disease* म्हणजे आतड्याला सूज असणे. जेव्हा ही सूज मोठ्या आतड्याला असते, त्याला ulcerative colitis म्हणतात आणि आतड्याच्या कोणत्याही भागात ज्या आजारात सूज येऊ शकते त्याला *Chron's disease* म्हणतात. संडास वाटे रक्त पडणे, पोटात दुखणे आणि शौचाच्या सवयी बदलणे अशी लक्षणे या आजारांमध्ये दिसून येतात. ही लक्षणे कधी वाढतात, तर कधी नियंत्रणात असतात. मानसिक ताण तणावामुळे लक्षणे वाढतात. या आजारांच्या अनेक रुग्णांमध्ये उदासपणा आणि चिंतेचा आजार दिसून येतो. पुन्हा पुन्हा त्रास दिसणाऱ्या लक्षणांमुळे रुग्ण त्रस्त होतो.
पोटातले दुखणे अस्वस्थ करणारे असते. काहीही खाताना मनावर दडपण राहते, जे खातोय ते पचेल की नाही, काही त्रास होणार नाही ना अशा विचारांनी मनात चिंता निर्माण होते. मानसिक ताण तणाव, डिप्रेशन चिंता यांच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. पचन संस्थेतील देखील प्रतिकाराची क्षमता कमी होते आणि आतड्याला सूज येते. मानसिक स्थिती, प्रतिकार शक्ती आणि पचनाचे विकार असा हा एकमेकांशी संबंध आहे.
डिप्रेशनमुळे लोकांमध्ये मिसळणे कमी होते, चिडचिडेपणा वाढतो, आपल्या तब्येतीविषयी सतत मनात विचार घोळत राहतात, स्वतःची कीव यायला लागते. विचारनिष्ठ उपचारांचा या डिप्रेशनसाठी आणि त्या योगे IBD ची लक्षणे कमी होण्यासाठे चांगला उपयोग होतो. जीवनशैलीतील बदल, योग ,ध्यानधारणा, शिथिलीकरण, mindfulness या सगळ्याचा जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोग होतो.

*Irritable bowel syndrome(IBS)* या आजारामध्ये पोटा दुखणे, पोटात अस्वस्थ वाटणे, शौचास जाण्याची वारंवारता बदलणे, कधी जुलाब होणे, कधी बद्धकोष्ठता होणे, पोट साफ झाले की बरे वाटणे अशी सगळी लक्षणे असतात. जवळ जवळ ५०% IBS च्या रुग्णांमध्ये डिप्रेशन आणि अतिचिंता आढळून येते. लहानपणापासून अनुभवाला आलेली प्रतिकूलता, आईपासून ताटातूट, काही वेळेस लैंगिक शोषणाचा अनुभव अशा मानसिक घटकांमुळे IBS ची आणि डिप्रेशनची शक्यता निर्माण होते. औषधांबरोबरच, योग, प्राणायाम, मानसोपाचाराचाही उपयोग केला तर IBS( Irritable bowel syndrome)* ची लक्षे नियंत्रणात राहण्यास मदत होते.

खूप वेळा पोटदुखी, पचनाचा त्रास अशी लक्षणे घेऊन पेशंट येतात. विवध तपासण्या केल्या तरी कोणत्याही शारीरिक व्याधीचे निदान होत नाही. थोडी खोलात जाऊन चौकशी केली, पेशंटशी विश्वासाचे नाते निर्माण केले की बऱ्याच वेळा डिप्रेशन ची लक्षणे सापडतात. म्हणजे प्रत्यक्षात डिप्रेशनसारखा मानसिक विकार असतो, पण सामोरी येतात ती शारीरिक लक्षणे. किंबहुना, असे म्हटले जाते की (शारीरिक आजार नसताना) जितकी शारीरिक लक्षणे जास्त तितकी मानसिक अस्वस्थता मानसिक संघर्ष जास्त.

पचनसंस्थेचे अनेक विकार मनःस्थितीवर अवलंबून असतात. आतडे आणि मेंदू यांच्यामध्ये एक दुवा असतो.*(Brain gut axis)* आतड्याची लक्षणे जसे इन्फेक्श, ऑपरेशन यांचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो, तसेच आयुष्यात घडणाऱ्या घटना, कामाचा ताण,प्रत्येक गोष्टीचे मनात अवडंबर करणे, मनातल्या भावना व्यक्त न करता येणे अशा मानसिक प्रक्रियांचा सुद्धा मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि पचन संस्थेची लक्षणे तयार व्हायला या प्रक्रिया जबाबदार ठरतात. पचन संस्थेचे अनेक विकार सुरू होणे, वाढणे, पुन्हा पुन्हा होणे याला मनोसामाजिक परिस्थिती अनेक वेळा कारणीभूत होते. बऱ्याच वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष होते, केवळ अपचनाच्या लक्षणांवर इलाज केला जातो, पण मानसिक घटकांकडे लक्ष न दिल्यामुळे अपचन होतच राहते.

ताण तणाव वाढला की 'छातीत फार जळजळ होते ' असे विधान आपण बऱ्याच वेळा ऐकतो आणि ते खरेही आहे. कारण ताणतणाव वाढला की जठरामध्ये ऍसिड जास्त तयार होते. *एच. पायलोरी(Helicobacter pylori)* या जीवणूचा प्रादुर्भावही अल्सरमध्ये दिसून येतो. पेशंटला समजून घेणे, धीर देणे, पचनाच्या लक्षणांचा मनोसामाजिक घटकांशी असलेला संबंध शोधून तो समजून घेणे, पचनाच विकार बराच काळ चालणारा आणि कमी जास्त होणारा आहे हे पेशंटला स्वीकारायला मदत करणे अशा उपायांचा चांगला उपयोग होतो. मानसोपचार आणि औषधोपचार दोन्हीचा वापर केला तर पचनाचे विकार लवकर काबूत येतात. आपले जठर, आतडे आणि आपला मेंदू, मन यांचातले नाते समजून घेतले तर पचनाचे आणि मानसिक दोन्ही विकार नियंत्रणात ठेवता येतात.
पाचनसंस्थच्या बिघडा नंतर निसर्गिक तीन नियम सर्वांनी लक्ष्यात घ्यावे.
*काय खायचं?*
कोणताही पदार्थ आपण खाताना फक्त त्याचा सुगंध व रंग बघून आपण खातो पण तो आपल्या शरीराला किती पोषक आहे या कडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपण काय खातो हे अवरजून बघावे.

*कसे खायचं?*
बरेच लोग आहार घेताना आती घाई करतात ती टाळावी जेवण चाऊन,चघळून व्यवस्थित खावे आपण आहार घेताना स्वच्छ जागेत बसलो आहे की नाही किंवा आपले मन त्या जेवणकडे आहे की नाही हे तपासावे.
*किती खायचं?*
आपल्या आहाराचे आकार,प्रमाण( quantity )हे आपल्या रोजच्या दिनचर्येवर ठरलेले असते कमी शारीरिक काम कमी जेवण हा निसर्ग नियम आहे त्यामुळे तो कटाक्ष्याने पाळावा..

*घरगुती उपाय*-

*1)अर्ध दिवस उपवास*
उपवास करणे हा जसा उपक्रम अध्यात्मशी आपण जोडतो त्यापक्ष्याही त्याचा उपयोग शरीरातील दोषमुक्त करण्यासाठी होतो त्यामुळे उपवासाला एक उपचार म्हणून पाहिले गेले पाहिजे त्यासाठी पाणी पिऊन उपशी राहून आपण आपली पचनसंस्था सुधारू शकतो.

*2) थंड गरम पाण्याचा शेक*- पोटात जळपणा वाटत असल्यास पोटावर थंड व गरम पाण्याचा शेक हा उत्तम उपचार आहे.

*3) स्वयंपाक घरातील पदार्थ -* ओवा, काळे मीठ, हिंग, लवंग, जायफळ, इलायची, काळे मिरे हे सर्व पोटाच्या अजारा साठी उत्तम औषध आहेत त्यांचा उपयोग करावा.
*योग, प्राणायाम* हे तर पोटाच्या आजारावर रामबाण उपाय आहेतच. 🙏🏻🙏🏻
*धन्यवाद*
*डॉ. सचिन सासनकर*
*(श्री)WELLNESS*
*(योग,आयुर्वेद,निसर्गपचार,एक्युपंकचर). लोहगांव, पुणे-४७*
*9850652258 / 9146113838*

22/04/2022
We Care in Wellness Cure in illness
17/04/2022

We Care in Wellness Cure in illness

We Care in Wellness Cure in Illness
16/04/2022

We Care in Wellness Cure in Illness

16/04/2022
Are you diabetic? Don't worry we'll take care of you !!👍👍🙏🏻🙏🏻
09/02/2022

Are you diabetic? Don't worry we'll take care of you !!👍👍🙏🏻🙏🏻

12/12/2021

Address

Pune
411030

Telephone

+919850652258

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री Yoga & Wellness Centre Acupuncture Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to श्री Yoga & Wellness Centre Acupuncture Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category