Arogya sarthi chikitsalay

Arogya sarthi chikitsalay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arogya sarthi chikitsalay, Medical and health, Arogyasaathi Ayurveda Chikitsalaya, 2 Ramdoot vihar, Above Hotel Sumitra. Karishma chowk. Karve Road Pune, Pune.

30/04/2022

Lemon grass
Lemon grass is hot in Nature , reduces kapha and vata, increases agni, and is digestive.
Lemon grass is very useful in fever, cold and indigestion.
It is useful in stomach ache as well as feeling like stomach is stuffed.
Juice of Lemon grass is a diuretic, increases sweating, acts as a stimulant, and mouthwash.
Lemon grass oil is used in skin disorders and vata diseases. Aamvata, low back pain etc. Abhyang is made with its oil.

30/04/2022

गवती चहा
गवती चहा हा उष्ण गुणधर्माचा, कफ व वाताला कमी करणारा, अग्नी वाढवणारा, पाचक अशा स्वरूपाचा आहे.
ताप, सर्दी, अपचन या मध्ये गवती चहा चा उत्तम उपयोग होतो.
पोट दुखणे तसेच पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे यामध्ये याचा रस देतात.
गवती चहा मूत्र निर्माण करणारा घाम वाढवणारा, उत्तेजना निर्माण करणारा, मुखशुद्धी करणारा आहे.
गवती चहाच्या तेलाचा उपयोग त्वचा विकारनाशक व वातनाशक म्हणून होतो. आमवात, कंबर दुखी इ. मध्ये याच्या तेलाने अभ्यंग केला जातो.

23/04/2022

Bel
-Bel is astringent and bitter in taste and hot in nature.
Being astringent and bitter, it reduces kapha and being hot, it reduces vata.
-Raw bel fruit enhances digestion, binds mala i.e.fecal matter and destroys worms.
-Ripen bel fruit is astringent, sweet.As it is sweet, it enhances strength.
-Belfruit reduces inflammation in the uterus, white discharge as well as postpartum diseases.
Bels root is useful in diseases of vata, insomnia, etc.
Bel leaf juice is useful in cold, cough, difficulty in breathing etc.

23/04/2022

*बिल्व*

बेल
-बेल हे चवीला तुरट आणि कडु असून उष्ण (गरम) आहे. तुरट व कडु असल्याने कफ कमी करतो व उष्ण असल्याने वाताला कमी करतो.
-कच्चे बेलफळ पचनशक्ती वाढवणारे , शौचाला बांधून ठेवणारे व कृमीचा नाश करणारे आहे.
-पिकलेले बेलफळ तुरट, गोड आहे , गोड असल्याने शक्ती वाढवणारे आहे.
-बेलफळ हे गर्भाशयावरील सूज कमी करणारे, अंगावर पांढरे जाणे तसेच बाळंतपणानंतर होणारे आजार कमी करतो.
बेलाचे मूळ हे वाताचे आजार , झोप न येणे इत्यादींमध्ये उपयुक्त आहे.
बेलाच्या पानांचा रस सर्दी,खोकला, दम लागणे इत्यादींमध्ये उपयुक्त आहे.

16/04/2022

Nirgundi
This plant is found all over India.
Leaves are mainly used as medicine.
They taste bitter,
Astringent, slightly spicy.
It is used in worms, skin diseases, arthritis, joint pain,urinary incontinence and menstrual disorders.
It is also a memory
enhancer, beneficial for hair and eyes.
It can be used in all inflammatory diseases.
In case of cold and swelling of the throat, the dried leaves are burnt and the smoke is inhaled.
In joint diseases potali is made by making paste of its leaves and used for massage. It gives quick relief in swelling and pain.
The oil made from its leaves is used in wounds ,nadivrana, skin diseases, rheumatism.
Medicated water of its leaves is made and sitz bath with it gives lot of relief in urinary incontinence.

16/04/2022

निर्गुंडी
भारतामध्ये सर्वत्र आढळणारी अशी ही वनस्पती.
प्रामुख्याने याच्या पानांचा वापर व्यवहारात केला जातो.
याची पानं चवीला कडवट,
तुरट,थोडीशी तिखट असतात.
यांचा उपयोग कृमी, त्वचेचे रोग, सांधेदुखी, मूत्रजनन, आर्तवजनन यामध्ये होतो.
तसेच स्मरणशक्ती वर्धक,केस व डोळ्यांना हितकर असाही होतो.
सूज असणाऱ्या सर्व आजारात याचा उपयोग करता येतो.
सर्दी व घशाला सूज असताना याच्या पानाची धुरी दिल्याने चांगला उपयोग होतो.
सांध्यांच्या आजारात याच्या पानाचा शेक दिल्याने सूज व दुखणे यात फार लवकर आराम मिळतो.
याच्या पानापासून बनवलेले तेल व्रण नाडीव्रण,कुष्ठ,आमवात यामध्ये वापरतात.काही कारणाने लघवी अडकली असल्यास याच्या पानाने सिद्ध केलेल्या पाणी एका टबमध्ये भरून बेंबीपर्यंत चे अंग बुडेल असे बसावे. त्यामुळे पुष्कळ आराम मिळतो.

09/04/2022

* Udumbar *

Udumbar (Umber) is astringent in taste, heavy to digest and cooling in nature.
Umber bark, fruit, milk, etc. are used in medicine.
Umber is used to reduce kapha and pitta. It also decreases the heat.
Lepa of umbara sprouts is applied in skin disorders.
Umber milk is used in the diseases in children during tooth eruption like diarrhea etc.
In women, excessive menstrual bleeding and white discharge, the decoction of umber bark is used.
Ripen fruit of umber can cause worms.

09/04/2022

*उदुंबर*

उदुंबर (उंबर) हे चवीला तुरट असून पचायला जड आणि थंड आहे.
औषधींमध्ये उंबर साल,फळ, दूध, इत्यादीचा उपयोग केला जातो.
उंबर हे कफ ,पित्ताला कमी करणारे व उष्णतेचे विकार कमी करणारे आहे.
त्वच्या विकारांमध्ये उंबराच्या कोंबाचा लेप केला जातो.
लहान मुलांमध्ये दात येत असताना होणारे जुलाब तसेच इतर व्याधी मध्ये उंबराच्या दुधाचा उपयोग केला जातो.
स्त्रियांमधील मासिक पाळी मध्ये होणारा अधिक रक्तस्त्राव , पांढरे अंगावर जाणे यांमध्ये उंबराच्या सालीचा काढ्याचा चांगला उपयोग होतो.उंबराचे पिकलेले फळ हे कृमी (worm) निर्माण करणारे आहे.

26/03/2022

Amalaki (Amla)
Amla is having five type of taste that are sweet, sour, spicy, bitter and astringent. Due to this, amla is useful to decrease all the three doshas. Despite being sour, it is characterized by reduction of pitta dosha.
Amla powder or juice works best in digestive disorders like loss of appetite, acidity, liver disorders, stomach ache, hemorrhoids.
Juice of Amla leaves are used in eyesight as well as in other eye disorders.
On baldness and whitening of hair the head is washed with amla sticks and amla oil is also applied.
Amla a great medicine for enhancing memory, to sharpen the mind and maintaining youth forever.
Amla is also used for difficulty in breathing, cough, diabetes, jaundice, skin disorders and chronic fever.
Amla medicines like Chavanprash, Moravala, Amla Candy etc. are oftenly used in day today life. Please consult your vaidya before taking those medicines.

26/03/2022

आमलकी (आवळा)

आवळा पंचरसयुक्त म्हणजेच गोड, आंबट, तिखट, कडू, तुरट रसांनी युक्त आहे. यामुळे आवळा हा तीनही दोष कमी करणारा आहे. आंबट असून सुद्धा पित्त दोष कमी करणे हे याचे वैशिष्ट्य आहे.
भूक कमी होणे, अन्नास रुची नसणे, आम्लपित्त, यकृत विकार, पोट दुखणे, मुळव्याध यासारख्या पचनास संबंधित विकारांमध्ये आवळा चूर्ण किंवा रस उत्तम कार्य करते.
दृष्टीमांदय तसेच इतर नेत्र विकारांमध्ये आवळ्याच्या पालाचा रस डोळ्यात टाकतात.
टक्कल व केस पिकणे यावर आवळाकाठीने डोके धुतात तसेच आवळ्याचे तेलही लावतात.
आवळा हे बुद्धी, स्मृती वाढवण्यासाठी तसेच चिरकाल तारुण्य टिकवून ठेवण्यासाठीचे उत्तम औषध आहे.
श्वास लागणे, खोकला, मधुमेह, कावीळ, त्वचेचे विकार, जुना ताप या आजारांमध्ये सुद्धा आवळ्याच्या उपयोग होतो.
व्यवहारांमध्ये चवनप्राश, मोरावळा, आवळा कँडी यासारखी आवळ्याची औषधे वापरात येतात. हे औषधे घेण्यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.

12/03/2022

* Adulsa *
Adulsa properties- light to digest, dry in nature , have bitter and astringent taste. It decreases kapha, being cold it reduces pitta dosha. Adulsa leaf paste reduces swelling and pain.
Adulsa is very useful in cough, asthma and lung diseases.
Adulsa liquify kapha which is easy to expell out.
It maintains waters freshness and qualities if put in water as it is jantugna( disinfectant) in nature.
It is very useful in cough diseases.
Being astringent and cold, it stops bleeding.
If Adulsa is consumed in large quantities, vomiting and diarrhea may occur. In skin disorders its beneficial to take bath with water boiled with adulasa leaves.

12/03/2022

*अडुळसा*

अडुळसा गुण -लघु ,रुक्ष ( कोरडेपणा निर्माण करणारा) कडु तुरट असल्याने कफ,तर शीत असल्याने पित्त कमी करणारे आहे .
अडुळसा पत्राचा लेप सूज कमी करणारा ,वेदना कमी करणारा आहे.
अडुळसा हा खोकला,दमा, क्षय रोगांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे.
अडुळसा कफाला पातळ करून सहजतेने बाहेर काढणारा आहे.
जंतुघ्न असल्या कारणाने पाण्यात टाकल्यास पाणी खराब होत नाही.
कफाच्या आजारांमध्ये याचा खूप उपयोग होतो.
तुरट व थंड असल्याने रक्तस्त्राव थांबवणारा आहे.
अडुळसा हा अधिक मात्रे मध्ये सेवन केल्यास उलटी व जुलाब होतात.
त्वचा विकारांमध्ये अडुळसा पत्र टाकून उकळलेल्या पाण्याने स्नान केल्याने फायदा होतो.

Address

Arogyasaathi Ayurveda Chikitsalaya, 2 Ramdoot Vihar, Above Hotel Sumitra. Karishma Chowk. Karve Road Pune
Pune

Telephone

7588288099

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arogya sarthi chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Arogya sarthi chikitsalay:

Share