13/05/2025
नमस्कार, मी आपला डॉक्टर दादासाहेब मैंदाड,
आज आपण यकृत सिरोसिस या गंभीर आजारावर चर्चा करणार आहोत.
यकृत सिरोसिस म्हणजे यकृताची हळूहळू होणारी झीज. यात यकृताच्या निरोगी पेशी नष्ट होऊन त्याजागी गाठीयुक्त ऊतक (Fibrous Tissue) तयार होते. त्यामुळे यकृताचे कार्य कमी होते आणि शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
सिरोसिसची प्रमुख लक्षणे म्हणजे, वारंवार थकवा आणि अशक्तपणा,भूक न लागणे आणि वजन कमी होणे, त्वचा आणि डोळे पिवळसर (पिवळ्या काविळीसारखे) दिसणे,पोटात आणि पायांत सूज येणे,रक्तस्त्राव किंवा सहज जखम होणे.
सिरोसिसवरील उपाय असे आहेत की, मद्यपान पूर्णपणे टाळा, संतुलित आहार घ्या, जास्त चरबी आणि तेलकट पदार्थ टाळा, सकस जीवनशैली ठेवा,नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा, हिपॅटायटिस लसीकरण करून घ्या,डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळोवेळी यकृताची तपासणी करा.
Read more