06/04/2026
#यशोगाथा
हरवत चाललेल्या पुरुषार्थाला जेव्हा पितृत्वाची गरज असते...
लग्नाला तब्बल १४ वर्ष पूर्ण.... तरी देखील बाप होण्याचे सुख पदरी नाही..
समाज नेहमी स्त्रीकडे बोट दाखवतो.. पण स्वतःच्या असलेल्या त्रासाला मान्य करून त्याची जबाबदारी घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे पुरुष दुर्मिळ असतात..
ही यशोगाथा अशाच एका पुरुष रुग्णाची, आधीच्या तपासण्या केल्या तेव्हा शोधूनही न सापडलेल्या एका शुक्राणूपासून रुग्णाचा प्रवास सुरू होतो. नैसर्गिकरित्या आई वडील होण्याची इच्छा आणि आयुर्वेदावरचा विश्वास दोघेही माझ्याच क्लिनिक मध्ये बोलून दाखवतात. ज्यातून रुग्णाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांनी तंतोतंत ऐकल्या!
आपल्या शरीरात एकही शुक्राणू नाही ही संकल्पनाच मुळात किती पुरुषांना पटते? आणि त्यातून कितीजण स्त्रीचे सामाजिक आयुष्य बरबाद न करता जबाबदारीने वागतात? या प्रश्नाचं उत्तर आजच्या पितृसत्ताक समाजाने न शोधलेलंच बरं!
परंतु जेव्हा असे रुग्ण समोर येतात आणि आपल्या शारीरिक सत्याची जबाबदारी स्वीकारून त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवण्याची इच्छा व्यक्त करतात, तेव्हा आयुर्वेद त्यांना यशाचा मार्ग दाखवतो, नव्हे स्वतः आयुर्वेद अशा रुग्णांचा हात पकडून त्यांचं अंतिम ध्येय गाठेपर्यंत त्यांची सोबत करतो..
आणि मग तो विजयाचा दिवस उगवतो ज्याची रुग्ण आणि वैद्य म्हणून मी देखील वाट पाहिलेली असते..
आजचा तब्बल १ वर्ष उपचार घेतल्यानंतरचा वीर्य तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल!शुक्राणूंची संख्या २० दशलक्ष!
बाकी आयुर्वेदाकडे संशयाने पाहणाऱ्या लोकांच्यासाठी आजच्या जमान्यात प्रगत तंत्रज्ञानाने कृत्रिमरीत्या आई वडील होण्याचा पर्याय उपलब्ध आहे हे ही मात्र तितकेच खरे!