14/01/2024
*आर्थरायटीस (संधिवात) म्हणजे काय?*
शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात.
हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची नाकारता येत नाही.
'आर्थरायटीस'मध्ये सांधे (joints), सांध्यांच्या आसपास असणाऱ्या पेशी, आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होते.
*'आर्थरायटीस'मध्ये नेमकं काय होतं?*
अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपल्या शरीरातील दोन सांध्यांमध्ये एक द्रव पदार्थ असतो. हा थर सांध्यांना एकमेकांवर घासण्यापासून सुरक्षा देतो. "आर्थरायटीसमध्ये सांध्यांमधील जागा कमी होते. सांध्यांमधील द्रव पदार्थाचं प्रमाण कमी होत जातं." यामुळे सांधे जास्त संवेदनाक्षम बनतात आणि त्यांचं हळूहळू डी-जनरेशन होण्यास सुरूवात होते. कार्डिलेजची धक्का सहन करण्याची क्षमता (Shock Absorbing) कमी झाल्यामुळे सांधे एकमेकांवर घासण्याचं प्रमाण वाढतं." सांधे सातत्याने एकमेकांवर घासल्यामुळे किंवा घर्षणामुळे कार्टिलेजला सूज येते किंवा त्यांची ताठरता वाढते.
*संधिवाताचे प्रकार कोणते?*
अस्थिरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, आर्थरायटीसचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत.
ॲन्कलूझिंग स्पॉन्डिलोसिस, ऑस्टेओ-आर्थरायटीस, रुमेटाईड आर्थरायटीस, लहान मुलांमध्ये आढळून येणारा इडिओपॅथीक आर्थरायटीस, रिॲक्टिव्ह आर्थरायटीस, सेप्टिक आर्थरायटीस, गाऊट आणि पॉली आर्थरायटीस इत्यादी. पण यातील ऑस्टेओ-आर्थरायटीस आणि रुमेटाईड आर्थरायटीस हे दोन प्रकार भारतात सामान्यत: बहुतांश रुग्णांमध्ये आढळून येतात.
*संधिवाताची लक्षणं काय?*
सांध्यांमध्ये सातत्याने तीव्र वेदना जाणवत असतील तर, आर्थरायटीसची सुरूवात असण्याची शक्यता असते. वारंवार उद्भवणाऱ्या सांधेदुखीकडे वेळीच लक्ष दिलं नाही. तर, ही समस्या गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संधिवाताच्या प्रकारानुसार याची विविध लक्षणं दिसून येतात. पण, आर्थरायटीसची प्रमुख पाच लक्षणं आहेत.
१) सांधेदुखी
२) सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता (stiffness)
३) सूज
४) सांध्यांजवळचा भाग लाल होणं
५) चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणारा अडथळा
*रुमेटाईड आर्थरायटीस म्हणजे काय? त्याची लक्षणं कोणती?*
रुमेटाईड आर्थरायटीसला सामान्य भाषेत आपण संधिवात म्हणून ओळखतो. रुमेटाईड आर्थरायटीस अनेक लोकांमध्ये आढळून येतो.
"यामध्ये शरीरातील अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये ताठरता (stiffness) जाणवतो. सर्वांत महत्त्वाचं कोणत्याही वयोगटात हा आजार होऊ शकतो."
वेळीच निदान आणि उपचार करण्यात आले तर, रुमेटाईड आर्थरायटीस बरा होऊ शकतो. पण यासाठी अनेक वर्ष औषध घ्यावी लागतात.
सांध्यांना आलेली सूज, थकवा, ताप किंवा कमी झालेली भूक
सांध्यांमध्ये येणारा ताठरता
तीव्र सांधेदुखी आणि सांध्यांचा भाग लाल होणं, डीप्रेशन, अनेक सांधे दुखणं याशिवाय आर्थरायटीसने ग्रस्त अनेक रुग्णांमध्ये सांधेदुखीपेक्षा वेगळी लक्षणं दिसून येतात." सांधे नसलेल्या अवयवातही रुमेटाईड आर्थरायटीसची लक्षणं दिसून येतात.
त्वचा, डोळे
फुफ्फुस, हृदय आणि किडनी
लाळ ग्रंथी, बोन मॅरो
रक्तवाहीन्या
गुडघे, हात आणि बोटांमध्ये रुमेटाईड आर्थरायटीस जास्त होण्याची शक्यता असते.
या आजारात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चुकीने शरीरातीलच पेशींवर हल्ला करण्यास सुरूवात करते. त्यामुळे सांध्यांच्या लाईनिंगला इजा होते.
*कोणत्याही प्रकारची सांधेदुखी गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सेक्स समस्या औषध कुरीयरने कोठेही पाठविण्याची व्यवस्था आहे*
*कोणत्याही प्रकारची मूळव्याधीचे औषध (३ दिवसात हमखास फरक)*
*जय साई आयुर्वेद आणि आरोग्य,*
*कात्रज, पुणे 9822362199*