02/02/2023
आर्थिक मनःस्वाथ्यासाठी....
©सचिन मधुकर परांजपे (पालघर)
आपलं पुढे कसं होईल? आपल्याकडे भविष्यात पैसे असतील का? अशा धनचिंतेने मनुष्य बरेचदा कोणतंही कारण नसताना मनाने खचून जातो. Negative anticipation करुन उगाच टेन्शन येतं. अशावेळी ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या म्हणजे, कष्ट करणे/कर्म करणे/प्रयत्न करत रहाणे हे तर आवश्यक आणि unavoidable आहे पण मन स्थिर राहून आर्थिक सकारात्मकता यावी, आर्थिक टेन्शन दूर होऊन रिलॅक्स व्हावं यासाठी हे लहानसं पण अत्यंत प्रभावी असं #रमाह्रदयस्तोत्र अतिशय परिणामकारक आहे. या स्तोत्राचे कितीही पाठ तुम्ही करु शकता. कितीही पाठ, कुठेही आणि कधीही करायचे. पण शुक्रवारी जास्त करावेत (१२ पेक्षा अधिक) आणि ते लक्ष्मी मंदिरात केल्यास अधिक छान. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही चालतात. देवळात शक्य नसेल तर घरीदारी, प्रवासात कुठेही करा. #कोणतेही म्हणजे अक्षरशः कोणतेही बंधन नाही. फक्त सोयरसुतकाचे दहा दिवस बंधन असते. तेव्हा वाचन नको. आणि जुगार खेळायचा नाही (हे स्तोत्र मला अवलियाने दिलं होतं तेव्हा तो बोलला होता) शेअर ट्रेडिंग जुगार आहे का? ते तुमचं तुम्ही ठरवा...
“हे देवि लक्ष्मीमाते, मी तुझा पुत्र/तुझी कन्या असून मला तुझ्या ह्रदयात अढळ स्थान दे. माझा आर्थिक ताणतणाव दूर कर. मी अनाठायी आणि अयोग्य ठिकाणी धनव्यय करणार नाही. मी सत्पात्री दानधर्म करेन. माझी मातृवत काळजी घे. हे स्तोत्र मजपर्यंत ज्या माध्यमातून आलं त्या सर्वांविषयी मी कृतज्ञ आहे” ही प्रार्थना अधुनमधुन किंवा अगदी रोज न चुकता करायला विसरु नका. बिनधास्त रहा आणि टेन्शनमुक्त व्हा
॥ रमाहृदय स्तोत्रम् ॥
श्रीः पद्मा कमला मुकुन्दमहिषी लक्ष्मीस्त्रिलोकेश्वरी
मा क्षीराब्धिसुता विरिञ्चिजननी विद्या सरोजासना ।
सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नामानि ये द्वादश,
प्रातः शुद्धतराः पठन्त्यभिमतान् सर्वान् लभन्ते शुभान् ॥
नामावलिः
ॐ श्री श्रियै नमः ।
ॐ श्रीपद्मायै नमः ।
ॐ श्रीकमलायै नमः ।
ॐ श्रीमुकुन्दमहिष्यै नमः ।
ॐ श्रीलक्ष्म्यै नमः ।
ॐ श्रीत्रिलोकेश्वर्यै नमः ।
ॐ श्रीमायै नमः ।
ॐ श्रीक्षीराब्धिसुतायै नमः ।
ॐ श्रीविरिञ्चिजनन्यै नमः ।
ॐ श्रीविद्यायै नमः ।
ॐ श्रीसरोजासनायै नमः ।
ॐ श्रीसर्वाभीष्टफलप्रदायै नमः ।
इति रमाहृदय स्तोत्रं सम्पूर्णम् ।
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)©
#नावासह फॉरवर्ड करा. शेअर करा 🙏