19/03/2026
नमस्कार मित्रांनो,
आज मी जे बोलणार आहे ते अनेकांना खटकू शकतं, पण सत्य कधीच गोड नसतं — ते स्पष्ट आणि कटूच असतं.
सध्या Homoeopathy vs Allopathy या वादावर जे वातावरण तयार केलं जात आहे, ते पूर्णपणे एकतर्फी आणि दिशाभूल करणारे आहे.
काही MBBS डॉक्टरांना असं वाटतं की BHMS डॉक्टरांनी bridge course करून त्यांच्या बरोबरीने येण्याचा “अनधिकृत” प्रयत्न चालवला आहे. पण हा गैरसमज नाही — तर मुद्दाम पसरवलेला भ्रम आहे.
BHMS हा अभ्यासक्रम कोणताही हलकासा किंवा कमी दर्जाचा नाही.
Anatomy, Physiology, Pathology, Surgery, Obstetrics & Gynaecology, Community Medicine, Practice of Medicine, Forensic Medicine — या सर्व विषयांसाठी समान तास, समान अभ्यासक्रम आणि समान दर्जाचे training दिले जाते.
Reference books सुद्धा त्या त्या विषयातील gold standard आहेत —
B.D. Chaurasia, Guyton, K. Park, S.K. Das, Parikh — हीच पुस्तके MBBS विद्यार्थी वापरतात आणि तीच BHMS विद्यार्थीही अभ्यासतात.
MUHS सारख्या विद्यापीठामार्फत व्यवस्थित परीक्षा घेऊनच BHMS डॉक्टर तयार होतात.
म्हणून “हे डॉक्टर कमी पात्र आहेत” असा आरोप करणे म्हणजे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणं आहे.
आता bridge course बाबत बोलायचं झालं तर —
Allopathy practice करण्यासाठी Pharmacology चं ज्ञान आवश्यक आहे, हे आम्हालाही पूर्णपणे मान्य आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने CCMP सारखा कोर्स तयार केला आहे.
हा कोर्स म्हणजे shortcut नाही, तर एक structured आणि regulated प्रणाली आहे, ज्याद्वारे मर्यादित स्वरूपात प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली जाते.
मग प्रश्न असा आहे —
सरकार, विद्यापीठ आणि कायद्याने मान्यता दिलेल्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार काही लोक स्वतःला कसा देतात?
विधीमंडळात या विषयावर जे वक्तव्य केले जात आहे, ते पूर्णपणे वास्तवापासून दूर आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव नसलेले आहे.
हा विषय “ego” किंवा “superiority complex” चा नाही —
हा विषय आहे त्या हजारो विद्यार्थ्यांचा, जे ग्रामीण, गरीब आणि कष्टकरी कुटुंबातून येऊन स्वतःच्या कष्टावर डॉक्टर बनतात.
भारतातील ग्रामीण भागात आजही MBBS डॉक्टरांची कमतरता आहे — तिथे BHMS डॉक्टरच आरोग्यसेवेचा कणा बनून उभे आहेत.
Emergency आणि primary care मध्ये BHMS डॉक्टरांनी दिलेली सेवा दुर्लक्षित करता येणार नाही.
जर BHMS डॉक्टरांना पूर्णपणे नाकारायचं असेल, तर आधी ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची तयारी ठेवा.
दरवर्षी नवीन होमिओपॅथी कॉलेजांना परवानगी देणं आणि नंतर त्याच विद्यार्थ्यांना “अयोग्य” म्हणणं — हा सरळसरळ दुटप्पीपणा आहे.
आज बहुतांश वैद्यकीय शिक्षण क्षेत्र हे राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांशी जोडलेलं आहे.
जर खरंच दर्जाबाबत प्रश्न असेल —
- तर नवीन कॉलेजांना परवानगी देणं ताबडतोब थांबवा
- आधीच असलेल्या कॉलेजांची गुणवत्ता तपासा
: आणि स्पष्ट धोरण जाहीर करा
पण हे सगळं केलं जात नाही, कारण इथे “शिक्षण” पेक्षा “व्यवसाय” मोठा आहे.
शेवटी एकच स्पष्ट सांगतो —
आम्ही कोणाच्या हक्कावर अतिक्रमण करत नाही,
आम्ही आमच्या कष्टाने मिळवलेल्या पात्रतेनुसारच उभे आहोत.
आमचं खच्चीकरण करणं थांबवा.
हा तुमच्या राजकारणाचा विषय नाही — हा आमच्या आयुष्याचा, आमच्या भविष्याचा आणि आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
*DR. YASHPAL WAGHMARE*
*BHMS*,
*CCMP 1ST RANK*
*B.J MEDICAL COLLEGE PUNE*
*PGDEMS (RUBY HALL), CCH,CGO PUNE*