24/06/2023
ओपन हार्ट सर्जरी ऐवजी टाके न घालता ह्रदय ची झडप बदलण्याची पहिली अवघड शस्त्रक्रिया यशस्वी.
धनकवडी ,पुणे : ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) हा आधुनिक शस्त्रक्रियेचा प्रयोग पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी करून वैदकिय क्षेत्राला नवा आयाम दिला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सत्तरी पार केलेले निवृत्त प्राचार्य दिलीप रेवडकर यांना तीन महिन्यांपासून चालताना दम लागणे, चक्कर येऊन भोवळ येणे, छातीमध्ये दुखण्याचा त्रास होत होता. बार्शी मध्ये हृदय रोग तज्ज्ञांना दाखवल्या नंतर त्यांना एओर्टिक स्टेनोसिस हा आजार असल्याचे निदर्शनास आले. रेवडकर यांचा मुलगा डॉ युवराज यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ ओंकार थोपटे यांच्याशी पेशंटची लक्षणे आणि दोन डी इको यांची माहिती दिली.
माहिती मिळताच क्षणाचा हि विलंब ना लावता डॉ थोपटे यांनी ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) शस्त्रक्रियाची माहिती दिली. कात्रज येथील हार्टबिट फौंडेशन मध्ये पेशंट ची पुनर्तपासणी करून शस्त्रक्रिया करता येईल कि नाही याची खात्री करून घेतली. कार्डियाक सिटी स्कॅन विथ TAVI प्रोटोकॉल सह्याद्री हॉस्पिटल मध्ये करून घेऊन TAVI शस्त्रक्रियेची वेळ निश्चित केली.
TAVI शस्त्रक्रिया रोगग्रस्त महाधमनी (एओर्टिक) वाल्व रोपण करण्यासाठी केली जाते. ही आधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची बिना टाक्यांची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करायची आवश्यकता नसते. रुग्णाच्या मांडीमध्ये सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपे च्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते. यामध्ये कोणत्याही भुलीची गरज नसून रुग्णा सोबत चालत बोलता सहजतेने डॉ थोपटे यांनी डॉ अनमोल सोनावणे यांच्या मदतीने बिनटाक्याची TAVI ची शस्त्रक्रिया डेक्कन येथील सह्याद्री स्पेशालिटी हास्पिटल मध्ये केली.
सह्याद्री हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ अभिजित पळशीकर म्हणाले कि, वैद्यकीय शास्त्राच्या इतिहासात हा माईल स्टोन असून गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रियेला डॉ ओंकार थोपटे यांच्या मुळे TAVI हा पर्याय मिळाला असून पुणे व आस पासच्या परिसरात अशाप्रकारची सेवा देणे आम्हाला शक्य झाले आहे.
एक आठवड्या नंतर झालेल्या पहिल्या फॉलोअप मध्ये पेशंटच्या मुलीने डॉ ऐश्वर्या रेवडकर यांनी डॉ थोपटे यांच्या मुळे इतकी मोठी शस्त्रक्रिया किती सहजतेने आणि कोणत्याही कॉम्प्लिकेशन विरहित झाली असून पेशंट शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवस पासून कशा प्रकारे चालत फिरत आहे या बद्दल डॉ थोपटे यांचे कौतुक व आभार व्यक्त केले
Dr.Omkar Sampatrao Thopte
APEXX DIAGNOSTICS
OFFICE 16, FIRST FLOOR, MANIK MOTI COMPLEX,
SATARA ROAD, CHOWK, Katraj, Pune,
Maharashtra 411046
Clinic Phone :+91 90113 33339
website :www.dromkarthopte.com