
08/07/2025
Moringa Soup शेवग्याच्या शेंगा सूप
खरेतर शेवग्याच्या शेंगा कोणत्याही पद्धतीने खाल्ल्या तरी त्या चवीला छान लागतात आणि भरपुर पोषक घटकयुक्त असतात.
तरीही हे शेवग्याचे सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, सर्वात जास्त फायदा हा हाडांसाठी होतो, हे सूप
किंवा ह्याची भाजी खाल्ल्याने हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो,
वजन कमी करण्यास तर अत्यंत फायदेशीर आहे, रक्तामधील लोहाचे प्रमाण वाढते, डायबेटिसच्या रुग्णांमध्ये वाढलेली साखर कमी करण्यास मदत होते, असे अनेक फायदे तर आहेतच पण चविलाही उत्तम आहे त्यामुळे हे सूप लहान मुलपण आवडीने पितात, हे लहान मुलान सारखे प्यायला दिल्यास त्यांच्यामध्ये कधीही ड जीवनसत्व ची कमी होणार नाही आणि त्यांची वाढ उत्तम पद्धतीने होईन.
ह्या सूपमध्ये भोपळा, पालक, मूग किंवा मसूरडाळ, टाकून ह्यामधील पोषक तत्वे वाढवण्यासोबतच चवही वाढेल
बारामतीमध्ये श्री वामन गरुड काका ह्यांचे हे घरगुती पद्धतीने बनविलेले भोपळा आणि मोरिंगा सूप चवीला तर छान आहेच परंतु पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
Moringa Soup (Drumstick Soup)
In fact, drumsticks in any form taste good and are rich in nutrients, no matter how they are cooked.
Still, this moringa soup is extremely beneficial for health, with its greatest benefit being for bone health. Consuming this soup or a curry made from drumsticks helps reduce bone fragility.
It is also highly beneficial for weight loss, helps increase the iron levels in the blood, and assists in reducing high blood sugar levels in diabetic patients.
Along with these many benefits, it tastes excellent, which is why even children like to drink this soup. If children are given this soup regularly, they will never suffer from Vitamin D deficiency, and it will support their proper growth.
Adding pumpkin, spinach, moong dal, or masoor dal to this soup will increase its nutritional value while also enhancing its taste.
In Baramati, Shri Vaman Garud Kaka prepares this pumpkin and moringa soup using a traditional homemade method. It is not only delicious but also rich in nutrients.
Dr Swati Khartode
Clinical Dietitian and
Medical Researcher
Pune