13/03/2023
*आयुर्वेदातील रत्न बोध*
*वसंत ऋतू चर्या*
आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतू नुसार प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य टिकविण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. त्याला ऋतू चर्या असे म्हणतात.
सद्या सुरू असलेल्या वसंत ऋतू नुसार आहार, औषधे व विहार कसा असावा याचे उदाहरण पुढे देत आहोत.
🏵️शिशिर ऋतू मध्ये संचित झालेल्या कफाचे वसंत ऋतू मधील उष्म्यामुळे ☀️विलयन होते.
🏵️त्यामुळे जठराग्नी मंद होतो व भूक लागत नाही. तसेच कफाचे आजार जसे 🤧🤒सर्दी, खोकला, ताप, कांजिण्या इ जास्त बळावतात.
त्यासाठी याकाळात मध, जुने धान्य, गावरान मांसाहार,मनुके यांचे सेवन करावे.
🏵️वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक औषधीचे सेवन करावे.
🏵️ दिवसा झोपणे टाळावे.
🐓🍗मांसाहार करताना विशेषतः गावरान मांस सेवन करावे.
हे मांस व्यवस्थित अग्निवर भाजलेले व पूर्णपणे शिजलेले असेल याची खात्री करून घ्यावी.
डॉ प्रेरणा शिंगोटे
MD आयुर्वेद चिकित्सा
अस्मी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,
शांताई सिटी सेंटर, तळेगाव दाभाडे.